*संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 729 व्या स्मृतिदिनानिमित्त अरण येथे सालाबाद प्रमाणे तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर मोरे महाराज अरण कर महाराज यांचा भजन कीर्तनाचा सप्ताह आयोजित

🔴 *मागोवा:1🔴
*संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 729 व्या स्मृतिदिनानिमित्त अरण येथे सालाबाद प्रमाणे तुकाराम महाराजांचे वंशज देहूकर मोरे महाराज अरण कर महाराज यांचा भजन कीर्तनाचा सप्ताह आयोजित
केला होता.* 3 ऑगस्ट रोजी सावता महाराजांचा 729 या समाधी सोहळ्यानिमित्त पहाटे चार वाजता महापूजा करून दुपारी बारा वाजता भजन कीर्तनासह पुष्पांजली चा कार्यक्रम झाला. सायंकाळी पांडुरंगाची पालखी पंढरपूरहुन सावता महाराजांचा भेटीस आली. त्यावेळी विद्युत रोषणाई आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली होती. ४ ऑगस्ट २०२४ रोजी पुणे सोलापूर हायवे रोड अरण येथे तीन एकर जागेमध्ये सावता महाराजांचे वंशज सावता वसेकर यांनी भव्य भक्ती निवास,वारकरी प्रशिक्षण केंद्र, अन्नदान छत्र इत्यादी विविध नियोजित वास्तूंचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब,ओबीसी विकास मंत्री अतुलजी सावे साहेब, आमदार योगेशजी टिळेकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, मानखटावचे आमदार जयकुमार गोरे साहेब माजी मंत्री चौंडी कर्जतचे राम शिंदे साहेब यांच्यासह महाराष्ट्रातील जिल्ह्यातील असंख्य भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी बोलताना अतुलजी सावे साहेब यांनी ओबीसी साठी वर्षाला दोन हजारा कोटी च्या कोटी बजेट वरून सात हजार कोटीचे बजेट ठेवण्यातळ( खरं म्हणजे महाराष्ट्राचे बजेट जर सहा लाख कोटीचे असेल तर किमान दोन लाख कोटी हे ओबीसी च्या वाट्याला येतात ) आल्याचे सांगितले. अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी अरणला ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा असे सांगून अरणविकासासाठी हा कार्यक्रम घेतला आहे या अगोदरही घेतला होता आणि नंतरही घेत राहू असे आश्वासन दिले.*
छगनरावजी भुजबळ साहेब म्हणाले चाळीस वर्षांपूर्वी नाशिकचे पांडुरंग गायकवाड यांचे सहकारी यांनी वर्गणी केली त्यामध्ये आपणही काही भर घातली आणि 1985 ला चांगला मोठा हॉल बांधला.तो आजतागायत मजबूत आहे आमच्या कामाची क्वालिटी कशी आहे असे निदर्शनास आणून दिले. भारत सरकार आणि राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी अनेक विकासाच्या योजना जाहीर केल्या आहेत.त्याची सविस्तर माहिती सांगून बहुजनातल्या सर्व संतांची नावे त्यांचे कार्य आणि सावता महाराजांचे कार्य यांच्या विचाराला उजाळा दिला. अरणच्या विकासासाठी हाती घेतलेले, ज्याची पायाभरणी केली त्या वास्तूचे उद्घाटन केल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.
*कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्यांमध्ये अनेक विकास कामे चालू आहे. समाजाच्या दुर्बल घटकासाठी अनेक योजना चालू केल्या आहेत. त्या निरंतर चालू ठेवायचा असतील तर आम्हाला पुन्हा सत्तेत पाठवा. असा सावता महाराजांचा आशीर्वाद मला मिळाला आहे. सावता महाराज तीर्थक्षेत्र अरणला ‘अ’ वर्गाचा दर्जा देऊन 100 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे.भिडे वाडा पुणे येथे सावित्रीबाई फुले यांच्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचे आंतरराष्ट्रीय स्मारक बनवण्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगितले. आणि त्याचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. अरण तीर्थक्षेत्राचा विकास खरं म्हणजे मागेच व्हायला पाहिजे होता ती आमची चूक झाली,आता यापुढे कोणतीही चूक न करता माळी समाजाच्या विकासासाठी अरण तीर्थक्षेत्रास निधी कमी पडू दिला जाणार नाही,असे आश्वासन देऊन सभेची सांगता केली.
सात दिवस आरांच्या यात्रेमध्ये भजन कीर्तन यात्रेतील हॉटेल स्टॉल संसार उपयोगी वस्तू चहा फराळाचे सामान विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात आले होते सर्व परिसर गजबजलेला होता दर्शनासाठी भक्तांची रीघ लागलेली होती * 729 स्मृतीस अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले
4 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी अरण येथे जगातील सर्वात मोठी नारळ हंडी परंपरेने तुकाराम महाराज यांचे वंशज बाळासाहेब मोरे महाराज यांच्या हस्ते काठीने फोडण्यात आली. यावेळी लाखो सावता महाराज भक्तांनी नारळ हंडीचा प्रसाद घेण्यासाठी गर्दी केली होती. ह्या सोहळ्याचे विहंगम चक्र पाहण्यासारखे होते 5 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी पांडुरंग आणि सावता महाराजांचा पालखीने गावातून प्रदक्षिणा घातल्यानंतर सावता महाराज समाधी सोहळ्याची सांगता झाली.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴🟣




