🎓 परदेशात झळकले माळी समाजाचे तेज! बुलढाण्याच्या सुपुत्राने स्कॉटलंडमध्ये मिळवली M.Sc. पदवी; अखिल भारतीय माळी महासंघाकडून गौरव आणि अभिनंदन!

🎓 परदेशात झळकले माळी समाजाचे तेज! बुलढाण्याच्या सुपुत्राने स्कॉटलंडमध्ये मिळवली M.Sc. पदवी; अखिल भारतीय माळी महासंघाकडून गौरव आणि अभिनंदन!
माळी समाजासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बातमी! अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त व राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रभाकर सातव (ऐरोली, मुंबई) यांचे सुपुत्र मयूर प्रभाकर सातव यांनी स्कॉटलंडमधील Edinburgh Napier University मधून Master of Science (M.Sc.) in Global Hospitality Management ही पदव्युत्तर पदवी “Merit” श्रेणीत यशस्वीरीत्या संपादन करून माळी समाजाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्या खेडेगावातून सुरू झालेला हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय शैक्षणिक यशापर्यंत पोहोचला आहे. आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवून त्याच्या यशासाठी सातत्याने मेहनत घेणारे प्रभाकर सातव यांचे योगदानही तितकेच प्रेरणादायी आहे. मयूर सातव यांचे हे यश संपूर्ण माळी समाजासाठी अभिमानाची बाब असून युवकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरणारे आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे, कार्याध्यक्ष रमेशभाऊ हिराळकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष विठ्ठल आबा तोडकर, प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर, मा.दामोदर रामकृष्ण गाडगे .
विश्वस्त पुणे.राष्ट्रीय सदस्य अभय तायडे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विजय खरात, प्रदेश सदस्य भीमराव कोथिंबीर आणि पुणे जिल्हाध्यक्ष अमर बोराटे यांनी मयूर प्रभाकर सातव यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
🖋️ संपादकीय संदेश
शिक्षण हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे. ग्रामीण भागातून जागतिक दर्जाचे शिक्षण घेऊन यश संपादन करणारे मयूर प्रभाकर सातव हे माळी समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी उदाहरण आहेत. समाजाने अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले, तर समाजाची भावी पिढी अधिक सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण बनेल.
📢 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी Like करा
📤 Share करा
▶️ Subscribe करा
📨 Forward करा
💬 Comment करा
📲 दिनबंधू न्यूज WhatsApp Channel आणि Group फॉलो करायला विसरू नका!
#Hashtags
#MayurSatao #PrabhakarSatao #MaliSamaj #AkhilBhartiyaMaliMahasangh #Education #GlobalHospitalityManagement #MSc #EdinburghNapierUniversity #PrideOfMaliSamaj #DinbandhuNews #ShivkrantiTV #ShankarraoLinge #Buldhana #Inspiration #SuccessStory








