उद्योगपती कर्मवीर सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे सुपुत्र जयसिंह शंकरराव लिंगे (एमबीए) यांचा 38 वा वाढदिवस साधेपणाने साजरा!

. दिनबंधू न्यूज — संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
उद्योगपती कर्मवीर सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे सुपुत्र जयसिंह शंकरराव लिंगे (एमबीए) यांचा 38 वा वाढदिवस साधेपणाने साजरा!
अकलूज सोलापूर येथील लिंगे कुटुंबात आनंदाचे वातावरण! उद्योगपती कर्मवीर सत्यशोधक शंकरराव लिंगे यांचे सुपुत्र जयसिंह शंकरराव लिंगे (एमबीए) यांचा 38 वा वाढदिवस सहकुटुंब सहपरिवार घरीच साधेपणाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी सौ. सुनंदा शंकरराव लिंगे, जयदीप शंकरराव लिंगे, सौ. वनिता जयसिंह लिंगे, एमसीए बीसीए रविकांत भारत लिंगे एमबीए कुमारी क्रांती जयसिंह लिंगे, आणि चिमुकले जोतीराव आदित्य जयसिंह लिंगे आदी परिवारातील सदस्य उपस्थित होते.
जयसिंह लिंगे यांनी अकलूज येथील शंकरराव मोहिते पाटील इंग्लिश स्कूल मधून शिक्षणाची सुरुवात केली. पुढील शिक्षण त्यांनी सिंहगड कॉलेज, पुणे आणि वालचंद कॉलेज, सोलापूर येथे पूर्ण केले. त्यांनी बीबीए, एमबीए आणि पीजी केले असून सध्या जलधारा ऍग्रो प्लास्ट, एमआयडीसी चिंचोली (सोलापूर) या स्वतःच्या उद्योगात फायनान्स व मार्केटिंग डायरेक्टर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.
सुसंस्कृत, नम्र आणि प्रगतिशील विचारांचे जयसिंह लिंगे आपल्या कर्तृत्वाने लिंगे उद्योग समूहाला नवी दिशा देत आहेत. त्यांच्या कार्याची झेप समाजासाठी प्रेरणादायी आहे.











