सोशल

मंडलनामा समतेचा धडा

मंडलनामा

समतेचा धडा

 

‘ते दिवस तसे आमच्यांसाठी भीतिदायक होते. भारताला काही महिन्यांपूर्वीच स्वातंत्र्य मिळाले होते. पण, जालन्यात अद्याप स्वातंत्र्यांची पहाट उगवायची होती. आमचा मराठवाडा तेव्हा हैदराबाद संस्थानात होता. हैदराबादचा निजाम भारतीय संघराज्यात सामील होण्यास तयार नव्हता. त्याला स्वतंत्र राहायचे होते. भारतात त्यावेळी अशी तीन संस्थाने होती. काश्मीर, जुनागढ व हैदराबाद या संस्थानिकांना भारत किंवा पाकिस्तानात सामील व्हायचे नव्हते. मात्र येथील जनता भारतात सामील वकायच्या बाजूची होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेतृत्वात जोरदार लढा सुरू होता. लोक काँग्रेसच्या पाठिशी होते. हा लढा दडपून टाकण्यासाठी काही वर्षांपूर्वीच रजाकार उभे राहिले होते. रजाकारांना निजामाची फूस होती. भारतात स्वांतत्र्य चळवळ भरात असताना ती दडपून टाकण्यासाठी रजाकारांचा जुलमी वरवंटा फिरत होता. ते गोरगरिबांवर अत्याचार करायचे. हिंदुमध्ये त्यांची प्रचंड दहशत होती. त्यांच्या विरुद्ध शब्द काढण्याची हिंमत कोणातही नव्हती. त्यांच्या जवळ शस्त्रे होती, ते घोड्यावरून फिरायचे. रजाकारांत प्रामुख्यांने रोहिले व पठाण होते. त्यांची दडपशाही व दादागिरी पूर्वीपासूनच होती. आताच्या अफगाणिस्तानातून आलेल्या पठाण व रोहिल्यांच्या काही पिक्या येथेच जन्मलेल्या होत्या. पण रानटीपणा त्यांच्यात पुरेपूर होता. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबादच्या निजामाने स्वतंत्र राहण्याचे ठरवल्याने रजाकारांच्या अत्याचारात वाढ झाली. त्यात आमच्या सारख्या गरीच व निम्नस्तरातील मुसलमानांची स्थिती अडकित्यात सापडल्यासारखी झाली. रजाकारांच्या जुलमामुळे हिंदुंच्या नजरेत आम्ही जालीम होतो, तर रजाकारांतील

रोहिले व पठाण आम्हा गरीब मुसलमानांच्या घरांची राखरांगोळी करायला मागेपुढे पाहत नसत. ते दिवसाढवळ्या आमच्या सारख्यांच्या घरात घुसायचे व तरण्याताठ्या मुलींना उचलून नेत. त्यांच्याकडे बंदुका व तलवारी असल्याने विरोध करणे महणजे जीवावर बेतण्यासारखेच. त्यामुळे आमच्यासारखे अनेक गरीब मुसलमान हा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत होते.’

‘भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी हैदराबाद संस्थान स्वतंत्रच होते. इतर ठिकाणाचे संस्थानिक भारतात सामील झाले. मराठवाड्यात नांदेड, वसमत, औरंगाबाद, वैजापूर, सेलू, उस्मानाबाद, अंबाजोगाई, उदगीर, लातूर, उमरगा, तुळजापूर, नळदूर्ग, धारूर, मानवत, पात्री, कासार शिरसी, निलंगा, अंबुलगा अशा कित्येक ठिकाणी निजाम व रजाकारांविरुद्ध सामान्य जनता पेटून उठली होती हैदराबाद संस्थानातील जनतेला स्वातंत्र्य खुणावत होते. हैदराबाद स्टेट काँग्रेसचे कार्यकर्ते जोरदार चळवळ वः प्रतिकार करत होते. या वातावरणात आम्हा गरीब मुसलमानांचा जीव मेटाकुटीला आला. जनतेच्या रेट्यामुळे भारत सरकार सशस्त्र कारवाई करण्याच्या विचारात होते. यामुळे आमचा जीव टांगणीला लागला. लष्कर पुसले तर काय होईल, ते आपल्या सगळ्यांना मारून टाकतील, मुसलमानांना हाकलून देतील, अशा एक ना अनेक चर्चा मुसलमानांमध्ये झडत होत्या. वातावरण प्रचंड भीतीचे होते. भारतीय सैनिक नव्हे तर येथील हिंदू आपणाला ठार मारतील, जीवंत सोडणार नाहीत, असेही काही जण म्हणत. त्यामुळे जीव मुठीत धरूनच आम्ही

• शब्बीर अन्सारी यांची आई हबिबा बी

येथे राहत होतो.’

हे सगळे मला माझी आई हविचा बी हिने सांगितले होते. ती एका मुसलमान विणकर कुटुंबातील अडाणी बाई मुखदुर्बल नवरा, त्याचे नाव शेख दाऊद आणि पदरात चार मुले. शिवाय एक बाळ पोटात होते. त्यावेळी आमचे कुटुंब जालन्यात साळी गल्लीत राहत होते. साळी गल्ली ही विणकरांची वस्ती येथे मुसलमान व हिंदू विणकर कुटुंबे गुण्यागोविंद्याने नांदत. सर्वांमध्ये एकमेकांबद्दल आपुलकी व स्नेह होता. पण, सामाजिक व राजकीय वातावरणातच एवढा द्वेष भरलेला होता की मुसलमान कुटुंबं प्रचंड भेदरलेली होती. त्यांना हिंदू विणकर कुटुंबं धीर देत असत, काहीही होणार नाही, आम्ही आहोत, असा विश्वासही दाखवत. परंतु, दुसरीकडून लोक आले व त्यांनी हल्ला केला तर? आमचे काय होईल? आईची भीती निराधार नव्हती.

एकदा मला आईने सांगितले होते की, जी भीती वाटत होती तो अखेर दिवस आलाच. भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानात घुसले. पोलिस अॅक्शन सुरू झाली. इकडे आमच्या कुटुंबाची धाकधूक वाढली. आम्हीच नाही तर आमच्यासारख्या अनेकांना धडकीच भरली. आता काय होणार ? गावात अनेक चर्चा उसळल्या होत्या. त्या किती खऱ्या व किती खोट्या कोणास ठाऊक ? पण जालन्यातील मुसलमान कुटुंबांची पळापळ सुरू झाली. प्रत्येकजण सुरक्षित आसरा शोधत होता. आमच्या कुटुंबाला जीवाचे अभय देणारी जागा मिळणे मुश्किल होते शेजाऱ्यांवर विश्वास होता, पण काय सांगावे कोणाच्या पोटात काय असेल?

आई हे सांगायची तेव्हा मी कळत्या वयात

होतो हे सगळे ऐकून माझ्या अंगावर काटा यायचा

माझे गरीब कुटुंब त्यावेळी कोणत्या अवस्थेतून गेले असेल याची कल्पनाही मी करू शकत नव्हतो घरात कधी अशा आठवणी निघाल्या की प्रचंड भीती वाटायची, जीव दडपून जायचा. एकदा आईने सांगितले होते की, ‘पोलिस अॅक्शन सुरू झाली. मुसलमानांवरील हल्ले जालन्यापर्यंत येऊन ठेपले. माळी गल्लीतील काही मुसलमान कुटुंबं जीवाच्या भीतीने घर सोडून निघाले, किर्र अंधारात काट्याकुट्याची चार तुडवत ते सगळे चालले होते. माझ्या आईला चालणे मुश्किल झाले. ती दोन जिवाची बाई, वर जिवाची भीती. अत्यंत गरीब स्वभावाचा नवरा, चार मुले घेऊन आई इतर मुसलमान कुटुंबांसोबत घर सोडून निघाली. पावेळी सर्वांना जीव वाचवणे महत्त्वाचे होते. आई अल्लाचा धावा करत होती. जीवाच्या सलामतीसाठी सर्व पूर्वजांना आवाहन करत होतो.’

• शब्बीर अन्सारी यांचे चडील शेख दाऊद

‘डोळ्यात बोट गेलं तरी दिसणार नाही असा अंधार. आकाशात विमाने घिरट्या घालत होती. त्यांच्या आवाजाने जीव दडपून जायचा. सोबत आलेल्या

मंडलनामा १२

मुसलमान कुटुंबांचीही ताटातूट झाली. सगळेच कुठेतरी लपून बसलेले. ती रात्र कशी तरी काढायची होती. पण प्रसंगच एवढा कठीण की प्रत्येक क्षण जणू एका युगासारखाच वाटत होता. दोन जीवाच्या आईला चालणे कठीण होते. मी आता चालू शकत नाही मी विहिरीत उडी मारून जीव देईन, माझी आई तिच्या वडिलांना म्हणाली. माझ्या नानाने (आईचे वडील, शेख चाँद) तिला धीर दिला त्या किरं अंधारात माझे कुटुंब नीव मुठीत घेऊन एका ठिकाणी बसले, छातीत धडधड वाढलेली कुठे पाचोळ्याचा आवाज झाला तरी काळीज लकलक हालायचे. आईच्या तोडातून निघणारा प्रत्येक शब्द मी कानात प्राण आणून ऐकलेला आहे आईने सांगितले होते की, त्यावेळी एकदम पावलांचा आवाज आला. कोणीतरी दुरून येत होते. झपझप … चरं चरं… पायाखालची कारकं तुटल्याचा आवाज यायचा. आई व बडिलांनी कानोसा घेतला. यार मुलं आईला बिलगली. थोड्या अंतरावर कंदिलाचा प्रकाश दिसला. कंदिलाचा प्रकाश जसा जसा जवळ येत होता, तसं तसं सगळे अंधारात मागे मागे सरकतः होते ते पाच, सहा जण होते. त्यांच्या हातात काठ्या त्यांना अन्सारी कुटुंब कोठे बसले आहे, याचा अंदाज आला अरखवा त्यांनी थोडे अंतर राखून आवाज दिला. त्यांनाही भीती होतीच. कोणास ठावूक रजाकार असतील तर…? आवाज ओळखीचा होता.

आईने सांगितले, ‘माझ्या वडिलांनी आवाजाला प्रतिसाद दिला.

आवाजावरून एकमेकांची ओळख पटली. माझ्या कुटुंबाला घेऊन जायला आलो आहोत, असे त्या पाच-सहा जणांनी सांगितले. आता आली का बला जीव वाचवण्यासाठी लपून बसलो होतो. आता हे कोठे घेऊन जाणार आणि कशासाठी? आम्हाला मारणार तर नाहीत ना? चार मुलं भीतीने अधिकच बिलगली, त्यांची गाळण उडाली. अंधारात आलेले ते ओळखीचेच होते. ते साळी गल्लीतील हिंदू विणकर होते. वडिलांचे मित्र होते. माझ्या आईचे त्यांच्या घरी येणे जाणे होते. त्यांच्या घरातील बायका आईच्या दाट परिचयाच्या होत्या. आई दोन जीवाची असल्याचं त्यांना माहीत होते. या गरोदर बाईला घेऊन हे कुटुंब घर सोडून निघून गेल्याचे त्या बायकांना कळाले. त्यामुळे त्या बायकांनी त्यांच्या नवऱ्यांना माझ्या कुटुंबाला शोधायला पाठवले होते. त्या बायकांना माझ्या गरोदर आईची चिंता होती. दिवस भरत आलेले त्या पुरुषांनी माझ्या कुटुंबाला समजावून सांगितले. अशा गरोदर बाईला घेऊन रानोमाळ भटकत असल्याबद्दल वडिलांची खरडपट्टी काढली. आमचा जीव गेला तरी तुमच्या कुटुंबाचे रक्षण करू, अशी हमी दिली. त्यांच्यासोबत अंधारात वाट तुडवड माझे कुटुंब त्या रात्री जालन्यातील साळी गल्लीत परत आले. सकाळ झाली. पोलिस अॅक्शनच्या भीतीने निजामानं विचार बदलला व भारतात सामील व्हायला होकार दिला. ही वार्ता कानी आली. मराठवाड्यात स्वातंत्र्याचा कोंबडा आरवला. माझ्या कुटुंबाच्या जीवनातही नवी पहाट उगवली. आतापर्यंत फक्त ओळखीपर्यंत मर्यादित असलेली ती हिंदू कुटुंबं माझ्या कुटुंबांच्या जीवाभावाची झाली.

इंग्रज भारतातून निघून गेल्याच्या तब्बल १३ महिन्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थानातील जनतेला स्वातंत्र्य मिळाले. रजाकाराचे भय संपले. या चैतन्यमय वातावरणात मराठवाड्यातील जनतेचा हुरूप वाढला. काहींच्या मनात कटू भावना होत्या व त्या राहणार होत्याच, कारण रजाकारांचा जुलूम शब्दात सांगता येणार नाही एवढा. गरीब मुसलमान कुटुंबांचीही रोहिले व पठाणांच्या तावडीतून सुटका झाली. संस्थान भारतात सामील झाल्याने आपल्याही फाटक्या संसाराला सुगीचे दिवस येतील, असे गरीब मुसलमानांना वाटत होते. कारण ते पाकिस्तानात गेले नव्हते. येथेच राहिले होते. मराठवाड्यातून काही कुटुंबं तिकडे पाकिस्तानात गेली. त्यांची संख्या खूपच कमी. आपले गाव, घर, नातेवाईक सोडून दूर परक्या प्रदेशात जाण्याची येथे राहिलेल्यांना इच्छा नव्हती. या सगळ्यांना निजामाशी काही देणे घेणे नव्हते. निजाम जगात सर्वात श्रीमंत व तो मुसलमान असला तरी या गरीब मुसलमानांच्या घरी लक्ष्मी पाणी भरत नव्हती. हातातोंडाची गाठ घालण्यासाठी त्यांना घाम गाळावा लागत होता. त्यामुळे हैदराबाद संस्थान भारतात सामील झाल्याचे या गरीब कष्टकरी मुसलमानांना बरेच वाटत होते.

या अशा नवचैतन्याने सळसळलेल्या वातावरणात हैदराबाद मुक्तिदिनाच्या वीस ते बावीस दिवसांनंतर माझी आई बाळांत झाली. आधीच्या चार अपत्यानंतर मी पाचवा. परंपरेनुसार बारशाला त्या बाळाच्या कानात नाव सांगण्यात आले…… शब्बीर….!

हिंदू-मुस्लिम एकतेचा व संकटात सापडलेल्यांच्या मदतीला धावून जाण्याच्या धडा मला आईच्या पोटात मिळाला.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button