मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 62

मराठा आरक्षण विरुद्ध ऍडव्होकेट मंगेश ससाने,प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
62
आरक्षणाचे धोरण, सामाजिक न्याय आणि मराठा जातीचे राजकारण
डॉ.आर.डी. चित्र
हिंदूधर्मशास्त्रातील वर्णश्रेष्ठत्वाच्या सिद्धांताने श्रमविभागणीच्या आधारे जे जातीभेदाचे तत्त्वज्ञान विकसित केले होते, त्या तत्त्वज्ञानाच्या आधारे क्षमता आणि गुणवत्तेचा संबंध वंशपरंपरेशी जोडून उच्चवर्णीयांनी ऐतिहासिक काळात शुद्रातिशुद्रांवर म्हणजेच आत्ताच्या आदिवासी, दलित आणि ओबीसी जातसमूहांवर प्रचंड प्रमाणात अन्याय नि अत्याचार केला. माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले त्यांचे हक्क आणि अधिकार नाकारून त्यांना सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेपासून वंचित ठेवले. त्यामुळे येथील शूद्रातिशूद्र गेली हजारो वर्ष साध्या माणुसकीलाही पारखे होते. परंतु वासाहतिक काळात ब्रिटिशांच्या उदारवादी धोरणाने काहीसे चित्र पालटण्यास सुरुवात झाली. ‘सन १८८२ साली सर विल्यम हंटर यांनी परंपरेपासून उच्चवर्णीयांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या शूद्रातिशूद्र वर्गातील जात समूहांना सामाजिक प्रतिष्ठा व समानतेची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या देशात प्रथमच आरक्षणाची संकल्पना मांडली. पुढे १९०२ साली छत्रपती शाहू महाराजांनी ती कोल्हापूर संस्थानात प्रत्यक्ष अंमलात आणली. ब्रिटिश सरकारनेही विल्यम हंटर यांच्या संकल्पनेला मूर्तरूप देण्यासाठी १९१८ मैसूर, १९२१ मद्रास आणि १९२५ साली बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये अभावग्रस्त लोकांसाठी आरक्षण सुरू केले. ‘१ पुढील काळात ब्रिटिश सरकारने पारित केलेले मोर्ले मिटो १९०९ व मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड १९१९ हे दोन सुधारणावादी कायदे भारतातील जाती आधारित आरक्षणाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरले. “सन १९०९ च्या सुधारणावादी कायद्याने प्रांतीय निवडणुकीत ब्रिटिशांनी मुस्लिमांसाठी काही राखीव जागा ठेवल्या तर, सन १९१९ मधील दुसऱ्या सुधारणावादी कायद्याने अँग्लो इंडियन, ख्रिश्चन आणि शीख धर्मियांची त्यात भर घातली. “२ स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, ‘भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४ चा सकारात्मक व विधायक अर्थ लक्षात घेऊन भारतीय समाजरचनेतील बहिष्कृत वा अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या जात
समूहाला किंवा वर्गाला आणि जंगल दुर्गम डोंगरदऱ्यांत राहणाऱ्या आदिवासी वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात ते कमी अधिक असले तरी त्यांना सामाजिक प्रतिष्ठा व समानतेची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्यघटनेतील अनुच्छेद १५ (४) व १६ (४) नुसार, अनुच्छेद ३४१ व ३४२ अन्वये घटनात्मक आरक्षण दिले. ‘३
तथापि भारतासारख्या स्तरीकृत जातीयव्यवस्थेत संवर्ण असलेला, मात्र जगण्याची कोणतीही साधने उपलब्ध नसलेला आणखी एक मोठा समूह या देशात अस्तित्वात होता. संख्येने मोठा असला तरी, हा समूह अनेक जातीगटात विखंडित असल्यामुळे उच्चवर्णीयाकडून त्यांचेही सहज शोषण होत असे. त्यामुळे त्यांची स्थिती अस्पृश्य वा आदिवासीपेक्षा काही वेगळी नव्हती. धर्माचे अधिष्ठान असलेल्या अपरिवर्तनीय अशा जातीव्यवस्थेने अतिप्रदूषित, कनिष्ठ व्यवसाय अस्पृश्य, आदिवासींवर तर त्यापेक्षा कमी प्रदूषित, कनिष्ठ व्यवसाय हे अनेक जात समूहात विखंडित अशा शूद्रांवर लादले होते. त्यामुळे जाती आधारित व्यवसायांना चिकटून बसविलेल्या सर्वच शूद्रातिशूद्रांच्या आर्थिक विकासाला मर्यादा आल्या होत्या. विशेष बाब अशी की, धर्मशास्त्रानुसार शुद्र वर्ग हा कारागीर आणि सेवेकरी वर्गात मोडतो. या वर्गाने ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या त्रैवर्णिकांसाठी उत्पादन आणि चाकरी करावी, असे रामायणादी धर्मग्रंथाने आवर्जून सांगितले आहे.
‘ब्राह्मणस्य तपो ज्ञानं तपः क्षत्रस्य संरक्षणम ।
वैशस्य तपो वार्ता तपः शूद्रस्य सेवनय ।।४ अर्थात ज्ञान ब्राह्मणांची तपस्या, लोक रक्षण क्षत्रियांची तपस्या, व्यापार वैश्यांची तपस्या आणि सेवा हीच शूद्रांची तपस्या हा त्याकाळी नियम होता. हा नियम मोडून शुद्राने अन्य काम करण्याचा प्रयत्न केला तर शूद्राची हत्या करण्यात येत असे आणि ही हत्या स्वतः राजा करीत असे. त्याकाळी शुद्र म्हणजे दुर्गुणांचा पुतळा समजण्यात येई, शूद्राने वैदिक मंत्राचा उच्चार केला तर त्याची जीभ कापावी, त्याने वैदिक मंत्र पाठ केले तर त्याच्या शरीराचे दोन तुकडे करावेत आणि त्याने वेद ऐकला तर त्याच्या कानात धातूचा तापलेला रस ओतावा अशी शिक्षा सांगणारा श्लोक मनुस्मृतीत आढळतो. ‘धर्मोपदेशं दर्पण विप्राणामस्य कुर्वतः।
तप्तमासेचयेतैलं वको श्रोत्रे च परार्थियः । ५ प्रस्तुत धर्मसूत्राचा आधार पहा रामराज्यात एका ब्राह्मणाने शुद्र कुळातील
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




