मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 48

मराठा आरक्षण विरुद्ध एडवोकेट मंगेश ससाने प्राध्यापक लक्ष्मण हाके नवनाथ आबा वाघमारे आंदोलना निमित्त
मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 48
कायमची मूठमाती मिळाली आहे. महाराष्ट्रात मराठा जातही आपली लोकसंख्येची टक्केवारी ३५ टक्क्यांपर्यंत फुगवून सांगते व त्या आधारे सत्तेत दावेदारी मिळवून ओबीसी आरक्षणही मागते. महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना झाली तर खरी आकडेवारी बाहेर येईल व मराठ्यांनी निर्माण केलेला भ्रमाचा भोपळा फुटेल. बिहारप्रमाणेच महाराष्ट्रही ओबीसी-बहुल असल्याने इथेही ओबीसी ६० ते ६५ रक्के सिद्ध होतील व तेवढ्याप्रमाणात मराठ्यांची लोकसंख्या अत्यंत कमी (५ ते ८ टक्के) सिद्ध होईल, यात आता शंका नाही. जातनिहाय जनगणनेतून हेही सिद्ध होईल की, मराठ्यांना ७५ वर्षांपासून प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या संख्येपेक्षा दहा पटीने जास्त प्रतिनिधित्व मिळत आलेले आहे. त्यामुळे ओबीसीवरील मराठा- संकट आपोआप परस्पर नष्ट होईल. हे वास्तविक सत्य मराठ्यांना चांगलेच माहित असल्यामुळे ते चूकूनही जातनिहाय जनणननेची मागणी करीत नाहीत.
रोहीणी आयोगाची स्थापना करून मायक्रो ओबीसी जातींना मुख्य ओबीसी प्रवाहापासून तोडण्याचा प्रयत्न संघ-भाजपा सरकार करीत आहे. मात्र आता बिहारच्या जातनिहाय जनगणनेमुळे केंद्र सरकारचे हे षडयंत्र मोडीत निघेल. कारण रोहिणी आयोगाचा अहवाल व निष्कर्ष हे सॅम्पल सर्व्हेवर अवलंबून असल्याने ते मोघम व कमी विश्वासार्ह आहेत. त्यावर आधारित शासकीय योजना तेव्हढ्याच कूचकामी ठरणार आहेत. मात्र जातनिहाय जनगणनेत प्रत्येक जातीचे अत्यंत सुक्ष्म सर्व्हेक्षण झालेले असल्यामुळे मायक्रो जातींसाठीच्या सरकारी योजना अत्यंत सुक्ष्मपणे व ठोसपणे आखल्या जातील व प्रभावीपणे राबविल्या जातील. अशाप्रकारे रोहिणी आयोग व त्यामागील फुटपाडे षडयंत्र परस्पर निकामी होईल.
संधींच्या समानतेसाठी व सामाजिक न्यायासाठी गांधीवादाचा मार्ग सभरवाल सांगतात तेव्हा ते सर्वोदयाच्या भुमिकेतून अंत्योदय साधला पाहिजे, असे सांगतात. अंत्योदय म्हणजे प्रत्येक दुबळ्याला सबळ करणे, असेही ते सांगतात. एखाद-दुसरा माणूस दुबळा असेल तर त्याला पैसे देऊन सबळ बनविता येईल.
