मराठा आरक्षण विरुद्ध अॅड मंगेश ससाने, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 47

मराठा आरक्षण विरुद्ध अॅड मंगेश ससाने, प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ आबा वाघमारे आंदोलनानिमित्त
मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः 47
बिहार जातनिहाय जनगणना : ओबीसी चळवळीचे ‘जात्यंतक क्रांतीपर्व’
प्रा. श्रावण देवरे
बिहारचे मुख्यमंत्री मा. ना. नितीश कुमार यांनी प्रचंड विरोध पचवित व अनेक अडथळ्यांवर मात करीत आपल्या राज्यात जातनिहाय जनगणना पार पाडली. त्यांनी २ ऑक्टोंबर गांधी जयंती दिनी जनगणनेचे आकडे व माहिती जाहीर केल्यानंतर संपूर्ण देशात ताबडतोबीने त्याचे पडसाद उमटलेत. जातनिहाय जनगणनेचा विषय जातीव्यठस्थेशी निगडीत असल्याने त्यावर उमटलेल्या पडसादांचे वर्गीकरण स्वाभाविकपणे अब्राह्मणी व ब्राह्मणी या छावणीतच होऊ शकते. या दोन्ही छावण्यांची प्रातिनिधिक अभिव्यक्ती The Indian Express या दैनिकात प्रकाशित झालेली आहे. दिनांक १३ ऑक्टोंबर २०२३ च्या The Indian Express च्या अंकात योगेंद्र यादव व मनिष सभरवाल या दोन विचारवंतांचे जातनिहाय जनगणनेवरचे लेख प्रकाशित झालेले आहेत. स्वाभाविकपणे योगेंद्र यादव हे अब्राह्मणी छावणीचे प्रतिनिधीत्व करत आहेत तर मनिष सभरवाल हे ब्राह्मणी छावणीचे !
योगेंद्र यादवांनी जातनिहाय जनगणनेचा सरळ संबंध जातीअंताशी जोडलेला आहे. आपल्या लेखाच्या समारोपात ते स्पष्टपणे लिहितात-
……. जात जनगणनेमुळे ही अडवणूक मोडून काढण्यास, संधींच्या समानतेचे आणि बाबासाहेबांच्या जातीच्या उच्चाटनाचे संविधानिक वचन साकार होण्यास मदत होईल.” (जाड ठसा माझा)
जातनिहाय जनगणना आपल्याला संधींची समानता आणण्यासाठी मदत
करते व हा संवैधानिक मार्ग आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीअंताच्या
स्वप्नपूर्तीकडे नेतो, अशी स्पष्ट भुमिका योगेंद्र यादव घेतात. परंतू ब्राह्मणी छावणीचे प्रतिनिधी असलेले सभरवाल संधीच्या समानतेसाठी
गांधींचा सर्वोदयवादी मार्ग सूचवितात- Gandhiji believed that Sarvodaya (development of all) would be accomplished through Antyodaya (welfare of the weak)…”
गांधीवादाचा मार्ग जातीअंताचा नाही, तर तो जात-समन्वयाचा मार्ग
आहे! जातनिहाय जनगणनेमुळे आणखी जास्त आरक्षणाची मागणी वाढेल, अशी रास्त भिती सभरवाल यांनी व्यक्त केलेली आहे. परंतू सामाजिक न्यायासाठी आरक्षण आवश्यक आहे, असे म्हणत असतांना नेहमीची किंतू-परंतूची भाषाही ते वापरतात. आरक्षण हे सामाजिक न्यायापेक्षा राजकीय हेतूसाठीच वापरले जाते आणी म्हणून आता आरक्षण नष्ट करण्याची वेळ आलेली असतांना जातनिहाय जनगणना कशाला? असाही मुद्दा ते उपस्थित करतात.
फुले-पेरियार-आंबेडकरवादी अब्राह्मणी छावणीने जातीअंतासाठीचे मांडलेले सिद्धांत ब्राह्मणी छावणीला खोडून काढता येत नाहीत, म्हणून त्यांना त्या सिद्धांतांना नाईलाजास्तव मान्यता द्यावीच लागते, मात्र त्यात किंतू परंतू वापरून त्या सिद्धातांचे ते विद्रूपीकरणही करतात. जातनिहाय जनगणनेमुळे काही जात्यंतक संकल्पना व सूत्र अधिक ठळकपणे सिद्ध झाले आहेत, हेही आपण लक्षात घेतले पाहिजे.
फुले शाहू आंबेडकरी चळवळीत काही शब्द परवलीचे शब्द बनले होते. त्यात “साडे तीन टक्क्यांची संस्कृती” हा एक शब्द आहे. १९८२ साली कोल्हापूरला संपन्न झालेल्या विषमता निर्मूलन परिषदेत भटक्या-विमुक्तांचे नेते उपराकार लक्ष्मणराव माने यांनी सर्वप्रथम हा शब्द वापरला आणी तेव्हापासून तो चळवळीचे सूत्रच बनला. बिहारच्या जातनिहाय जनगणनेत ब्राह्मणांची लोकसंख्या नेमकी साडे तीन टक्केच सिद्ध झाल्याने तो शब्द आता देशाच्या जातीअंतक चळवळीसाठी परवलीचा शब्द ठरेल.
दुसरे आणखी एक जातीअंतक सूत्र कांशीराम साहेबांनी मांडले आहे. बहुजन समाज पक्षाची स्थापना १९८४ साली झाल्यानंतर ८५ विरुद्ध १५ चे सूत्र त्यांनी मांडले. नितीश कुमारांच्या जातनिहाय जनगणनेमुळे हे सूत्र आता देशाला अधिकृतपणे स्वीकारावे लागेल. कारण बिहारच्च्या जनगणनेत ‘तिलक-तराजू तलवार म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या उच्चजातीयांची लोकसंख्या १५ टक्के सिद्ध झाली असून शुद्रादिअतिशूद्रांची म्हणजे दलित-आदिवासी ओबीसींची लोकसंख्या तंतोतंत ८५ टक्के इतकी आलेली आहे.
बिहारच्या जातनिहाय जनगणनेने आणखी एक भ्रमाचा भोपळा फोडून टाकला आहे. बिहारमधील ठाकूर, भूमिहार यासारख्या जमीनदार जाती आपल्या लोकसंख्येची टक्केवारी प्रचंड फुगवून सांगायचे व राजकीय सत्तेत तेव्हढी भागीदारी सांगून आरक्षणही मागायचे ! ! परंतू जातनिहाय जनगणना झाली आणी या जातींनी निर्माण केलला भ्रमाचा भोपळा फुटला. या जनगणनेच्या आकडेवारीनुसार राजपूत ३.५ टक्के भूमिहार २.८ टक्के सिद्ध झाल्याने त्यांच्या अवास्तव दाव्यांना आता
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




