सोशल

मंडलनामा क्रमशः 11.देशव्यापी चळवळीत सहभाग

मंडलनामा क्रमशः

11.देशव्यापी चळवळीत सहभाग

 

महाराष्ट्रात मुस्लिम ओबीसी संघटना स्थापन झाली. मी माझ्या सहकाऱ्यांसह मुस्लिमांतील ओबीसी वर्गाशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू केला. हे काम अत्यंत कठीण. मला व माझ्या सहकाऱ्यांना ‘काफीर’ ठरवून विरोध होत असे. अर्थात त्यावेळी माझ्या कामाचा आवाकाही कमी होता. पण जेथे जाऊ तेथे ‘काफीर’ म्हणून हेटाळणी व विरोध होत होता. मी सच्चा मुसलमान व पाच वेळचा नमाजी असूनही ‘काफीर’ म्हणून होणारी हेटाळणी सहन होण्यासारखी नव्हती. पण, गरीब मुसलमान ओबीसींसाठी आयुष्य वेचायचे हा निग्रह ढळला नाही.

दरम्यान, १९८० मध्ये मोरारजी देसाई व चौधरी चरणसिंह यांचे सरकार पडून जनता पक्षाचा डाव आटोपला. केंद्रात पुन्हा एकदा इंदिरा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. त्यापूर्वी महाराष्ट्रातही राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेसमध्ये फूट पडून समाजवादी काँग्रेसची स्थापना झाली. जनता पक्ष, शेतकरी कामगार पक्ष व समाजवादी काँग्रेस यांची पुरोगामी लोकशाही आघाडी (पुलोद) स्थापन झाली व समाजवादी काँग्रेसचे तरुण नेते शरद पवार हे मुख्यमंत्री झाले. जनता पक्षाच्या माध्यमातून पूर्वीचा जनसंघही ‘पुलोद’चा भाग होता. या सरकारमध्ये समाजवादी विचाराच्या कट्टर समर्थक शांती नाईक व भाई वैद्य हे दोघे मंत्री होते. त्यांचे नेते साथी एस. एम. जोशी व साथी ना. ग. गोरे होते. या दोन नेत्यांना महाराष्ट्रात मोठा मान होता. एस. एम. जोशी यांच्या नेतृत्त्वाखाली संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढण्यात आला. त्यावरून त्यांच्या प्रभावाची कल्पना येईल.
‘पुलोद’ सरकार हे महाराष्ट्रातील पहिले आघाडी सरकार, या काळात शरद पवार हे तरुण नेतृत्व उदयास आले. केंद्रातील जनता पक्षाचे सरकार कोसळल्यानंतर निवडणूक झाली व इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान झाल्या. त्यांनी जनता पक्षाच्या काळात स्थापन झालेली राज्य सरकारे बरखास्त केली. ‘पुलोद’चा प्रयोग दोन वर्षात आटोपला. राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.

देशभर या राजकीय घडामोडी घडत होत्या. जनता पक्षाने नेमलेल्या मंडल आयोगाचे कामकाज मात्र सुरू होते. देशातील तमाम ओबीसी नेत्यांना आयोगाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. जनता पक्षाचे सरकार पडल्यामुळे ओबीसी नेत्यांकडून रेटल्या जाणाऱ्या मुद्यांना खीळ बसेल का, अशी स्थिती निर्माण झाली. त्यामुळे ओबीसींच्या भल्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक संघटन निर्माण होण्याची गरज चौधरी ब्रह्मप्रकाश, कर्पूरी ठाकूर आदी नेत्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती. त्यावेळी देशभरात आणखी एक नाव चर्चेत येत होते. ते होते कांशीराम. त्यांनी स्थापन केलेली शासकीय कर्मचाऱ्यांची ‘बामसेफ’ आणि ‘डीएस फोर’ या दोन संघटनांचा बोलबाला होता. त्यांनी सायकलवरून देश पिंजून काढण्यास सुरुवात केली. ते अत्यंत आक्रमक पण अभ्यासू मांडणी करत. केंद्र शासनातील उच्चाधिकारीपद सोडून सायकलवरून देशभर फिरत संघटना बांधत होते, यामुळे दक्षिण भारतातील द्रवीड चळवळीप्रमाणे उत्तर भारतात जनजागृती होऊ लागली. त्यांच्याकडे उत्तर भारतातील दलित आकर्षित होत होते.

यापूर्वी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मंडल आयोगाला मुदतवाढ दिली. ३१ डिसेंबर १९८० रोजी बी. पी. मंडल यांनी इंदिरा गांधी सरकारला अहवाल सादर केला. पण इंदिरा गांधी सरकार मंडल आयोगाच्या शिफारसी स्वीकारण्यास तयार नसल्याचे लक्षात येत होते. नंतरच्या काही वर्षात जनता पक्षातून फुट्न पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी (अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी इत्यादी) भारतीय जनता पक्ष स्थापन केला. भारतातील राजकीय परिस्थिती विविध विचारसरणीमध्ये विभागली जात होती. त्याचीही चर्चा व प्रभाव देशभर जाणवत होता. देशभरातील राजकीय वातावरण असे ढवळून निघत असताना ओबीसींच्या चळवळींनी जोर धरला.

महाराष्ट्रातील पुलोद सरकारच्या काळातील मंत्री शांती नाईक यांच्या काहीआठवणी येथे नमूद करणे महत्त्वाचे ठरेल. नाईक या जनता पक्षाच्या आमदार होत्या व दलित, ओबीसी इत्यादी सर्व परिवर्तनवादी चळवळींना त्यांचा पाठिंबा होता. त्या ओबीसी चळवळीत सक्रिय सहभाग घेत. जनार्दन पाटील यांचे नेतृत्व व आमदार शांती नाईक यांचा विधानसभेत रेटा यामुळे ओबीसी चळवळ गतिमान झाली. महाराष्ट्र शासनाने बापूची ओबीसींसाठी बी. डी. देशमुख समिती शिवाय काहीही केलेले नव्हते, दक्षिणेकडील राज्यांनी निरनिराळ्या प्रसंगी ओबीसीसाठी विविध निर्णय घेतले. त्यामुळे देशभरातील ओबीसी चळवळींपुढे दक्षिण भारतीय राज्ये आदर्श होती व आहेत. त्यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रानेही ओबीसीकरिता पुढाकार घ्यावा, असा दबाव सरकारवर वाढू लागला. परिणामी, ‘पुलोद’ सरकारने आमदार उत्तमराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुर्बल घटक अभ्यास समिती स्थापन केली. दक्षिण भारतात मागासवर्गीयांच्या विकासासाठी आर्थिक विकास महामंडळांची स्थापना करण्यात आली होती. त्याप्रमाणेच राज्यातही महामंडळ स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली. अर्थातच यावेळीही शांती नाईक आघाडीवर होत्या. या दबावातून सरकारने महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. यावेळी नाईक या मागास समाज संघर्ष समितीमध्ये सक्रिय होत्या. चळवळीचा वारसा व समाजवादी राजकारण यामुळे त्यांचा देशातील विविध नेत्यांशी उत्तम संपर्क असे. नाईक यांना माझ्याबद्दल विशेष ममत्व होते. मुस्लिम ओबीसींसाठी हा एकमेव कार्यकर्ता आपल्यासोबत चळवळीत आहे, याचे त्यांना खूप अप्रूप वाटायचे. मलाही त्यांचा व जनार्दन पाटील यांचा आधार वाटायचा.

आणिबाणीनंतरच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांना पराभूत केलेले समाजवादी नेते राजनारायण यांना आमदार नाईक यांच्याबद्दल आपुलकी होती. मुंबईत आल्यानंतर त्यांचा मुक्काम नाईक यांच्याकडेच असे. जनार्दन पाटील यांनीही महाराष्ट्रातील ओबीसी चळवळ देशपातळीवर जोडली. बिहारचे मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर, दिल्ली प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री चौधरी ब्रह्मप्रकाश, पेरियार रामस्वामी यांनी स्थापन केलेल्या द्रवीड चळवळीचे खासदार वीरमणी यांच्याशी जनार्दन पाटील हे सतत संपर्क ठेवून असत. त्यांच्यामुळे मी सुद्धा राष्ट्रीय चळवळीसोबत जोडला गेलो. मी जनार्दन पाटील यांच्यासोबत देशभर फिरलो. दक्षिण भारतात ओबीसी चळवळीत थोड्या प्रमाणात का होईना मुस्लिम कार्यकर्ते होते. पण महाराष्ट्र व उत्तर भारतातील राज्यात अशी स्थिती नव्हती.

तत्कालीन मुस्लिम नेतृत्व उच्चस्तरातील होते व मुस्लिमांवर काँग्रेसचा प्रभाव होता. सर्वसामान्य मुसलमान दोनवेळची भाकरी मिळवण्यात अडकलेला. शिक्षणाच्या आघाडीवर प्रचंड अनास्था, जास्त शिकून काय करायचे?, हा दृष्टिकोन ऐंशीचे दशक उजाडले तरी बदलला नव्हता. सर्वसामान्य मुसलमानांवर धार्मिक नेत्यांचा पगडा. निवडणुकीत हिंदू-मुसलमान केले की झाले. मांचे ठेके घेणारे तयार होतेच. त्यावेळी ‘ओबीसी’ हा शब्दही मुसलमानांना माहीत असणे अशक्य होते.

या काळात महाराष्ट्रात मी एकटा मुसलमान हिंदू धर्मातील ओबीसी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून देशभर फिरत होतो. उत्तर भारतात जेव्हा जेव्हा ओबीसींच्या बैठका, परिषदा होत, तेथे मला पाहून तत्कालीन ओबीसी नेत्यांना बरे वाटे. ते माझ्या भूमिकेचे स्वागत करत. या चळवळीत टिकून राहण्याचा सल्ला देत. त्याचवेळी चळवळीत मुसलमान सक्रिय का होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत.

अॅड. जनार्दन पाटील व आमदार शांती नाईक हे दोघे राष्ट्रीय स्तरावरील ओबीसी नेत्यांसोबत माझ्या ओळखी करून देत. हा तरुण महाराष्ट्रात मुस्लिम ओबीसी संघटना चालवत असल्याचे सांगत. कर्पूरी ठाकूर व चौधरी ब्रह्मप्रकाश यांनीही मला सतत प्रेरणा दिली. या दोन नेत्यांमुळे माझ्यात मुसलमानात ओबीसी चळवळ रुजवण्याकरिता अविरत संघर्ष करण्याची जिद्द निर्माण झाली. हे दोन्ही नेते हयात असेपर्यंत मला सतत मदत करत. मी त्यांचा कायम ऋणी आहे.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button