🌹 वैचारिक विश्वातील दीपस्तंभ मालवला… डॉ. जनार्दन वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹 सत्यशोधक शंकरराव लिंगे सोलापूर

मराठवाड्याच्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक विश्वाला दिशा देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, साहित्य अभ्यासक, पुरोगामी विचारवंत आणि माजी खासदार डॉ. जनार्दन वाघमारे यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या वैचारिक आकाशातील एक तेजस्वी तारा कायमचा मावळला आहे.
११ नोव्हेंबर १९३४ रोजी लातूर जिल्ह्यात जन्मलेल्या डॉ. वाघमारे यांनी आयुष्यभर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनासाठी स्वतःला वाहून घेतले. एका सामान्य कुटुंबातून प्रचंड कष्ट, जिद्द आणि अभ्यासाच्या बळावर ते प्राध्यापक, प्राचार्य, कुलगुरू आणि राज्यसभेचे खासदार या उच्च पदांपर्यंत पोहोचले. त्यांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजोन्नतीसाठी समर्पित होता.
नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक व पहिले कुलगुरू म्हणून त्यांनी विद्यापीठाच्या उभारणीत मोलाची भूमिका बजावली. मराठवाड्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर आणि ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली करण्यामागे त्यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व होते. इंग्रजी साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांनी निग्रो साहित्य, दलित साहित्य आणि पुरोगामी साहित्य चळवळीवर सखोल संशोधनपर लेखन केले. त्यांनी सुमारे ७० ग्रंथांचे लेखन करून ज्ञानविश्व समृद्ध केले असून अनेक ग्रंथांना मानाचे पुरस्कार मिळाले.
“लातूर पॅटर्न” देशभर चर्चेत आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. शिक्षणाच्या माध्यमातून वंचित समाजातील मुलांनी मोठे कसे व्हावे याचा रोडमॅप त्यांनी दिला. जात-पात, धर्म, लिंगभेद यांना कधीही थारा न देणारे डॉ. वाघमारे हे फुले-शाहू-आंबेडकर विचारांचे खरे सत्यशोधक होते.
लातूर नगरपालिकेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून त्यांनी लोकाभिमुख कामगिरी केली. विशेष म्हणजे, राजकीय समीकरणे प्रतिकूल असतानाही जनतेच्या प्रचंड प्रेमामुळे ते थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले—ही त्यांच्या लोकप्रियतेची जिवंत साक्ष आहे. राज्यसभेतील कार्यकाळातही त्यांनी शिक्षण, सामाजिक न्याय आणि वंचित घटकांच्या प्रश्नांवर प्रभावी आवाज उठवला.
अत्यंत साधे राहणीमान, उच्च विचारसरणी आणि पैशामागे कधीही न धावणारे व्यक्तिमत्त्व ही त्यांची खरी ओळख होती. कुलगुरूपद आणि खासदारकीपर्यंत पोहोचूनही त्यांच्या जीवनात कोणताही दिखावा नव्हता—हेच त्यांचे मोठेपण.
त्यांच्या पार्थिवावर सकाळी 3 फेब्रुवारी 20r206 त्यांचे मूळगाव कवठा (ता. औसा, जि. लातूर) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले डॉ. वाघमारे यांच्या निधनाने बहुजन समाजाचा स्वाभिमानाचा आधारस्तंभ हरपला असून ही पोकळी कधीही भरून न निघणारी आहे.
🙏 त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!
निर्मिक त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, हीच विनम्र प्रार्थना.
— सत्यशोधक शंकरराव लिंगे
राष्ट्रीय अध्यक्ष,l अखिल भारतीय माळी महासंघ
🙏🙏🙏🙏
📢 सोशल मीडिया संदेश
ही प्रेरणादायी बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
📲 आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा: 73 87 37 78 01
👍 लाईक करा | 🔁 शेअर करा | ▶️ सबस्क्राईब करा
📤 फॉरवर्ड करा | 💬 कॉमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबा — विसरू नका!
#DrJanardanWaghmare #LaturPattern #BahujanPrerna #PhuleShahuAmbedkar #ShikshanKranti #DinbandhuNews #ShivkrantiTV #Shraddhanjali #Marathwada




