अनुभवलेते पाणीदार आमदार सिद्धाराम जी म्हेत्रे साहेब

अनुभवलेते पाणीदार आमदार सिद्धाराम जी म्हेत्रे साहेब
नामदेव वेकुळे
अक्कलकोट तालुक्याचे आमदार व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष श्री सिध्दारमजी म्हेत्रे हे संगणकाप्रमाणे काम करणारे असून काम पेऊन येणाऱ्या व्यक्तीचे काम लगेच केले जाते. कामामध्ये कुठल्याही पध्दतीचे राजकारण न करता काम सांगणाऱ्याचे समाधान व त्याला सोईस्कर होईल असे काम करून देतात लोकांना जवळ करण्याचा व सतत एकत्रीत करण्याचा गुण आमदारांच्या अंगी आहे. स्वकर्तृत्वावर त्यांनी अक्कलकोट कांग्रेस आय कमिटीस मानाचे स्थान मिळवून दिले नवनवीन कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचे काम सतत करीत असतात
कार्यकत्यांचे हसत स्वागत, आस्थेने चौकशी करतात संबंधित कामासाठी लगेच फोन यामुळे कार्यकत्यांना आमदार सिध्दाराम म्हेत्रे हे एक फार मोठे आधार आहेत. विशेषत ग्रामीण भागातून आलेल्या ज्यांच्यावर अन्याय झालेला असतो तो प्रश्न तेवढ्याच समर्थपणे सोडवून कार्यकर्त्याला न्याय मिळवुन देतात, त्यामुळे ते जनतेच्या न्यायालयातील न्यायाधीश आहेत. गोर-गरीबांच्या अडी-अडचणी लक्षात घेवून कुठल्याही जाती, धर्माचा भेदभाव न करता गरीब श्रीमंतीचा भेदभाव न करता एखादा अडचणीत पडल्या किंवा संकटात सापडलेल्याना त्यातून बाहेर काढून स्वाभिमानाने जगण्यास शिकवतात. आमदार साहेबानी तालुक्यातील प्रलबित कामे उदा ग्रामीण रुग्णालय, पोलिस
हेडक्वार्टर या सारखी असंख्य कामे पूर्ण केली व तालुक्याची वरदायनी ठरलेली बोरी प्रकल्पाचे (कुरनूर धरण) काम पूर्ण केले असंख्य रस्ते व पाणलोट क्षेत्र विकासाची कामे मोठ्या जिद्दीने व तळमळीने केली आहेत. आमदार म्हेत्रेचा जनसंपर्क एवढा मोठा आहे की, तालुक्यातील सर्व गावे, वाड्या-वस्त्या पर्यंत पोहचणारे हे पहिलेच आमदार आहेत असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही एखाद्या संस्थेत भ्रष्टाचार अथवा जनतेवर अन्याय होत असल्यास ते जनतेत जाऊन लोकशाही पध्दतीने जागृती करतात. पाणी हे जीवनदान असून पाण्याचा वापर काटकसरीने करण्यास सांगतात त्यावरुन भविष्यात येणाऱ्या संकटाची सुचना देतात. त्यामुळे आमदार म्हेत्रे हे जागरुक लोक प्रतिनिधी आहेत, त्यांचे कार्य पारदर्शक, स्पष्ट व कर्तव्यदक्ष असल्यामुळे आमदार सिध्दाराम म्हेत्रे हे लोकप्रिय आमदार आहेत.
जसे ज्ञान म्हणजे बुध्दीचा विकास, प्रेम म्हणजे हृदयाचा विकास शक्ती म्हणजे शरीराचा विकास तसेच आमदार सिध्दाराम म्हेत्रे म्हणजे अक्कलकोट तालुक्याचा विकास ज्याच्या अंगात पाणी घरात पाणी त्याच्या दारात पाणी त्याच्या शेतात पाणी त्याच्या तालुक्यात पाणी त्याच्या मतदारसंघात पाणी सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पाणीच पाणी करणारा हा ठाणेदार नेता सिद्धाराम जी म्हेत्रे साहेब सातव्यांदा काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सिद्धाराम जी म्हेत्रे साहेब यांनी आपला अर्ज अक्कलकोट विधानसभेसाठी भरला आहे अक्कलकोटच्या जनतेने त्यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि उर्वरित विकास कामे करून घ्यावी आपल्या अडीअडचणी सोडवून घ्याव्यात हीच सर्व अक्कलकोट मतदार संघातील मतदारांना नम्र विनंती नामदेव वेकुळे
.दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

