राजकारण

🚨 “SC आरक्षण उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडणार!” सोलापुरातून सरकारला थेट इशारा; हजारोंच्या महासंग्रामाची घोषणा, पत्रकार परिषदेत कृती समिती आक्रमक!

🚨 “SC आरक्षण उपवर्गीकरणाचा डाव हाणून पाडणार!” सोलापुरातून सरकारला थेट इशारा; हजारोंच्या महासंग्रामाची घोषणा, पत्रकार परिषदेत कृती समिती आक्रमक!

सोलापूर येथे अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या प्रस्तावित अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या भूमिकेचा तीव्र निषेध करण्यात आला. समितीने आरोप केला की, राज्यातील ५९ अनुसूचित जातींच्या हिताचा विचार न करता एकतर्फी अहवाल स्वीकारून सामाजिक न्यायावर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.

पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने समिती नेमली; मात्र सर्व घटकांना विश्वासात न घेता अहवाल स्वीकारण्यात आल्याने राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. हा निर्णय रद्द करावा, अन्यथा राज्यव्यापी तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, न्यू बुधवार पेठ, सोलापूर येथून पुणम गेटपर्यंत भव्य महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. या मोर्चात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू मा. आनंदराज आंबेडकर, माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, सुहास खामकर, तसेच विविध समाजांचे नेते सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

पत्रकार परिषदेत विविध आंबेडकरी संघटना, सामाजिक संस्था आणि अनुसूचित जातीतील सर्व घटकांना मोठ्या संख्येने महामोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

पत्रकार परिषदेला उपस्थित प्रमुख पदाधिकारी
जनार्दन शिंदे
कुमार चव्हाण
सचिन गुळगुणे
राजाभाऊ सोनकांबळे
श्याम क्षीरसागर
प्रशांत गणेपवार
प्रविण कांबळे
अमित कांबळे
आकाश बनसोडे
विठ्ठल हन्नमाणे
कमलाकर बनसोडे
विनोद इंगळे
सिद्धार्थ कांबळे
शरणू हजारे
विजजीत सरवदे

✍️ संपादकीय संदेश

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रश्नावर समाजातील विविध संघटनांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली आहे. लोकशाही व्यवस्थेत अशा प्रश्नांवर संविधानिक आणि शांततामय मार्गाने भूमिका मांडणे महत्त्वाचे आहे.

दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 7387737801

📲 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा.
📤 शेअर करा.
▶️ सबस्क्राईब करा.
📨 फॉरवर्ड करा.
💬 कॉमेंट करा.
📢 दिनबंधू न्यूज WhatsApp Channel आणि Group फॉलो करायला विसरू नका.

#दिनबंधू_न्यूज #शिवक्रांतीTV #सत्यशोधक_शंकरराव_लिंगे #सोलापूर #पत्रकार_परिषद #SCआरक्षण #उपवर्गीकरण #सामाजिक_न्याय #जयभीम #जयसंविधान

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button