🔥 झोपडपट्टीतून राज्यसभेपर्यंत… कष्ट, विद्रोह आणि विचारांचा ऐतिहासिक विजय! 🔥


🔥 झोपडपट्टीतून राज्यसभेपर्यंत… कष्ट, विद्रोह आणि विचारांचा ऐतिहासिक विजय! 🔥
डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेची खासदारकी बहाल करून उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या कष्टाचा सन्मान केला आहे. हा निर्णय केवळ राजकीय नसून सामाजिक न्याय, निष्ठा आणि जिद्दीचा गौरव आहे.
अरण येथे संत सावतामाळी प्रतिष्ठान, अखिल भारतीय माळी महासंघ आणि लिंगे उद्योग समूह यांच्या वतीने आयोजित आठ सामुदायिक विवाह सोहळ्यांमध्ये डॉ. ज्योती वाघमारे यांनी प्रभावी अँकरिंग केले होते. त्यांच्या ओजस्वी, अभ्यासपूर्ण आणि विचारप्रधान सूत्रसंचालनाची महाराष्ट्रभर प्रशंसा झाली. त्या हे काम सामाजिक बांधिलकीतून करत होत्या आणि मिळालेला मोबदला त्यांनी स्वतःच्या शिक्षणासाठी खर्च केला, अशी माहिती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली आहे.
यापूर्वी त्यांनी Indian National Congress पक्षात महिला आघाडीत काम केले. त्या काळात मी स्वतः काँग्रेसमध्ये दहा वर्षे खजिनदार म्हणून कार्यरत होतो. ज्योतीताईंनी निष्ठेने काम केले; मात्र त्यांना अपेक्षित संधी मिळाली नाही. देशाचे ज्येष्ठ नेते Sushilkumar Shinde यांच्या नेतृत्वाखाली काम करूनही त्यांना मोठी जबाबदारी मिळाली नाही. परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या कार्याची अचूक दखल घेत राज्यसभेची उमेदवारी देऊन त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण केली. हा निर्णय म्हणजे कर्तृत्वाला दिलेला सन्मान आहे.
ज्योतीताई वाघमारे बुद्ध, कबीर, संत रविदास महाराज, शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांच्या ठाम आणि धाडसी पुरस्कर्त्या आहेत. त्या उगवती भाषाशैली विचारवंत डॉक्टर, प्राध्यापक, संशोधक आणि विज्ञानवादी विचारांच्या अभ्यासू करारी कर्मठ लढाऊ विद्रोही कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. विद्यार्थी दशेपासून हजर जवाबी प्रसिद्ध वक्त्या अँकरिंग करत्या प्रवक्त्या म्हणून त्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये लहानपणापासून विद्यार्थी दशेपासून जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली आहे मुंबईच्या दसरा मेळाव्यामध्ये त्यांचे भाषण गाजले होते आणि त्यांच्या भाषणावर रकानेच्या रकाने भरून पेपरमध्ये आणि मीडियामध्ये त्यांची प्रशंसा केली होती तसोलापूर येथे झालेल्या आठव्या विद्रोही साहित्य संमेलनात त्यांनी मनुवादी ग्रंथाचे प्रतीकात्मक दहन करून झाल्यावर कार्यक्रमाचे उद्घाटन केले होते. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी महिनाभर सोलापूर जिल्ह्यातील गावोगावी फिरून “मूठभर धान्य आणि एक रुपया” या संकल्पनेतून निधी गोळा केला. मराठी साहित्य संमेलन आणि विद्रोही साहित्य संमेलन एकाच वेळी, आमने-सामने होत असताना त्यांनी आपल्या प्रभावी आणि प्रेरणादायी भाषणातून तरुणाईला नवा विचार दिला. या कार्यक्रमाच्या यशामागे त्यांची जिद्द आणि परिश्रम मोठ्या प्रमाणात कारणीभूत होते. त्या वेळी कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून सत्यशोधक शंकरराव लिंगे कार्यरत होते.
मजूर कुटुंबातील ही जिद्दी लेक — शिक्षण घेताना पायात चप्पल नसलेली — आज दिल्लीच्या संसदेत पोहोचत आहे. “आदमी जन्म से बड़ा नहीं होता, आदमी कर्म से बड़ा होता है,” हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. हा विजय आहे श्रमाचा, अभ्यासाचा, विद्रोहाचा आणि विचारांचा.
डॉ. ज्योती वाघमारे या कष्टकरी श्रमिक सावित्रीच्या लेकीवर आज सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
डॉ. ज्योती वाघमारे यांना शंकरराव लिंगे, सत्यशोधक, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय माळी महासंघ यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा! हार्दिक अभिनंदन!!
📢 सोशल मीडिया संदेश
दिनबंधू न्यूज | शिव क्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387377801
👉 आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये 7387377801 हा नंबर जोडा
👉 बातमी लाईक करा
👉 शेअर करा
👉 सबस्क्राईब करा
👉 फॉरवर्ड करा
👉 कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!
━━━━━━━━━━━━━━━━━━
#ज्योतीताई_वाघमारे
#राज्यसभा
#कार्यकर्त्यांचा_सन्मान
#एकनाथशिंदे
#शिवसेना
#सत्यशोधक
# शिवक्रांतीटीव्ही
#दिनबंधून्यूज
#अखिलभारतीयमाळीमहासंघ
#कर्माचाविजय



