माकपच्या संघटनांची कोलकात्यात महाप्रचंड जाहीर सभा!

माकपच्या संघटनांची कोलकात्यात महाप्रचंड जाहीर सभा!
भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) च्या वर्गीय संघटनांनी कोलकात्याच्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर कामगार, शेतकरी, शेतमजूर आणि झोपडपट्टीवासीयांची अभूतपूर्व मोठी, महाप्रचंड जाहीर सभा २० एप्रिलला घेतली. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (CITU), अखिल भारतीय किसान सभा (AIKS), अखिल भारतीय शेतमजूर युनियन (AIAWU) आणि बस्ती उन्नयन समिती (झोपडपट्टीवासीयांची संघटना) या डाव्या वर्गीय संघटनांनी या भव्य रॅलीचे आवाहन केले होते.
माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य व पश्चिम बंगालचे राज्य सचिव, माजी खासदार कॉम्रेड मोहम्मद सलीम, पॉलिट ब्युरो सदस्य आणि CITU सरचिटणीस माजी खासदार कॉम्रेड तपन सेन, AIAWU राज्य अध्यक्ष कॉम्रेड तुषार घोष आणि इतर नेत्यांनी या सभेस संबोधित केले.
या सभेला लाखोंची गर्दी झाली होती. या मैदानावर फक्त डावेच सभा घेऊ शकतात, ते सुद्धा मैदान खचाखच भरून. तृणमुल काँग्रेस आणि भाजप लोकांना पैसे वाटूनही इतकी गर्दी जमा करू शकत नाहीत. ७ एप्रिलला तामिळनाडूच्या मदुराईमध्ये लाखोची आणि त्यानंतर काल पश्चिम बंगालमध्ये कोलकत्यात ही महाप्रचंड सभा ग्वाही देतेय, की डावे आजही जनतेत आहेत.
लाल सलाम!
#PeoplesBrigade
#CPIM #CPIMWestBengal

