ओबीसींच्या स्वाभिमानासाठी १७ – परभणी लोकसभा निवडणूक २०२४ साठी श्रीमान महादेवजी जानकर साहेबांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

🔴🔴🔴🔴ओबीसींच्या स्वाभिमानासाठी १७ – परभणी लोकसभा निवडणूक २०२४ साठी श्रीमान महादेवजी जानकर साहेबांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
🔴🔴🔴🔴 महाराष्ट्रातील ओबीसी बहुजन बांधव श्री प्रकाश आण्णा शेंडगे, श्री छगन भुजबळ, श्री महादेवजी जानकर आणि सहकाऱ्यांनी ओबीसी आरक्षणाचे संरक्षण व्हावे म्हणून छातीची ढाल करुन लढले.
दबावाच्या, दहशतीच्या काळात ओबीसींना सर्वस्व पणास लावून अजिंक्य योद्ध्याप्रमाणे संघर्ष केला.
यओबीसी बहुजनांना लढण्याचे बळ दिले. आज त्या लढण्याच्या ऊर्जेवरच महाराष्ट्रात लोकसभेची निवडणुक काही मतदारसंघात लढली जात आहे.
बहुजनांच्या नेतृत्वांनी पक्षबांधणी करायचीच नाही काय? बहुजनांच्या नेतृत्वांनी, कार्यकर्त्यांनी निवडणुक लढायचीच नाही का?
तुम्ही २२-२३% संख्येच्या ताकतीवर पक्षीय अधिकार मिरवीत आहेत, म्हणून ८०-८५% जागांवर उमेदवारी स्वत: घेत आहेत.
आम्ही तहयात तुम्हास पिढ्यानपिढ्या मतेच देत राहणार काय?
आणि आमच्या मतावर सत्ता आल्यावर आमच्यावरच अन्याय करत रहाणार काय?
ओबीसी बहुजन बांधवांनो श्री महादेव जानकर हे ओबीसी नेतृत्व लोकसभा लढताहेत ते त्यांच्यासाठी नाही.
तुमच्या माझ्या अस्तित्वासाठी,
तुमच्या – माझ्या अस्मितेसाठी,
तुमच्या – माझ्या स्वाभिमानासाठी,
तुमच्या – माझ्या हक्कासाठी,
तुमच्या – माझ्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी,
तुमच्या – माझ्या पुढील पिढीच्या जीवनासाठी,
तुमच्या – माझ्या पुढील पिढ्यांस पुन्हा ती पारंपारिक गुलामी येवू नये म्हणून.
लढणार्या सर्व ओबीसी नेतृत्वांचे लढणेच तुमच्या – माझ्या साठी असेल तर तुमचेआमचे कर्तव्यच आहे, आपल्या साठी लढणार्यांना लाखोंच्या मताने निवडून आणणे आवश्यक आहे.
🙏🙏🙏🙏
लढाई अस्मितेची
ओबीसी बहुजनांच्या हक्काची.
🙏🙏🙏🙏
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा🙏🙏🙏🙏🙏




