सोशल

1 में महाराष्ट्र दिन व कामगार दिन विशेष लेख.

1 में महाराष्ट्र दिन व कामगार दिन विशेष लेख.

साभार :- व्याख्याते परमेश्वर बनकर, बीड 9503288282

1 में हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून आणि कामगार दिन म्हणून ही साजरा होतो.1 में हा महाराष्ट्र तसेच गुजरात या दोन राज्याचा स्थापना दिवस आहे. कारण 1में 1960 रोजी मुंबई प्रांतातून मुंबईसह महाराष्ट्र व गुजरात अशी दोन स्वतंत्र राज्य अस्तित्वात आली. म्हणून महाराष्ट्र तसेच गुजरात मध्ये हा दिवस स्थापना दिन म्हणून साजरा होतो.

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947 नुसार भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र देशाची घोषणा करण्यात आली होती.या कायद्याने भारत आणि पाकिस्तान हीं दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण होऊन भारतातील संस्थानिक सार्वभौम झाले होते. त्यांना भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचा अधिकार प्राप्त झाला होता. परंतु पुढे जवळपास सर्वच संस्थानिक भारतातच विलीन झाले. काश्मीर, जुनागढ, हैद्राबाद हे संस्थान तर स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झाली.

भारत स्वातंत्र्यानंतर भारतावरील ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आली, परंतु हजारो वर्षांपासून भारताच्या विविध भागात अनेक भाषिक व सांस्कृतीक प्रदेश निर्माण झाले होते.स्वातंत्र्यामुळे ब्रिटिश अधिपत्याखाली असलेले प्रांत व संस्थान भारतात विलीन करून घेताना भाषिक तत्वावर विलीन करून घ्यावेत हीं मागणी पुढे आली. कारण 1947 पूर्वीच भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीच्या मागणीने जोर धरला होता.1905 मध्ये बंगाल मध्ये तर 1917 मध्ये तेलगूभाषिक लोकांनी मद्रास प्रांतातुन आंध्रप्रदेश वेगळा करण्याची मागणी केली होती.
1920 च्या नागपूर येथील काँग्रेसच्या अधिवेशनात सुद्धा भाषावार राज्य पुनर्रचनेच्या तत्वांचा स्वीकार करण्यात आला होता.त्यामुळे स्वातंत्र्यानंतर या मागणीने जास्तच जोर धरला होता.

भाषावर प्रांत रचनेच्या मागणीचा विचार करून भारतीय संविधान सभेच्या अध्यक्षानी राज्य पुनर्रचनेबाबत शिफारस करण्यासाठी एस. के. धर आयोग नेमला. मात्र या आयोगाने भाषा हा निकष मान्य केला नाहीं. जे. व्ही. पी. समिती स्थापन झाली. ज्या मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभाई पटेल व पट्टाभी सीतारामय्या यांचा समावेश होता. या समितीने ही भाषिक निकषाला अनुमती दर्शवली नाही. त्यामुळे तेलगूभाषिक प्रदेश असलेल्या लोकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली.यातूनच पोट्टी श्रीरामलू या आंध्र व्यक्तीने उपोषण सुरु केले. 52 दिवसांच्या उपोषणानंतर त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे लोकांमध्ये जास्तच असंतोष निर्माण झाला शेवटी सरकारने तात्काळ आंध्रप्रदेशाच्या निर्मितीची घोषणा करून राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करण्याचे आश्वासन दिले.यातूनच 1953 ला राज्य पुनर्रचना आयोग (फाजल अली ) स्थापन झाला.या आयोगाने भाषिक आधारावर राज्यांची पुनर्रचना करण्याच्या तत्वास अनुकुलता दर्शवली परंतु एक राज्य एक भाषा या तत्वाचा स्वीकार केला नाही.
इकडे गुजराती व कच्छी भाषिक लोकांसाठी गुजरात व मराठी व मराठीला धरून असलेल्या भाषिकासाठी महाराष्ट्र राज्य हीं मागणी पुढे आली. त्यावेळी मुंबई प्रदेशात हा महाराष्ट्र व गुजरात हे दोन भाग होते

मुंबई हा भाग गुजरातला द्यावा अशी मागणी गुजराती करत होते तर महाराष्ट्रीयन आंदोलन कर्ते मुंबई महाराष्ट्रातच राहावी या साठी रस्त्यावर उतरले होते. तत्कालीन काँग्रेस सरकार सुद्धा मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून कामगारांचा विराट मोर्चा त्यावेळेसच्या फ्लोरा फाउंटन (हुतात्मा स्मारक ) या ठिकाणी जमला होता, मोरारजी देसाई हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते. त्या वेळेस च्या सरकारने आंदोलन कर्त्यांवर गोळीबार केला ज्या मध्ये 106 आंदोलनकारी मरण पावले ज्यांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्मारक बांधण्यात आले. या बलिदानामुळे आंदोलन आणखी तीव्र झाले.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अनेक आंदोलनकारी, विचार वंत यांनी सुद्धा मागणी लावून धरली होती, या मध्ये अनेक नावे आपल्याला सांगता येतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कॉ. अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, गव्हाणकर, प्रबोधनकार ठाकरे असे अनेक नाव आपल्याला सांगता येतील. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन तत्कालीन सरकारने 1 में 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र व गुजरात या दोन स्वतंत्र राज्याची स्थापना केली. तेंव्हा पासून 1 में हा दिवस महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.
1 में हा दिवस आंतराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून सुद्धा साजरा केला जातो त्या बद्दल ही माहिती असणे गरजेचे आहे. सर्वप्रथम ऑस्ट्रेलिया मध्ये 21 एप्रिल 1856 मध्ये कामगारांच्या समस्या त्यांचे प्रश्न इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन कामगारांना न्याय देण्याच काम ऑस्ट्रेलिया मध्ये झालं होतं. त्यातुनच प्रेरणा घेऊन अमेरिका व इतर देशांमध्ये सुद्धा कामगार चळवळी पुढे आल्या अमेरिके मध्ये 1 में 1880 मध्ये कामगारांनी काढलेल्या मोर्च्यावर गोळीबार झाल्याने काही आंदोलनकारी शहीद झाले. यातूनच पुढे जनता व पोलीस हा वाद वाढत गेला. पुढे अमेरिकेतील कामगारांना सुद्धा न्याय मिळाला परंतु आंदोलना मध्ये शहीद झालेल्या लोकांच्या स्मरणार्थ 1 में हा दिवस जगभरात कामगार दिन म्हणून साजरा होऊ लागला. भारतातील कामगारांसाठी सुद्धा रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे न्याय मिळाला. आणि भारतात सुद्धा 1 में हा दिवस कामगार दिन म्हणून साजरा होऊ लागला.

महाराष्ट्र दिन कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
💐💐💐💐💐💐💐💐
सत्यशोधक शिवक्रांती टीव्ही न्यूज

ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
💐💐💐💐💐💐💐💐

शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे

७३८७ ३७७८ ०१

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button