टॉप न्यूजमहाराष्ट्रसोशल

विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघ भोसरीचा अखिल भारतीय माळी महासंघाला पाठिंबा

विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघ भोसरीचा अखिल भारतीय माळी महासंघाला पाठिंबा

भोसरी (पुणे) प्रतिनिधी: एमआयडीसी भोसरी येथील विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघ, भोसरी (पुणे) ही पुण्यातील अग्रगण्य सामाजिक संस्था आहे. या संस्थेची महत्त्वपूर्ण बैठक दिघी येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

या बैठकीस अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश भाऊ हिराळकर हे प्रमुख पाहुणे होते.

बैठकीमध्ये सध्याच्या ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्याय, माळी ओबीसी समाजाच्या प्रलंबित मागण्या, आणि विविध सामाजिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेनंतर पुण्यातून संघटनेने भोसरी येथून तहसीलदार साहेबांना निवेदन देण्याचा ठरवले. निवेदनाचा मसुदा शंकरराव लिंगे यांनी तयार केला.

लवकरच या विभागातील आरक्षण धारक ओबीसी, १२ बलुतेदार, भटक्या-विमुक्त, आणि जाती-जमाती यांच्या संघटनांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहून निवेदन देण्यात येईल, अशी घोषणा संघाच्या वतीने करण्यात आली.

याशिवाय, राज्य व देश पातळीवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवर संघ ही अखिल भारतीय माळी महासंघाच्या बरोबरीने संलग्न संस्था म्हणून कार्य करणार असल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत शिरोमणी सावता महाराजांना वंदन करून सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी सावता महाराजांची आरती केली. तसेच शंकरराव लिंगे आणि रमेश भाऊ हिराळकर यांचा सत्कार विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघाच्या वतीने करण्यात आला.

शंकरराव लिंगे यांनी माळी समाजाच्या मागण्या, अन्याय, आरक्षणाचे प्रश्न आणि विविध आंदोलनांची माहिती सविस्तरपणे दिली.

शेवटी, सर्वांनी एकमताने अखिल भारतीय माळी महासंघाच्या संलग्न राहून काम करण्याचा ठरव केला. कार्यक्रम अत्यंत आनंदमय वातावरणात संपन्न झाला. बैठकीस संस्थेचे पदाधिकारी, अध्यक्षश्रि.दामोदर गाडगे .सुखदेव वानखेडे उपाध्यक्ष” “सौ.कल्पनाताई धाडसे‌ उपाध्यक्ष), गजानन निमकर्डे (सचिव), श्रीकृष्ण वावगे (माजी अèध्यक्ष), सुखदेव उमरकर (संस्थापक अध्यक्ष), शरद भाऊ अत्तरकार (संघटक), श्रीकृष्ण अत्तरकार (कार्याध्यक्ष), राजेंद्र रोटे (संघटक), रवींद्र घाटे (संघटक), दिनेश भाऊ धाडसे (संघटक) यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. :::

📰 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

📱 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.

👍 बातमी लाईक करा
🔄 शेअर करा
📲 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
🔔 YouTube चॅनल Subscribe करून Bell Icon दाबायला विसरू नका.

समाजाच्या न्याय, हक्क आणि आरक्षणाच्या लढ्यात सहभागी व्हा!हॅशटॅग्स :

#दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #सत्यशोधकशंकररावलिंगे #अखिलभारतीयमाळीमहासंघ #विदर्भमाळीसमाजउत्कर्षसंघ #भोसरी #पुणे #ओबीसी #OBC #माळीसमाज #आरक्षणबचाव #सावतामहाराज #सामाजिकएकजूट #समाजहित #बहुजनआंदोलन #ओबीसीजनगणना #१२बलुतेदार #भटक्याविमुक्त #सामाजिकन्याय #महाराष्ट्र #BahujanMovement #MaliSamaj #OBCRights #DinBandhuNews #ShivkrantiTV #SocialJustice #ReservationRights #PuneNews #BhosariNews

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia

gem visa