
💐🎉 l बातमी | वसेकर–काळे परिवाराचा मंगलमय शुभविवाह व स्वागत समारंभ उत्साहात संपन्न 🎉💐
मोहोळ तालुक्यातील पाठकूल येथे नवरदेव नितीन दादासाहेब वसेकर 💍 नववधू प्रतीक्षा भागवत काळे यांचा शुभविवाह शनिवार, दि. 13 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.45 वाजता वर्सेकर वस्ती, स्वगृही, पाठकूल येथे अत्यंत मंगलमय व आनंदी वातावरणात पार पडला.
यानंतर दि. 18 डिसेंबर 2025 रोजी आयोजित स्वागत समारंभात नातेवाईक, मित्रपरिवार व मान्यवरांनी मोठ्या उत्साहात हजेरी लावून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.
या प्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, दिनबंधू न्यूज व शिवक्रांती टीव्हीचे संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे तसेच बापूसाहेब भंडारे सोलापूर जिल्हा अध्यक्ष (अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद) यांच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा (फोटो) भेट देऊन वधू-वरांचे अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमास बाळासाहेब रंगनाथ वसेकर, कालिदास वसेकर, नितीन वसेकर, सुभाष दाजी ननवरे, अजित वसेकर, रवी माळी, विकास वसेकर, वैभव वसेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वसेकर व काळे परिवाराच्या या मंगलप्रसंगी सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, नवदाम्पत्याच्या भावी आयुष्यास सुख, समाधान व यश लाभो अशा मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 संपर्क: 73 87 37 78 01
👉 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा
👉 बातमी लाईक 👍 शेअर 🔄 सबस्क्राईब ▶️ फॉरवर्ड 📤 कॉमेंट 💬 करा
👉 बेल आयकॉन 🔔 दाबा – विसरू नका!
#शुभविवाह #वसेकरकाळे #स्वागतसमारंभ #आनंदोत्सव #दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही #सत्यशोधकशंकररावलिंगे #MangalVivah #Blessings #HappyMoments






