iआटपाडी :-बचतगट तयार करून महिलांची आर्थिक फसवणूक कारवाईसाठी आमरण उपोषण!1
आटपाडी :-बचतगट तयार करून महिलांची आर्थिक फसवणूक कारवाईसाठी आमरण उपोषण!
आटपाडी :-बचतगट तयार करून महिलांची आर्थिक फसवणूक कारवाईसाठी आमरण उपोषण!
नानाविध फायनान्स कंपन्यांमार्फत बचत गट स्थापन करून आर्थिक फसवणूक केल्याबद्दल दाम्पत्यावर गुन्हा नोंद करून कारवाई करावी या मागणीसाठी आटपाडीत 6 फेब्रुवारी 2025 पासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. सलमा कमरूद्दीन मुल्ला आणि तिचा पती कमरूद्दीन आलम मुल्ला (रा. मुलाणकी, आटपाडी) या दाम्पत्यावर गुन्हा नोंद करावा, अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गटा) आटपाडी महिला आघाडीच्यावतीने उपोषण सुरू करण्यात आले.
महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा सुश्मिता सुरेश मोटे, लता दादा सागर, लता कुमार कुंभार, उषा प्रकाश चंदनशिवे, निकिता लखन पवार, वंदना भीमराव भिसे, ऐश्वर्या श्रीकांत पवार, पूजा प्रदीप वाघमारे, लक्ष्मी सुहास खरात, कविता दिलीप खरात, नकुसा प्रवीण खरात इत्यादि महिला तहसीलदार
आटपाडी: फायनान्स कंपनीमार्फत बचत गट स्थापन करून आर्थिक फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, या मागणीसाठी बेमुदत उपोषणास बसलेल्या महिला.
कार्यालयासमोर उपोषणास बसल्या आहेत. सुश्मिता मोटे यांच्या म्हणण्यानुसार , मुल्ला दाम्पत्याने महिलांना बचत गट काढून उद्योग व्यवसाय, घरगुती अडचणी सोडविण्यासाठी अल्प दराने व्याज आकारून आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी आमच्या नावे कागदपत्रे तयार करून आम्हाला आवश्यक कर्जाची रक्कम दिली होती. त्यांनी आम्हाला कोणत्याहीकसल्या हि
प्रकारची कल्पना नसताना जादा कर्ज उचलून आमची फसवणूक केली. अनेक महिलांच्या नावे कर्ज काढून ते पैसे घेऊन मुल्ला दाम्पत्य पाबारा करून पळून गेले.
मोटे म्हणाल्या, फायनान्स कंपनीचे एजंट व अधिकारी हे वारंवार आमच्याकडे कर्जाच्या वसुलीसाठी येतात. आम्हा महिलांना त्रास देतात. अरेरावीची भाषा करून, पैसे भरा नाही तर घरे पेटवून देऊ, असे म्हणून शिवीगाळ
करतात.
मोटे सांगतात, स्वाती खामकर, विशाल खामकर, पंकज जगताप (कोल्हापूर) आणि दीपक महाजन (इचलकरंजी) यांच्याकडूनदेखील आमची आर्थिक फसवणूक झाल्याबद्दल आटपाडी पोलिस निरीक्षक यांना १५ मे २०२४ रोजी लेखी तक्रार दिली
आहे. तरीही यासंदर्भात पोलिसांनी अद्याप कसली दखल घेतली नाही कोणतीही कारवाई गुन्हा नोंद झालेला नाही. आर्थिक गुन्हे शाखेने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे म्हणाले
>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात आहे

