सोशल

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
41

 

ही प्रस्तुत नावीन्यपूर्ण मांडणी असून, पुढे १९३६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘अन्हिलेशन ऑफ दी कास्ट’ या ग्रंथात प्रस्तुत मांडणी मुद्देसूद आणि विस्ताराने मांडली आहे.

एक पुणेकर सत्यशोधक हरिश्चंद्र नारायणराव नवलकर यांनी शिवराम कांबळे यांचे ‘श्री शिवराम जानबा कांबळे यांचे चरित्र व पर्वती सत्याग्रहाचा इतिहास’ या पल्लेदार शीर्षकाचे विस्तारपूर्वक चरित्र लेखनास घेतले, या चरित्राला दस्तुरखुद्द कांबळे यांची प्रस्तावना आहे.

या चरित्राची आरंभिक लेखनाची जुळवाजुळव झाल्यानंतर लेखक नवलकर पोटदुखीच्या आजाराने अंचरुणाला खिळून राहिले. शेवटी याच आजारात नवलकरांचे ९ मार्च १९३० रोजी निधन झाले. पुढे हा अर्धवट ग्रंथ दस्तुरखुद्द शिवराम कांबळे यांनी पूर्ण केला. १९३० सालच्या एप्रिल महिन्यात (हनुमान प्रेस, पुणे बेचे मुद्रित करून) कांबळे यांनी हे चरित्र असिद्ध केले. तसे तर या चरित्रात अस्पृश्य निर्मूलन चळवळीचा क्रांतिकारी इतिहासही सामावलेला आहे. हा अबिडकर चळवळीच्या आरंभापूर्वीचा क्रांतिकारी दस्तऐवजही आहे.

संदर्भ- १. शिवराम जानबा कांबळे यांचे चरित्र व पर्वती सत्याग्रहाचा इतिहास- ह. ना. नवलकर, २. दीनबंधु आणि तानुबाई बिर्जे- जी. ए. उगले

कांबळे
गंगाराम यामाजी

गंगाराम यमाजी कांबळे, कोल्हापूरकर हे कोल्हापूर सत्यशोधक समाज शाखेचे सदस्य नसले तरी ते उराशी आयुष्यभर सत्यशोधक मत घेऊन जगले. गंगाराम कांबळे शाहू महाराजांचे सच्चे अनुयायी होते. गंगाराम कांबळे शाहू महाराजांच्या बावडा बंगल्यातील घोड्याच्या पागेत्त

मोतद्दार म्हणून नोकरीस होते. इ.स. १९११च्या सुमारास शाहू महाराज दिल्ली

दरबारासाठी दिल्लीस गेले असता गंगाराम कांबळे यांच्या जीवनात एक अमानुष

मारामारीची घटना घडली. त्याचे झाले असे की, दुपारचे जेवण आटोपल्यानंतर

कांबळे स्पृश्यांच्या हौदावर (मराठ्यांच्या) पाणी प्याले. या प्रकरणाचा पाहता

पाहता गवगवा होऊन सनातनी संतराम या कर्मचाऱ्याने कांबळे यांना बेदम मारहाण केली. या प्रकरणी पुढे त्यांच्यावर फेटा चोरल्याचा आळ घालून त्यांना पोलिस ठाण्यात डांबण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी कांबळे यांना न्याय तर दिलाच नाही, उलट तडजोड करण्यास सुचविले. दरम्यान, बेडर सत्यशोधक कांबळे या प्रकरणी नरमले नाहीत. उलट शाहू महाराज दिल्लीवरून कोल्हापुरास परतल्यावर कांबळे यांनी या अमानुष प्रकरणी न्याय मागण्यासाठी सोनतळी कॅम्पवर महाराजांची भेट घेतली. शाहू महाराजांनी या अन्यायी प्रकरणाची दखल घेऊन कांबळे यांना मारहाण करणाऱ्यांना चांगला चोप दिला. लगेचच शाहू महाराजांनी कांबळे यांना सेवेतून मुक्त करून कोल्हापुरातील

भाऊसिंगजी रस्त्यावर (दैनिक पुढारी कार्यालयासमोर) सोडावॉटरचे यंत्र खरेदी करून ‘सत्यसुधारक’ हॉटेल काढून दिले. शाहू महाराजांचे एक जवळचे नातेवाईक सत्यशोधक, ‘गरिबांचा कैवारी’ पत्राचे संपादक बाबूराव हैबतराव यादव यांच्या जागेवर ते हटिल काढले गेले, या हॉटेलची स्वच्छता आणि टापटीप वाखाणण्याजोगी होती. येथे शाहू महाराजांचा खडखडा मुद्दाम थांबत असे. शाहू महाराज नियमित येत आणि चहा घेत असत. फार पुढे इ. स. १९३९ साली कोल्हापुरान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आले असता त्यांनीही या हॉटेलचा चहा घेऊन आनंद…

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button