🟠ओबीसी च्या बातम्या🟠

🟠ओबीसी च्या बातम्या🟠
https://youtu.be/Rw0DcKkBuTU
2) मराठा आरक्षणावर लवकरच तोडगा निघेलः मुख्यमंत्री
छत्रपती संभाजीनगर : लाडकी बहीण योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चिकलठाणा विमानतळावर मराठा मावळा संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट
घेऊन मराठा आरक्षणासंबंधी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. यावर मराठा व ओबीसी नेत्यांची बैठक बोलावून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढू, असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
मुख्यमंत्री शिंदे यांचे शुक्रवारी दुपारी चिकलठाणा विमानतळावर
आगमन झाल्यानंतर मराठा मावळा संघटनेचे संस्थापक प्रा. माणिकराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. मराठा समाजास ओबीसीमधून आरक्षण द्यावे व महाराष्ट्रातील सामाजिक शांतता राखावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी शिष्टमंडळाशी चर्चा करताना मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लवकरच आम्ही एकत्र बसून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतो, अशी ग्वाही दिली. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष पंढरीनाथ गोडसे, मराठवाडा कार्याध्यक्षा कल्पना चव्हाण आदींची उपस्थिती होती.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




