🚩 क्रांतीज्योतींच्या स्मृतीदिनी सरकारला जाब : फुले दांपत्याला भारतरत्न द्या, स्मारकांची कामे तातडीने पूर्ण करा – ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे 🚩

🚩 क्रांतीज्योतींच्या स्मृतीदिनी सरकारला जाब : फुले दांपत्याला भारतरत्न द्या, स्मारकांची कामे तातडीने पूर्ण करा – ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे 🚩
१० मार्च हा दिवस भारतीय सामाजिक क्रांतीच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी स्त्रीशिक्षणाच्या महान क्रांतिकारक, सामाजिक समतेच्या अग्रदूत आणि मानवमुक्तीच्या चळवळीतील तेजस्वी दीपस्तंभ Savitribai Phule यांच्या १२९ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. ओबीसी नेते, सत्यशोधक विचारवंत आणि अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी या स्मृतिदिनी त्यांच्या महान कार्याचा गौरव करत शासनाकडे अनेक ठोस आणि आक्रमक मागण्या केल्या.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव येथे खंडोजी नेवसे पाटील यांच्या घरी झाला. लहान वयातच त्यांचा विवाह महान समाजसुधारक Jyotirao Phule यांच्याशी १८४० मध्ये झाला. विवाहानंतर त्यांनी सगुनाबाई क्षीरसागर यांच्या मदतीने धुळपाटीवर शिक्षण सुरू केले. पुढे शिक्षण घेऊन त्या प्रशिक्षित शिक्षिका बनल्या आणि १ जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडे वाड्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून भारतीय समाजात शिक्षणक्रांतीची ज्योत पेटवली. स्त्रिया, शूद्र-अतिशूद्र आणि वंचित घटकांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले. त्यांच्या साथीला ट्रेंड शिक्षिका फातिमा शेख सुद्धा होत्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मिळून पुण्यात तब्बल १८ शाळा सुरू केल्या. नंतर पुणे आणि परिसरात 42 शाळा सुरू केल्या
सावित्रीबाई फुले या केवळ शिक्षिका नव्हत्या तर त्या साहित्यिकही होत्या. त्यांनी बावन कशी आणि काव्यफुले हे काव्यसंग्रह लिहिले. त्यांनी पुण्यातील गंजपेठ येथील फुलेवाड्यात विधवांसाठी संगोपन केंद्र आणि बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. विधवांच्या बाळंतपणाची व्यवस्था करणे, महिलांना रात्रीच्या शाळांमधून शिक्षण देणे, कुटीर उद्योगांचे प्रशिक्षण देणे अशी अनेक समाजोपयोगी कामे त्यांनी केली.
१८७६ च्या भीषण दुष्काळात धनकवडी येथे त्यांनी कॅम्प उघडून हजारो गरजू आणि चिमुकल्या मुलांना अन्न दिले. “शिक्षण हेच खरे मुक्तीचे साधन” हा त्यांचा ठाम विश्वास होता. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश आणि मध्यान्ह भोजन देण्याची कल्पना त्यांनी मांडली होती. शिक्षण हे व्यवसायाभिमुख असावे आणि युवक-युवती स्वतःच्या पायावर उभे राहावेत असा त्यांचा दूरदृष्टीपूर्ण विचार होता.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर त्यांनी त्यांच्या विचारांचा वारसा जपला. इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेने आपल्या पतीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारून टिटवे धरून वैकुंठ स्मशानभूमीत त्यांना अग्नी दिला. महात्मा फुले यांनी लिहिलेला सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी १८९१ मध्ये प्रकाशित केला.
१८९२ मध्ये मुंबईत झालेल्या जातीय दंगली थांबवण्यासाठी त्या मुंबईत गेल्या. कामगार नेते Narayan Meghaji Lokhande यांच्या सहकार्याने त्यांनी भायखळा येथे विशाल शांतता सभा घेतली. त्या भाषणाचा परिणाम इतका प्रभावी होता की जवळपास शंभर वर्ष मुंबईत दंगली झाल्या नाहीत, असा इतिहास सांगितला जातो.
१८९६। 97 मध्ये प्लेगची साथ पसरली तेव्हा सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णसेवेचे कॅम्प सुरू केले. गरीब, दलित आणि गरजू लोकांना वैद्यकीय सेवा देत असताना त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही पांडुरंग गायकवाड नावाच्या दलित . आजारी मुलाला स्वतः पाठीवर घेऊन जात असताना त्यांना प्लेगची लागण झाली आणि अखेर १० मार्च १८९७ रोजी जनसेवा करत करत त्यांचे निधन झाले. समाजासाठी आयुष्य अर्पण करणारी ही महान क्रांतीज्योती अखेरपर्यंत सेवाधर्म पाळत राहिली.
आज पुण्यातील भिडेवाडा येथे त्यांच्या पहिल्या शाळेचे स्मारक उभारण्यासाठी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच त्यांच्या जन्मगाव नायगाव येथेही सुमारे १४३ कोटींच्या आराखड्यातून भव्य स्मारक उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. सावित्रीबाई फुले यांच्या २०० व्या जयंतीपर्यंत (३ जानेवारी २०३१) ही सर्व कामे पूर्ण झाली पाहिजेत, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांनी सरकारसमोर आक्रमक मागण्या मांडल्या. देशातील सर्व जिल्ह्यांत महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पूर्णाकृती पुतळे व भव्य स्मारके उभारावीत. मुंबईमध्ये फुले दांपत्याचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारावे. सातारा जिल्ह्यातील कटगुण येथेही भव्य स्मारक उभारावे. पुण्यातील फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारक परिसर विकसित करून ते जागतिक दर्जाचे स्मारक करावे. या कामांसाठी जाहीर केलेल्या निधीचा तातडीने वापर करून कामे पूर्ण करावीत.
त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लोगो विषमतेचे प्रतीक शनिवार वाडा बदलून फुलेवाड्याचे प्रतीक वापरावे, अशीही मागणी करण्यात आली. देशातील सामाजिक क्रांतीचे शिल्पकार असलेल्या फुले दांपत्याला “भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान – भारतरत्न” देऊन देशाने त्यांचा गौरव करावा, अशी तीव्र मागणी यावेळी करण्यात आली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते तर ते समता, बंधुता, शिक्षण आणि मानवमुक्तीचे शाश्वत प्रतीक आहेत. त्यांनी पेटवलेली शिक्षणक्रांती आणि सामाजिक समतेची मशाल आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या १२९ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात येत आहे.
— सत्यशोधक शंकरराव लिंगे
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ
📢 सोशल मीडिया संदेश
दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा.
बातमी लाईक करा • शेअर करा • सबस्क्राईब करा • फॉरवर्ड करा • कमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबा — अपडेट मिळवत राहा.
#हॅशटॅग
#SavitribaiPhule
#KrantiJyoti
#JyotibaPhule
#PhuleDampatya
#OBCVoice
#ShankarraoLinge
#SocialJustice
#EducationRevolution
#BahujanMovement
#DinbandhuNews