परंतू त्याला दुबळे बनविणारी व्यवस्था तशीच चालू राहीली तर? देशात जर बहुसंख्य समाजघटकांना शेकडो वर्षांपासून दुबळे ठेवण्यासाठी विशिष्ट धोरण व कार्यक्रम अधिकृतपणे शासनाच्या पातळीवरून राबविले जात असतील तर त्या सगळ्या दुबळ्यांना सबळ बनविण्यासाठी शासकीय पातळीवरूनच विशिष्ट धोरण व कार्यक्रम राबवावे लागतील. अर्थात जातीव्यवस्थेमुळेच बहुसंख्य समाजघटक वर्षानुवर्षे दुबळे ठेवले जात असतील तर त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी शासनाला जातीअंताचेच धोरण आखावे लागेल. आणी हे जातीअंताचे धोरण तयार करण्यासाठी
योगेंद्र यादवांनी जातनिहाय जनगणनेचा जातीअंताशी संबंध जोडला, मात्र त्याचे अधिक स्पष्टीकरण ते देऊ शकलेले नाहीत. जातनिहाय जनगननेमुळे जास्तीतजास्त आरक्षणाची मागणी होईल व त्यातून जातीअंत होईल, असा काहीसा (गैर) समज या लेखातून निर्माण होतो. फुले-शाहू-पेरियार-आंबेडकरांच्या जातीअंताचे स्वप्न साकारण्यासाठी
जातनिहाय जनगणना मददगार ठरेल. म्हणजे नेमके काय होईल, याचे उत्तर शोधले पाहिजे. जातीअंत म्हणजे जाती नष्ट करणे व जातीव्यवस्था नष्ट करणे होय! एखादी वस्तू नष्ट करायची असेल तर ती कशी निर्माण झाली, कोणते मूलभूत घटक वापरले गेलेत, कोणत्या प्रक्रिया करण्यात आल्यात, त्यासाठी कोणती धोरणे आखली गेलीत? आणी सर्वात महत्वाचे म्हणजे कोणते तत्वज्ञान वापरले गेले? हे सर्व आकडेवारीनिशी व तपशिलवार माहितीनिशी जाणून घेतले तरच ती वस्तू कशी नष्ट करायची याचे सूत्र सापडते.
जाती निर्माण होत असतांना सर्वात प्राथमिक मुलभूत घटक वापरला गेला तो ‘व्यवसाय व व्यावसायिक,’ जगभर विकासाच्या अनेक टप्यात गरजेनुसार विविध व्यवसाय निर्माण झालेत व ते व्यवसाय करणाऱ्यांचा गट ‘वर्ग’ म्हणून ओळखला गेला. भारतात मात्र हे सर्व व्यावसायिक शूद्र वर्ण म्हणून ओळखले गेलेत. दासप्रथाक वर्णव्यवस्था जरठ झाली तेव्हा ती नष्ट होण्याचा काळ नजीक आला असतांना बौद्ध धम्माचा उदय झाला. दासप्रथाक वर्णव्यवस्था नष्ट करण्याचे नेतृत्व द्रष्टेपणाने बुद्धाने स्वीकारले व ते पारही पाडले. अर्थात कोणतीही कालबाह्य झालेली जुनी समाजव्यवस्था नष्ट होत असतांना ती तुलनेने अधिक पुढारलेली व तुलनेने अधिक समतावादी समाजव्यवस्थेत रुपांतरित होत असते. या क्रांतिकारक परिवर्तनासाठी त्या काळाची गरज म्हणून क्रांतिकारक तत्वज्ञान निर्माण व्हावे लागते, ते बुद्धाने पुरवले. मात्र त्यासोबत त्या काळाची गरज म्हणून उत्पादनांची साधनेही क्रांतिकारक पद्धतीने विकसित होत असतात. या काळात लोखंडाचा शोध लागला व त्यामुळे लाकडी नांगर जाऊन लोखंडी नांगर आला, लोखंडी कुन्हाड आली. वर्णव्यवस्था नष्ट होत असतांना जे गुलाम स्वतंत्र झालेत, त्यांनी मोठ्याप्रमाणात जंगलतोड करून जमीनी कसायला सुरूवात केली. लोखंडी कुन्हाड व लोखंडी नांगरमुळे ते शक्य झाले. शेतीशी निगडीत लोहार, सुतार, कुंभार हे व्यवसाय निर्माण झालेत व भरभराटीला आलेत. स्वतंत्र झालेले अनेक गुलाम या नव्या व्यवसायांकडे वळलेत. बौद्ध क्रांतीमुळे स्वतंत्र झालेला कष्टकरी दसपटीने
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴


