ओबीसी बांधवांनो कोणाच्या ही भूल थापाला बळी पडू नका आपली एकी अशीच कायम ठेवा. – परमेश्वर बनकर, अभ्यासक लेखक व्याख्याते बीड 9503288282

ओबीसी बांधवांनो कोणाच्या ही भूल थापाला बळी पडू नका आपली एकी अशीच कायम ठेवा.
– परमेश्वर बनकर, अभ्यासक लेखक व्याख्याते बीड 9503288282
एकीकडे ओबीसीचे राजकीय आरक्षण काढून घेण्याचं षडयंत्र चालू आहे तर दुसरीकडे शैक्षणिक आरक्षणामध्ये वाटेकरी निर्माण करण्याच षडयंत्र चालू आहे.
ओबीसी विध्यार्थी शिष्यवृत्ती बंद आहे,ओबीसी साठी असलेली महाज्योती संस्था निधी अभावी धूळ खात पडली आहे, ओबीसी विध्यार्थी वस्तीगृह अजुन कागदावरच आहेत.
वारंवार मंडल आयोगाला चॅलेंज करण्याची धमकी दिली जात आहे. ह्या सगळ्या उठाठेवी ओबीसीच्या विरोधातचं का?
ओबीसीचं राजकीय शैक्षणिक आरक्षण संपूष्ठात आणून ओबीसी समाजाला पुन्हा इथल्या प्रस्थापित लोकांचं गुलाम बनवायचं आहे का? असे अनेक प्रश्न उभा राहत आहेत. ओबीसी बांधवांनी आता तरी गाफिल राहु नये, आणि झालेली एकजूट मधेच सोडू नये.ओबीसी आंदोलन विस्कळीत करण्यासाठी वेगवेगळे षडयंत्र रचले जाऊ शकतात त्यामुळे ओबीसी बांवांनी जागृत राहून आपल्या हक्काची लढाई लढली पाहिजे.
म्हणून बांधवानो प्रत्येक ओबीसी मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा आणि आपली ताकत दाखवून द्या तरच आपली दखल घेतली जाईल. जय ओबीसी.. दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्याकडील व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज फॉरवर्ड करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा

