महाराष्ट्रात युपी बिहार तामिळनाडू पॅटर्न येणार जो ओबीसी की बात करेगा वही राज करेगा! सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे

*महाराष्ट्रात युपी बिहार तामिळनाडू पॅटर्न येणार जो ओबीसी की बात करेगा वही राज करेगा!
सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे* 🟨संपादकीय
🟡🟡🟡🟡
महाराष्ट्रात पहिल्यांदाच मराठा समाजाचे 32 खासदार!
🟠🟠🔴🔴
ओबीसी जैन ख्रिश्चन आदिवासी एससी एसटी ओरिजनल आरक्षण धारकांना धोक्याची घंटा
राज्यातील २६ नवे खासदार मराठा प्लस कुणबी सहा
🟢🟢🟢🟢
४८ खासदारांपैकी ९ ओबीसी, ६ अनुसूचित जातींचे, तर ४ अनुसूचित जमातींचे
राज्यातील नवनिर्वाचित ४८
खासदारांपैकी २६ खासदार हे मराठा समाजाचे, तर नऊ ओबीसी आहेत. अनुसूचित जातींचे सहा खासदार निवडून आले. अनुसूचित जातींचे सहा, तर अनुसूचित जमातींचे चार खासदार आहेत. वर्षा गायकवाड ताई एक महिला अनुसूचित हजारो वर्ष मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवलेल्या जातीच्या असल्या तरी त्या खुल्या मतदारसंघातून सत्ताधारी बीजेपी पक्षाचे प्रस्थापित नामांकित सरकारी मोठाले पगार मेहनताना घेतलेले उच्चविद्या विभूषित एडवोकेट उज्वल निकम यांना टक्कर देऊन विजयी झालेल्या
एकमेव खासदार ठरल्या आहेत.
विजयी झालेल्या वर्षाताई गायकवाड शूर मर्दानी वाघिणीचा आम्हाला अभिमान वाटतो!
त्यांचे हार्दिक अभिनंदन!
💐💐💐💐
🦉🦅🌷🍄🟫🌾🍄🪨🪸🍁🍂🌹🎄🌳🌞🌻🌼🌺🌺🪷🥀🥀🟨🟩⬜🟦🟪🟨🟥
राज्यात नेहमीच मराठा समाजाच्या खासदारांची संख्या अधिक राहिली आहे. त्यावेळीही तेच चित्र दिसून येते. जरांगे च्या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा या निवडणुकीत महत्त्वाचा ठरला
🔴🔴🔴🔴
जातीय समीकरणे नेहमीच निवडणुकीत निर्णायक असतात आहेत.
अनुसूचित जमातींचे खासदार अनुसूचित जातींचे खासदार
१ ) भास्कर
भगरे २) डॉ. हेमंत सावरा ३)
डॉ. नामदेव किरसान
४) गोवाल पाडवी
अनुसूचित जमातीचे
१) बळवंत वानखेडे २) भाऊसाहेब वाकचौरे ३) प्रणिती शिंदे
४) वर्षा गायकवाड ५) श्यामकुमार बर्वे ६) डॉ. शिवाजी काळगे.
मराठा समाजाच्या विजयी खासदार महाविकास आघाडीतर्फे २६ पैकी १४ जण निवडून आले टक्केवारी ५४ इतकी आहे. एक अपक्ष आहेत. काँग्रेस मध्ये सामील झाले
महायुतीतर्फे ११ मराठा उमेदवार जिंकले. त्यांची टक्केवारी २३ आहे.
ओबीसी समाजाच्या खासदारांची एकूण टक्केवारी १९ इतकी आहे. त्यातील ३ महायुतीचे आहेत. महायुतीच तर ६ जण महाविकास आघाडीचे आहेत. काँग्रेसमध्ये संख्या ज्यादा
३ खासदार खुल्या प्रवर्गातील आहेत. त्यांची टक्केवारी केवळ सहा इतकी आहे म्हणजे ओबीसी कमी नाही प्रस्थापित पक्ष तिकीट देत नाहीत ओबीसी कडे कॅपॅसिटी नाही असा माहोल तयार करतात 60% ओबीसीला फक्त सहा टक्के जागा देऊन किती अन्याय केला ओबीसींना अन्याय सहन करण्याची सवय आहे हाच अन्याय मराठ्यावर झाला तर जलबीन मछली नृत्य बिन बिजली तांडव बघायला मिळेल 1999 ला पवार साहेब पुन्हा एकदा बाहेर पडले आणि सांगितलं सर्व समाज घटकाला समान वाटप करायचं आणि ज्यावेळेला तिकीट वाटप करायची वेळ आली त्यावेळी त्यांच्याबरोबरचे प्रस्थापित सगळे पळून जाण्याच्या तयारीत लागले त्यामुळे पुन्हा त्याने प्रस्तावना टिकीट दिले आणि मग कधी 56 तर कधी71 65 कधी 44 आमदारावर आले त्यांना कधीच तीन आकड्यात आमदारांची संख्या नेता आली नाही त्याचं एकमेव कारण इच्छा असून सुद्धा तिकीट वाटप सर्व समाजाला समान न्याय देता आला नाही नाशिकराव तिरपुडे साहेब े एका दलित नेत्यांनी करून दाखवलं दोनशेच्यावर आमदार निवडून आणून दाखवले ते प्रस्थापित पवार साहेबा कधीच करता आलं नाही हे त्रिवार सत्य आहे सत्य कडवा असतं म्हणून कोणी सांगत नसतं!
