स्त्री शिक्षणाची व सामाजिक क्रांतीची मशाल पेटविणाऱ्या आद्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जन्मगावी उभारले जाणार भव्य स्मारक!

स्त्री शिक्षणाची व सामाजिक क्रांतीची मशाल पेटविणाऱ्या आद्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जन्मगावी उभारले जाणार भव्य स्मारक!
आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सावित्रीमाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे त्यांचे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय घेत या स्मारकासाठी १४२ कोटी ६० लाख रुपये, तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी ६७ लाख १७ हजार रुपयांच्या तरतूदीस मंजूरी देण्यात आली. या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे आणि इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री मा. अतुलजी सावे यांचे मनापासून आभार मानतो.
हे स्मारक व्हावे ही समस्त फुलेप्रेमी जनता आणि नायगाव येथील ग्रामस्थांची खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. आपण देखील यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आलो आहोत. सर्वांच्या भावनेचा आदर करत ३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंती दिनी मुख्यमंत्री महोदयांनी या स्मारकाची घोषणा केली होती. या अनुषंगाने सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रक व प्रस्तावास मंजुरी देत आज यासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात आली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
हे स्मारक सावित्रीमाईंच्या कार्याला खऱ्या अर्थाने अभिवादन ठरणार असून महिला प्रशिक्षण केंद्र देखील परिसरातील महिलांच्या सबलीकरणासाठी पुरक ठरणार आहे. आगामी काळात लवकरात लवकर हे स्मारकरुपी प्रेरणास्थान प्रत्यक्षात उभे रहावे, यासाठी सरकार आणि आपण नक्कीच कटिबद्ध राहणार आहोत.
Devendra Fadnavis Ajit Pawar Eknath Shinde – एकनाथ संभाजी शिंदे
#Naygaon #savitribaiphule #ज्ञानज्योती #Maharashtra #education

