मोदीची लाट ओसरली!

मोदीची लाट ओसरली!
विरोधी पक्षाकडून आयात केलेल्या ‘स्व’ गमावलेल्या लोकांची संख्या भाजपमध्ये ३० टक्क्यांपेक्षा वाढली. कालांतराने, संख्या चालल्या मंडळींनी केवळ भाजपमध्ये सारे आयुका घातलेल्या हयात निष्ठावंत मंडळींवर मात केली. मोदींनी एका दगडात दोन पक्षी मारले. विरोधी पक्ष फोडले आणि भाजपलाही संपविले. क्षात्रतेज नसलेली ही आहे लढाईची अनोखी व्यापारी पध्दत !
मोदी परत सत्तेत आले तर पहिला वार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर होणार हे नक्की. गोरखपूरचे मठाधीश योगी वाह्यात हिंदुत्ववादी असले तरी ते ठाकूर असून ब्राह्मणविरोधी आहेत. पंतप्रधान पदासाठी ते भविष्यात मोदी-शहांना पक्षांतर्गत स्पर्धक ठरतील, अशी शक्यता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा खरे म्हणजे भाजपचा बाप! पण मोदी या वांड पोरापुढे हा बाप हतबल झालेला. त्यामुळे मोदी व योगी यांच्यात सत्तेसाठी स्पर्धा झाली तर रा स्व. संघ योगीच्या बाजूने राहील याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. म्हणून योगींचा काटा काढायचा. मुख्यमंत्री योगींनाही हे जाणवले. त्यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आजवर निष्ठावंत असलेल्या ठाकूर जमातीचा राजस्थान, उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये उठाव घडवून आणला. रजपूत मंडळी पंचायती जमवून, हातात गंगाजल घेऊन भाजपच्या विरोधात मतदान करण्याची सामुदायिक प्रतिज्ञा करत आहेत. त्यामुळे भाजपच्या १० ते १२ खासदारांना अपयशाचा फटका बसणार हे निश्चित आहे.
हुकूमशहांची हीच भानगड असते. ते बघता बघता एकेकाचा काटा काढीत सर्वंकष सत्ता आपल्या मुठीत घेतात. हे करताना त्यांना विरोधाचे सूर ऐकूच येत नाहीत. त्याबाबत ते कर्णबधीर होतात. अनेक बंडे मोडून काढल्यानंतर ते निर्धास्त बनतात. त्यांना अंतर्गत बंडाचा सुगावा लागत नाही. मोदींचा अहकार इतका फुगला, की आपण एकट्याच्या बळावर लोकसभेत ४०० जागा मिळवू शकू असा त्यांना भ्रम झाला. भ्रमशुध्दीशिवाय हुकूमशहांना पुढे जाता येत नसते. हिटलर हुकूमशहा बनू शकला, पण अखेरपर्यंत तो भ्रमातच राहिला. शेवटी त्याला, त्याच्या प्रेयसीला व मंत्रिमंडळाला आत्महत्या करावी लागली हुकूमशहाला सुखासुखी सत्ता सोडता येत नाही. त्याच्या स्वभावातली सभ्यता व सुसंस्कृतता कधीच मेलेली असते. सत्ता गमावली आहे आणि हुकूमशहा हा साध्या व सभ्य माणसाप्रमाणे जीवन जगतो आहे, असे इतिहासात
सत्याग्रही विचारधारा
मोदीची लाट ओसरली
🟡🟡🟡🟡
पायाहरण नाही. त्याने सत्तेसाठी अनेक लोकांचे मुडदै पाडलेले असतात, नंतर तीच भुते त्याच्याभोवती पिंगा घालू. जगतात. म्हणून सत्ता गेल्यानंतर ती सामान्य माणसाचे जीवन जगू शकत नाही.
भाजप व संघ परिवारात असणाऱ्यांना अंधश्रध्द बनावेच लागते. हिंदू राष्ट्र निर्मितीच्या मागे कोणताही तर्कसंगत राष्ट्रभक्तीचा विचार नाही. म्हणून हिंदुत्ववादी संघटनांना मोगल बादशहांच्या क्रौर्याच्या, हिंदू समाजावर त्यांनी केलेल्या अत्याचाराच्या दंतकथा रंगवून सांगणे आवश्यक असते. भारतात अल्पसंख्य असलेल्या मुस्लीम मतदानाच्या आधारे परत मुस्लिमांचे साम्राज्य स्थापन होईल, अशा कपोलकल्पित कहाण्या सांगून हिंदूंच्या मनात भय उत्पन्न करणे म्हणजे यांचे हिंदुत्व। त्यांच्या नजरेत प्रत्येक मुसलमान हा अफझलखान तरी किंवा औरंगजेब तरी असतो. इतिहासात मोडतोड करून ले आपले म्हणणे रेटून नेत असतात. शेवटी स्वयंसेवक त्यांची साथ तरी सोडतो किंवा अंधभक्त बनून नेत्यांना शरण जातो. मोदींनी स्वयंसेवकाची ही नस बरोबर ओळखली. खोटे बोलण्याचा इतका विक्रम करायचा की आपला अनुयायी अंधभक्त होऊन त्याने त्याचा मेंदू आपल्या चरणावर अर्पण केला पाहिजे, याउलट, एखाद्याने आपली बुध्दी स्वतंत्रपणे वापरली तर त्याला संपवून टाकायचे. मग भले तो स्वपक्षातला असो.
या पार्श्वभूमीवर मोदीग्रस्त भाजप एक पक्ष म्हणून खूप दुर्बल झाला. एखादा ढेरपोट्या अतिलठ्ठ माणूस असावा, पण त्याच्या स्नायूमध्ये शक्तीहीनता असावी, असे या पक्षाचे झाले. कोणत्याही सत्ताधारी पक्षात असे दोष आपोआप शिरतातच. पण मोदींच्या एकाधिकारशाहीमुळे भाजपत असे दोष अधिक आले. महात्मा गांधी हयात असताना स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वातंत्र्य ब्रिटीशांनी दिले होते. त्यामुळे निवडणुका सुरू झाल्या. तेव्हा मतदार मर्यादित होते. मतदार होण्यासाठी मालमत्ता व शिक्षण हे दोन निकष होते. स्वातंत्र्य सैनिकांवर मात करणारा एक वेगळाच हितसंबंधी वर्ग त्यावेळी काँग्रेसमध्ये घुसू लागला. साधी राहणी, व्रतस्थपणा, सुतकताई, खादीचा वेष, सर्वधर्मसमभाव आणि कारावास ही गुणवैशिष्ट्ये असलेला स्वातंत्र्य सैनिक बाजूला पडू लागला आणि काँग्रेसची उमेदवारी मिळवणारा पारंपरिक सत्ताकांक्षी वतनदार वर्ग काँग्रेसमध्ये प्रवेश करू लागला. यावर उपाय म्हणून गांधींनी त्यांच्या मृत्यूपूर्वी काँग्रेसचे रूपांतर लोकसेवा संघात करावे आणि निवडणुका लढविणारा वेगळा पक्ष
🔴🔴🔴🔴🔴🔴शिवक्रांती टीव्ही न्यूज
🌹💐💐💐💐💐💐💐
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐🔴🔴🔴🔴