त्यांनी 1999 ला सर्व समाजाला समान वाटप केलं असतं तर ते देशाचे पंतप्रधान झाले असते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ झाले असते!🟡🟡🟡🟡🟡🟡
मराठा समाजाचे खासदार
१) स्मिता वाघ, २) शाहू छत्रपती ३) डॉ. शोभा बच्छाव ४) नारायण राणे ५) श्रीकांत शिंदे ६) उदयनराजे भोसले ७) नरेश म्हस्के ८) विशाल पाटील ९) सुप्रिया सुळे १०) मुरलीधर मोहोळ ११) श्रीरंग बारणे १२) धैर्यशील मोहिते १३) धैर्यशील माने १४) संजय देशमुख १५) अरविंद सावंत १६) प्रतापराव जाधव १७) राजाभाऊ वाजे १८) नीलेश लंके १९) ओमप्रकाश राजेनिंबाळकर २०) डॉ. कल्याण काळे २१) संदीपान भुमरे २२) वसंत चव्हाण २३) नागेश आष्टीकर २४) संजय जाधव २५) बजरंग सोनवणे २६) अनुप धोत्रे
ओबीसी खासदार
१) रक्षा खडसे २) प्रतिभा धानोरकर, ३) सुनील तटकरे ४) रवींद्र वायकर ५) डॉ. अमोल कोल्हे ६) डॉ. प्रशांत पडोळे ७) अमर काळे ८) संजय दिना पाटील ९) सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे खुला प्रवर्ग – १) नितीन गडकरी ब्राह्मण २) पीयूष गोयल अग्रवाल ३) अनिल देसाई सारस्वत ब्राह्मण.
ओबीसी एल्गार सभेला विरोध केला अशा उमेदवारांना सढळ हाताने मतदान केले नाही पंकजा ताई मुंडे धनंजय मुंडे यांची गत घर का ना घाट का झाली उंटाचा वट खायला मिळेल म्हणून दिवसभर उपाशी राहिल्या दिवसभर कष्ट करावे लागलं पण उंटाचा वट कधी खायला मिळाला नाही मिळत नाही हे कोल्यांच्या पिल्लाला कळत नाही त्याप्रमाणे त्यांची आणि महादेव जानकर यांची गत झाली जानकर कोणत्या च सभेत एक मिनिट पण बोलत नव्हते वर्ध्यातील रामदास तडस आणि भिवंडीतील कपिल पाटील यांनी जाणून-बुजून सभा फेल केल्या त्यांचं तंत्र फार मोठं आणि चांगलं होतं स्वतःचा भरपूर पैसा खर्च करून चांगलं भलं मोठं स्टेज जरुरी पेक्षा चौपट खुर्च्या लावून रिकाम्या खुर्च्या चे फोटो टाकून प्रमुख नेते सभेला येणार नसल्याचे सांगून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला आणि सभा फेल केल्या त्यामुळे ओबीसी समाजाने जाणकाराने त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवली राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठ्यांची बाजू घेत भुजबळ साहेबांचा राजीनामा मागितला त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील स्टॅंडिंग खासदार यांना घरी बसवलं माळ्याचे स्टॅंडिंग खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे म्हणून संसदेत भाषण केलं होतं ते ओबीसी विसरले नाहीत त्यांना फलटणमध्येच थांबवलं पंढरपूर तारापूर नाला येथे माळी समाजाच्या अपंग अनाथ तरुणास ठार मारले कोणत्याही पुढाऱ्याने चौकशीसाठी सहभाग दिला नाही त्यामुळे सोलापूर मतदार संघातील दिग्गज आमदारांचे ओबीसी ने ऐकले नाही स्टॅंडिंग शीट गेली नाशिक मध्ये छगनरावजी भुजबळ साहेब यांना डिवचल आशा दाखवली त्यांचा अपमान केला म्हणजेच ओबीसीचा अपमान केला नाशिक आणि दिंडोरी ओबीसी ने दोन्ही ठिकाणच्या सेटिंग उमेदवारांचा गेम केला भुजबळ साहेबांना ओळखलं नाही तार प्रचारक असताना त्यांचा उपयोग करून घेतला नाही हे ओबीसींच्या ज्वारी लागलं साहेबांनी कुठेही न सांगता ओबीसी ने शिर्डी धुळे नंदुरबार शिरूर या ठिकाणचे महायुतीचे उमेदवार हारले सांगलीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या गाडीला चपलाचा हार घातला गावोगावी गाव बंदी केली प्रचार करू दिला नाही ओबीसीने दोन्ही प्रस्थापित