️ उद्या 19 जुलै 2025 – मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर निर्णायक सुनावणी!

- मुंबई 18 जुलै २०२५ आज हायकोर्टात मराठा विरुद्ध ओबीसी सुनावणी झाली ती उद्याही कायम राहील
️ उद्या 19 जुलै 2025 – मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर निर्णायक सुनावणी!

ओबीसी प्रतिनिधी शंकरराव लिंगे यांच्यासह सत्यशोधकांची ठाम भूमिका
मुंबई – उद्या म्हणजेच 19 जुलै 2025 रोजी सकाळी ११ वाजता मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावर ऐतिहासिक सुनावणी पार पडणार आहे. याचिका क्र. ३४६८ अंतर्गत अॅडव्होकेट डॉ. गुणरत्न सदावर्ते आणि सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी सरकारच्या अंतरिम आदेशाविरोधात स्पष्ट भूमिका घेतली आहे.
मुख्य मुद्दे जे उद्या चर्चेला येणार:
कुणबी = मराठा ही संज्ञा फसवी असून, कुणबी मराठा मागासवर्गीय नाहीत, असा युक्तिवाद.
ओबीसी आरक्षणाचा अन्य समुदायांकडून दुरुपयोग होतोय – सदावर्तेंचा स्पष्ट आरोप.
सरकारी वकील मुद्द्यांवरील अंतिम निर्णयापर्यंत अंतरिम स्थगितीन देण्याची मागणी करत आहेत.
आरक्षण मर्यादा ५०% च्या पलीकडे जाऊ नये, अन्यथा ओबीसींना नुकसान होईल – अॅड. संचेती यांचा युक्तिवाद.
उपस्थित
१० ओबीसी प्रतिनिधी – शंकरराव लिंगे, राजाराम पाटील यांच्यासह
मराठा गटातर्फे – ११० वकील, २० कार्यकर्ते
सरकारी वकिलांची टीम देखील सज्ज
⚖️ न्यायमूर्ती घुले, कुलकर्णी आणि मारणे यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठासमोर कामकाज होणार आहे.
फोटो: अॅड. डॉ. गुणरत्न सदावर्ते आणि याचिकाकर्ते सत्यशोधक शंकरराव लिंगे न्यायालयात उपस्थित
दिनबंधू न्यूज
संपादक – सत्यशोधक शंकरराव लिंगे
7387377801 – WhatsApp ग्रुपमध्ये जोडा
लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा
—



