ओबीसी च्या बातम्या

ओबीसी च्या बातम्या
1
ओबीसी चळवळ भक्कम करण्यासाठी व त्यात सुसूत्रता आणण्यासाठी आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता संत सावता माळी मंदिर श्रीगोंदा या ठिकाणी या बैठकीचे आयोजन केले आहे तरी आपण बहुसंख्येने या बैठकीत उपस्थित राहावे.
विषय ओबीसी समन्वय समिती गठित करणे
तालुक्यातील 11 सभासदांची यादी करून प्रत्येकाला येणाऱ्या ओबीसी आंदोलनाबाबत जबाबदारी देण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे तरी आपण या बैठकीला आवर्जून उपस्थित रहावे ही विनंती.🙏🏻🙏🏻🙏🏻
टीप जो बैठकीला उपस्थित असेल अश्यातूनच कमिटी तयार केली जाईल अनुपस्थित सदस्यांची नावे त्या कमिटीमध्ये घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.🙏🏻🙏🏻🙏🏻
2
माझा लढा ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी: प्रकाश आंबेडकर
नांदेड : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मनोज
जरांगे पाटील यांच्या मागणीमुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यात स्वतःला राजकीय नेते म्हणविणारे मात्र यावर ठाम भूमिका न घेता पळवाटा शोधत आहेत. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण वाचविण्यासाठी माझा लढा असून, त्यासाठीच आरक्षण बचाव रॅली काढणार असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
अॅड. आंबेडकर म्हणाले, जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षण द्यावे, सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. त्यावर वंचितने भूमिका घेतली. इतर पक्षांना पत्र देऊन भूमिका लेखी स्वरूपात देण्याची मागणी केली. परंतु, खोपर्डी असो मराठा आरक्षणाचा प्रश्न स्वतःला नेते म्हणविणारे भूमिका घेतच नाहीत. जरांगे आणि हाकेंना काय शब्द दिला तो आधी सांगा, असे म्हणत आहेत. परंतु, ओबीसीतून आरक्षण द्यायचे की नाही? हाच एकमेव प्रश्न आहे. त्यावर पक्षांनी भूमिका मांडणे महत्त्वाचे आहे.
3
ओबीसींचे आरक्षण एका जीआरवर
एससी, एसटी संविधानिक आरक्षण आहे, तर ओबीसींचे आरक्षण हे एका जीआरवर आहे. १९९० नंतर कुणी त्याला संविधानिक करण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत. त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत, असे आंबेडकर यांनी सांगितले.
4
अत्यंत महत्त्वाचें.
सकल OBC व भटके विमुक्त समाज बंधू-भगिनींना विनंतीपूर्वक कळविण्यात येते की
शुक्रवार दिनांक 26/07/2024 रोजी सकाळी 11 वाजता प्रा. लक्ष्मण हाके व इतर मान्यवर ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा काय असावी यावर संवाद व चर्चा करण्यासाठी परभणी येथे येणार आहेत.
तरी ओबीसी बांधवांना विनंती करण्यात येते की पूर्वतयारीसाठी मगळवार दि. 23/07/24 रोजी बैठक आयोजित केली आहे. स्थळ -संस्कृतिक सभागृह, माळी गल्ली, परभणी वेळ – सायकाळी 7 वा.
तरी समस्त ओबीसी, भटके विमुक्त बांधवांनी उपस्थित रहावे ही नम्र विनंती.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




