‘फुले’ चित्रपटातील काही दृश्यांबाबत मा छगन भुजबळ साहेब यांची निर्मात्यानी भेट घेतली आम्हा फुले आंबेडकरवादींची गंभीर हरकत!



जोतीराव फुले’ आणि ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘फुले’ या चित्रपटामध्ये काही दृश्ये अत्यंत खोट्या आणि भ्रामक पद्धतीने दाखवण्यात आली आहेत. विशेषतः महात्मा फुले यांना मारहाण करणारे दृश्य आणि सावित्रीबाई फुले कोणाच्या मुस्कटात लावतात, असे दाखवले गेलेले दृश्य हे पूर्णपणे ऐतिहासिक सत्याला छेद देणारे आहे.



सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली चुकीचा नॅरेटिव्ह पसरवणे हे अत्यंत धोकादायक असून, क्रांतिकारकांचा इतिहास काळजीपूर्वक आणि अभ्यासपूर्वक मांडला जाणे आवश्यक आहे. सामाजिक परिवर्तनाच्या कार्यात आयुष्य वेचलेले हे दाम्पत्य अशा प्रकारे हिंसक दाखवणे म्हणजे त्यांच्या कार्याचे विकृतीकरण होय.
दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी चित्रपट अनेक पुस्तके आणि साधनांच्या अभ्यासावर आधारित असल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात या दृश्यांनी चुकीचा संदेश समाजात पसरवण्याचा धोका आहे.
मा. छगन भुजबळ यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्मात्यांची भेट घेतली असली तरी त्यांनीही या दृश्यांबाबत स्पष्ट भूमिका घेणे आवश्यक आहे. आम्ही अपेक्षा करतो की ‘फुले’ चित्रपटातून हे दृश्य वगळून ऐतिहासिक सत्य आणि फुले दाम्पत्याचे महान कार्य याचे योग्य चित्रण केले जाईल.
माननीय भुजबळ साहेब!
महात्मा फुले फक्त विशिष्ट जातीचे, विशिष्ट राजकारण्याचे व विशिष्ट लेखकाचे नाहीत ते सार्या जगाचे आहेत कृपया याची नोंद घ्यावी.
समस्त फुले आंबेडकरवादी.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘फुले’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी आज मुंबई येथील निवासस्थानी येऊन भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्याशी चित्रपटासंदर्भात सविस्तर संवाद साधला.
कोणताही ऐतिहासिक अथवा वास्तव कथेवर आधारित चित्रपट तयार होत असताना सिनेमॅटिक लिबर्टी प्रत्येक दिग्दर्शक घेतच असतो. मात्र या चित्रपटात फुले दाम्पत्याचे कार्य, तत्कालीन व्यवस्थेशी संघर्ष हे सर्व अगदी वास्तव स्वरूपात दाखवण्यात आले आहे. अनेक पुस्तकांचा आणि विविध उपलब्ध साधनांचा अभ्यास करूनच हा चित्रपट निर्माण करण्यात आला असल्याचे मत चित्रपटाचे दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी व्यक्त केले.
यावेळी दिग्दर्शक अनंत महादेवन, निर्माते अनुया चौहान कुडेचा, निर्माते रितेश कुडेचा आणि सहनिर्माते रोहन गोडांबे उपस्थित होते.
#phule #mahatmajyotiraophule #Maharashtra #Mumbai
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही#
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी



