🔶 धनगर समाजाचे मुंबई आझाद मैदानावर 21 जानेवारी 2026 रोजी आंदोलन; दीपक बोऱ्हाडे यांचा राज्यभर दौरा सुरू

🔴 दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
🔶 धनगर समाजाचे मुंबई आझाद मैदानावर 21 जानेवारी 2026 रोजी आंदोलन; दीपक बोऱ्हाडे यांचा राज्यभर दौरा सुरू
धनगर समाजाचे योद्धा दीपक बोऱ्हाडे हे एसटी आरक्षणाच्या प्रमुख मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची दिशा निश्चित करत आहेत. 21 डिसेंबर 2026 पासून ते मुंबई येथील आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात उपोषण-अंदोलन सुरू करणार असून, त्यासाठी राज्यभर व्यापक दौरा करून समाजाच्या भावना, मते आणि सहभाग जाणून घेत आहेत.
याआधी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी १६ दिवस आमरण उपोषण केले होते. त्या वेळी शासनाने दिलेल्या आश्वासनाचे काहीही ठोस परिणाम न झाल्याने आता शासनाविरुद्ध निर्णायक लढा उभारण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.
दीपक बोऱ्हाडे यांनी सर्व महाराष्ट्रातील धनगर बांधवांना एकत्रितपणे आझाद मैदानावर दाखल होऊन लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “धनगर समाजाला एसटी आरक्षण मिळेपर्यंत संघर्ष थांबणार नाही.”
या आंदोलनामुळे शासनावर तातडीचा निर्णय घेण्याचा दबाव वाढण्याची शक्यता असून, समाजात मोठी चळवळ निर्माण होण्याचे संकेत दिसत आहेत.
📌 हॅशटॅग:
#दिनबंधू न्यूज #धनगरसमाज #दीपकबोऱ्हाडे #STआरक्षण #आझादमैदान #मुंबईआंदोलन
📢 सोशल मीडिया सूचना: शिवक्रांती टीवी दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
आपला 73873778001 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये जोडा. बातमी लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉरवर्ड आणि कमेंट करा. बेल आयकॉन दाबा.




