🔥 शिव-फुले-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवात विचारांचा विराट जागर! 🔥

📍 जामखेड (जि. अहिल्यानगर)
🔥 शिव-फुले-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवात विचारांचा विराट जागर! 🔥
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पावन भूमीत जामखेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित ‘शिव-फुले-आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवा’त उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात सहभाग नोंदवला. या भव्य कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या हस्ते पार पडले, तर विधानपरिषद सभापती मा. प्रा. राम शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभली. याप्रसंगी महामानवांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून उपस्थित बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले.
⚔️ छत्रपती शिवाजी महाराज — रयतेचे राजे, बहुजन प्रतिपालक! सर्वसमावेशक, न्यायनिष्ठ आणि शेतकरीहिताचे राज्य उभे करणारे शिवराय हे जगातील अद्वितीय राजा होते. अठरापगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभारणारा हा खरा लोकनायक!
📚 महात्मा जोतिराव फुले — सामाजिक क्रांतीचे जनक! शिक्षण, समता आणि सत्यशोधक विचारांनी समाजाला नवा मार्ग दाखवणारे फुले हे खरे ‘नेशन बिल्डर’. त्यांचा विचार आजही प्रेरणादायी दीपस्तंभ आहे.
📜 भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर — संविधानाचे शिल्पकार! शिव-फुले विचारांना घटनात्मक बळ देत आधुनिक भारताचा पाया रचणारे बाबासाहेब हे आर्थिक, जल आणि औद्योगिक धोरणाचे खरे जनक ठरले.
💡 शिव-फुले-शाहू-आंबेडकरी विचारधारा हीच समाज प्रगतीची खरी दिशा असल्याचा ठाम संदेश यावेळी देण्यात आला.
👥 या कार्यक्रमास माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार काशिनाथ दाते, आमदार भिमराव धोंडे, नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी, ॲड. सुभाष राऊत, डॉ. नागेश गवळी, अंबादास गारुडकर, सुभाष लोंढे, तसेच राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 विचारांचा वारसा जपा, परिवर्तनाचा मार्ग स्वीकारा!
━━━━━━━━━━━━━━━
📢 सोशल मीडिया संदेश
👉 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
✍️ संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📲 73 87 37 78 01
🔔 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा! 👍 बातमी लाईक करा | 🔁 शेअर करा | ▶️ सबस्क्राईब करा 📤 फॉरवर्ड करा | 💬 कॉमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबा
📸 आपल्या परिसरातील सत्य बातम्या, व्हिडिओ, फोटो आणि प्रेरणादायी घडामोडी आम्हाला पाठवा — विसरू नका!
━━━━━━━━━━━━━━━
#शिवजयंती #फुलेजयंती #आंबेडकरजयंती #जामखेड #अहिल्यानगर #शिवफुलेआंबेडकर
#सामाजिकक्रांती #संविधान #बहुजन #सत्यशोधक #दिनबंधून्यूज #शिवक्रांतीटीव्ही
#BreakingNews #Maharashtra #Inspiration #SocialAwareness









