महाराष्ट्र

लाडक्या बहिणींना खुशखबर! खात्यात जमा होऊ लागले 1500 रुपये, लगेच बॅलन्स करा चेक

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे रखडल्याने चिंतेत असलेल्या महिलांच्या खात्यात आता 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

लाडक्या बहिणींना अखेर दिलासा

राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वात चर्चेत असलेली योजना मानली जाते.

या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र फेब्रुवारीनंतर अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नव्हते. त्यामुळे मार्च आणि एप्रिल महिन्यांचे हप्ते कधी मिळणार? याची महिलांना प्रतीक्षा होती. आता अखेर काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.


3000 रुपयांची चर्चा, पण खात्यात आले 1500

दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार असल्याने महिलांना थेट 3000 रुपये मिळतील, अशी चर्चा सुरू होती.

काही ठिकाणी 4500 रुपयांच्याही चर्चांना उधाण आलं होतं. मात्र प्रत्यक्षात अनेक महिलांच्या खात्यात सध्या 1500 रुपये जमा झाल्याचे मेसेज येत आहेत.


लाभार्थी महिलांना बँक खाते तपासण्याचं आवाहन

योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनी आपलं बँक खाते किंवा मोबाईलवर आलेले SMS तपासावेत, असं आवाहन केलं जात आहे.

ज्या महिलांनी e-KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांच्याच खात्यात पैसे जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे.


e-KYC न केल्यास अडचण

महिला आणि बालविकास विभागाकडून लाभार्थींना e-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं होतं.

सुरुवातीला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ती वाढवून 30 एप्रिल 2026 करण्यात आली.


66 लाख महिला अपात्र?

दरम्यान, योजनेच्या पडताळणीत मोठा खुलासा समोर आला आहे.

नियमांचे उल्लंघन करून लाभ घेत असलेल्या तब्बल 66 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता फक्त पात्र महिलांनाच पुढील हप्ते मिळणार आहेत.


सरकारचा खर्च कमी होणार

पडताळणीनंतर लाभार्थी महिलांची संख्या कमी झाल्यामुळे सरकारच्या खर्चातही मोठी बचत होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

याआधी या योजनेसाठी दरमहा सुमारे 3600 कोटी रुपये खर्च होत होते. आता हा खर्च कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


काही महिलांना कमी रक्कम?

याआधीच्या पडताळणीत काही महिलांना इतर योजनांचा लाभ मिळत असल्याचंही समोर आलं होतं.

विशेषतः ‘नमो शेतकरी महासन्मान’ योजनेचा लाभ घेणाऱ्या काही महिलांना 1500 ऐवजी कमी रक्कम मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.


महिलांमध्ये आनंदाचं वातावरण

दीर्घ प्रतीक्षेनंतर खात्यात पैसे जमा होऊ लागल्याने अनेक महिलांनी समाधान व्यक्त केलं आहे.

सोशल मीडियावरही “मेसेज आला”, “1500 रुपये जमा झाले” अशा पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.


अजूनही काही महिलांना प्रतीक्षा

काही महिलांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झाले नसल्याचं समोर येत आहे.

तांत्रिक अडचणी, e-KYC अपूर्ण असणं किंवा पडताळणी प्रक्रिया सुरू असणं ही त्यामागची कारणं असू शकतात, अशी चर्चा आहे.


सरकारकडून अधिकृत घोषणा अपेक्षित

मार्च आणि एप्रिलचे उर्वरित पैसे एकत्र मिळणार का? पुढील हप्ता कधी येणार? याबाबत सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, लाभार्थी महिलांना नियमितपणे बँक खाते तपासण्याचं आवाहन केलं जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button