महात्मा फुले स्मृतिदिन : बहुजन समाजक्रांतीचे महामानव – राष्ट्राला दिशा, समाजाला नवा प्रकाश!**

** दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
महात्मा फुले स्मृतिदिन : बहुजन समाजक्रांतीचे महामानव – राष्ट्राला दिशा, समाजाला नवा प्रकाश!**
आज 28 नोव्हेंबर… भारतीय समाजक्रांतीचे जनक, समतेचे पुरस्कर्ते आणि बहुजन मुक्तीचे महामानव महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 135 व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
त्यांनी स्त्रीशिक्षण, सत्यशोधक समाज, शूद्र–अतिशूद्रांचे हक्क, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवधर्म यासाठी केलेले क्रांतिकारी कार्य आजही समाजदर्शनाचा दीपस्तंभ आहे. सावित्रीबाईंसह पहिली मुलींची शाळा, अस्पृश्यता निवारण, विधवा पुनर्विवाह, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष — ही त्यांची अमर देणगी.
गुलामगिरी, तृतीय रत्न, शेतकऱ्याचा असूड, ब्राह्मणाचे कसंब अखंड आधी लिखाण शिवाजी महाराजांचा पोवाडा मोहम्मद पैगंबर यांचा पोवाडा पणतोजी चा पोवाडा सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथांनी अन्यायाविरोधातील लढ्याला नवा आयाम दिला. मुंबई CSMT, येरवडा पूल, कात्रज बोगदा, खडकवासला धरणकालवे, नगरपालिका मार्ग–गटार अशी अनेक कामे त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाली — आधुनिक महाराष्ट्र घडवणारे पहिले बहुजन उद्योजक आणि विकासमार्गदर्शक म्हणून त्यांची ओळख अधोरेखित करते.
सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा किंवा ब्रिक्स G 20 मार्फत नवीन पुरस्कार चालू करून जागतिक दर्जाचा नवीन पुरस्कार फुले दांपत्यांना प्रथम द्यावा महात्मा फुले–सावित्रीबाईंच्या स्मृती जपण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय स्मारकांची कामे तातडीने पूर्ण करावीत, भिडे वाडा पुनर्विकास पुर्ण करावा, नायगांव सृष्टी स्मारक व खानवडी व कटगुण ला कृषी विद्यापीठ संशोधन केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लोगो शनिवार वाडा विषमतेचे प्रतिक बदलून समतेचे प्रतीक फुलेवाडा वापरावा उभारावे, अशी बहुजन समाजाची ठाम मागणी. तसेच प्रत्येक तालुक्यात व शहरात महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे भव्य स्मारक आणि पूर्णाकृती पुतळे उभारावेत.
समाजक्रांतीचे जनक महात्मा फुले… तुमच्या कार्याला शतशः प्रणाम.
—
**दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01 — लाईक • शेअर • सबस्क्राईब • फॉरवर्ड • कमेंट • बेल आयकॉन दाबा**
#MahathmaPhule #JyotibaPhule #PhuleSmritidin #SavitribaiPhule #SatyashodhakSamaj #BahujanHistory #DinbandhuNews #ShankarraoLinge #OBCMovement #BahujanIcons #PhuleSmarak