उमेदवारांचा काटा काढला म्हणजेच एका मतदारसंघात 25 ते 50 पर्यंत उमेदवार उभे राहिले त्यांनी खाल्लेल्या मताची बेरीज केली तर पडलेले उमेदवार त्या मतापेक्षा कमी मताने पडलेले आहेत त्यामुळे 30 ठिकाणी सत्ताधारी महायुती पक्ष आणि 17 ठिकाणी महाविकास आघाडीला फटका बसला आहे त्यामुळे ओबीसी जागृत नाही असे समजू नका आता सुरुवात झालेली आहे मराठा समाज राजकारणामध्ये राजे राजवाड्यापासून आहे साधन संपत्ती आहे पाटील देशमुख सर्व देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ट्रस्टी जमीनदार जागीरदार वतनदार सर्वकाही त्यांच्याकडे आहे शिवाय देश स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसने जे पाहिजे ते दिले शाळा कॉलेज बॅंका सहकारी संस्था कर्जमाफी सबसिडी अनुदान भरपूर संस्थांना दिलेल तरीसुद्धा ते त्यांना सोडून गेलेले आहेत आता वेळ आलेले आहे काँग्रेसने सुद्धा 1980 चा पॅटर्न वापरण्याची
सर्व प्रस्थापित शरद पवार साहेबासहित काँग्रेसला सोडून गेले होते तरीसुद्धा नाशिकराव तिरपुडे अंतुले साहेब यांच्या नेतृत्वाखाली 200 च्या वर आमदार आले होते त्याची पुनरावृत्ती करायची असेल तर प्रस्ता पिताना सोडून जर काँग्रेसने तिकीट दिलं तर काँग्रेस आजही मजबूत स्थितीमध्ये येऊ शकते भाजपने तर आत्ता जरूर प्रयोग केला पाहिजे त्यांना मराठा समाज अजिबात मतदान करत नाही करणार नाही पुढे भाजपने मराठा सोडून उमेदवार दिले तरच भाजपा तरुण निघू शकते मग मग तुतारी असू द्या मशाल असू द्या घड्याळ असू द्या नाहीतर धनुष्यबाण असू द्या या सगळ्यांनी सर्व मराठ्यांना तिकीट दिले तरी चालेल बघूया कोण निवडून जास्त येते ते. एकदा प्रयोग तर करून बघा भाजपबरोबर काँग्रेसवाले नाहीतर कामातून गेलोच म्हणून समजा बघा नितीश कुमार यांनी जात निहाय जनगणना केली आणि जाहीर पण केली त्यांना भरघोष यश मिळाले काँग्रेसने अनेक राज्यांमध्ये जनगणना केली जाहीर केली नाही देशांमध्ये केली जाहीर केली नाही बीजेपी नतर जात निहाय जनगणना करायचंच नाही असं ठरवलेलं आहे बघा अखिलेश यादव पीडी ए फॉर्मुला वापरला महासत्तेला वन थर्ड केलं आता एकदा जातिवाद झालाय तर झालाच आता बघूया आता गावागावात भावा भावात अन जावाजवात ननंद भावजईच भावा बहिणीचं आईचं मुलीचं बापाचं पोराचं भांडण लावून ठेवलेली आहेत विष पेरलेले आहे लोकसभेच्या निमित्ताने चांगली उगवण झालेली आहे हे पीक आता वाढणार आहे त्यामुळे मुख्य लढत ही आता ओरिजनल आरक्षण वाले मराठा यांच्यातच होणार आहेत आता एका निवडणुकीमध्ये मराठा समाजाला घवघवीत यश आलेला आहे धष्टपुष्ट घोड्याने सर्व खाऊन फस्त झाले कमजोर ओबीसींना लाथा मारू लागले बघूया आता ओबीसी ओरिजनल आरक्षण वाले मरता क्या नही करता याची प्रचिती दाखवल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक निवडणुकीत आता आमने-सामने होणारच! कुणी कितीही दबाव टाकू द्या कोणी कितीही अन्याय करू द्या कितीही बारा बलुतेदार ला अल्पसंख्याकांना त्रास देऊ द्या जेवढा त्रास होईल तेवढा ओबीसी मजबूत होईल जसे पैलवानला जास्त फटके मारल्यानंतर पैलवानाच शरीर मजबूत होतं त्याप्रमाणे ओबीसी मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही युपी बिहार तामिळनाडू पॅटर्न महाराष्ट्रात येणारच! जय ज्योती जय क्रांती जय संविधान सत्यमेव जयते जागो ओबीसी जागो! 💐💐💐💐 शिवक्रांती टीव्ही दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01




