सोशल

रायगडमधील पनवेल येथील ‘रयत शिक्षण संस्थे’च्या ‘छत्रपती शिवाजी विद्यालय’, ‘कै. गोटीरामशेठ पाटील कॉमर्स व सायन्स ज्यु. कॉलेज’, ‘श्री. लक्ष्मण अर्जुन पाटील इंग्रजी प्री. प्रायमरी इंग्लिश स्कुल, वावंजे’च्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

रायगडमधील पनवेल येथील ‘रयत शिक्षण संस्थे’च्या ‘छत्रपती शिवाजी विद्यालय’, ‘कै. गोटीरामशेठ पाटील कॉमर्स व सायन्स ज्यु. कॉलेज’, ‘श्री. लक्ष्मण अर्जुन पाटील इंग्रजी प्री. प्रायमरी इंग्लिश स्कुल, वावंजे’च्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, संस्थेचे सचिव विकास देशमुख, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील, संस्थेचे रायगड विभागीय चेअरमन बाळाराम पाटील, संस्थेला शक्ती देणारे रामशेठ ठाकूर, महेंद्र घरत, जे. एम. म्हात्रे, जी. आर. पाटील, अन्य सर्व सहकारी व उपस्थित बंधू भगिनींनो…

एका चांगल्या सोहळ्यासाठी आपण इथे एकत्र जमलो आहोत. एक काळ असा होता कि शिक्षण, ज्ञान समाजाच्या शेवटच्या माणसाच्या कुटुंबापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचलं पाहिजे असं एक मिशन कर्मवीरांनी घेतलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले, लोकांना प्रोत्साहित केलं, त्या ध्येयाने ‘रयत शिक्षण संस्था’ उभी केली. आणि आज आनंद एका गोष्टीचा आहे कि, लक्षावधी विद्यार्थी हे जीवनाच्या विविध क्षेत्रामध्ये शिक्षित होऊन अतिशय मोलाची कामगिरी करत आहेत त्याची तयारी हि कर्मवीरांच्या विचारातून झाली.

त्या विचाराचा विस्तार होतोय. पण एक काळ असा होता, हा विस्तार सातारा असेल, कोल्हापूर असेल, सांगली असेल अशा ठराविक भागामध्ये होत होता. रायगड जिल्हा महाराष्ट्राचा ऐतिहासिक जिल्हा. लोक कष्टकरी आहेत. शेतीवर भरवसा आहे. ह्या ठिकाणी ह्या क्षेत्रात अधिक काम करण्याची आवश्यकता आहे ह्याची नोंद कै. एन. डी. पाटील ह्यांनी घेतली आणि अनेक सहकारी तयार करून रायगड विभागामध्ये आज ३७ च्या आसपास शाखा उभारण्यात संस्था यशस्वी झाली ह्याचं मोठं श्रेय हे कै. एन. डी. पाटील ह्यांना द्यावं लागेल. त्यांच्या नंतरच्या काळात जी. बी. पाटील असतील, त्यांचे अन्य सहकारी असतील ह्या प्रत्येकाने मेहनत केली आणि त्याचा परिणाम आज ठिकठिकाणी शाखा झालेल्या आहेत.

आज आपण जिथे आहोत ती इंग्रजी माध्यमाची शाळा, ज्युनिअर कॉलेज अशा अनेक उत्तम शाखा आज ह्या भागात उभ्या राहिलेल्या आहेत. त्याच्यामागे अण्णांचं जे सूत्र होतं शेवटच्या कुटुंबातील मुलगा हा शिक्षित झाला पाहिजे, आत्मविश्वासाने उभा राहिला पाहिजे. चित्र बदलतंय. एकेकाळी रायगड जिल्हा हा शेतीमध्ये फारसा नव्हता. पण आता रायगडचा चेहरा बदलतोय. आणखी वर्ष-दिड वर्षात इथे आंतरराष्ट्रीय विमानतळ येईल. एकदा का आंतरराष्ट्रीय विमानतळ आलं कि हजारो उद्योग येतील.

तुमच्या आजूबाजूला अनेक कारखानेही उभे राहिले आहेत, येणाऱ्या काळात आणखी कारखाने येतील. हे सगळं पाहिलं कि, हा भाग बदलतोय ह्याचं लक्षण. हा बदल स्थानिक जनतेच्या कुटुंबातील मुलांमध्ये दिसला नाही तर माझ्या मते ह्या बदलाला काहीही अर्थ नाही. म्हणून नव्या पिढीला आत्मविश्वासाने उभं राहायला, ह्या घडणाऱ्या बदलांमध्ये नेतृत्व करायला पुढे येण्यासाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आणि त्यास्तही शिक्षण आणि आत्मविश्वासाने ज्ञान संपादित करण्याचा कर्मवीरांचा दृष्टिकोन हा अत्यंत मोलाचा आहे आणि ते काम इथं होत आहे.

चंद्रकांत दळवींनी आता सांगितलं कि, संस्थेने आता कात टाकली आहे. आता नव्या रस्त्याने आपण जात आहोत. आज सगळ्या जगामध्ये एकाच गोष्टीची चर्चा आहे ज्याचा उल्लेख दळवींच्या भाषणात आला ते म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. हे तंत्र चमत्कार करणारं आहे. त्या तंत्रापासून आमची मुलं मागे राहता कामा नये. मला आनंद एका गोष्टीचा आहे, आज रयत शिक्षण संस्थेमधल्या आमच्या सर्व सहकाऱ्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो कि, जगात होणाऱ्या नव्या बदलांची नोंद रयत शिक्षण संस्थेने वर्षांपूर्वी घेतली आणि प्रत्येक शाखेमध्ये ह्याबद्दलचा विचार हा कसा पोहचवता येईल ह्या दृष्टीने पावलं टाकायला सुरुवात केली.

 

माझी खात्री आहे कि थोड्याच दिवसामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचा आत्मविश्वासाने स्वीकार केलेली शिक्षित पिढी ह्या भागामध्ये उभी राहिल्यानंतर होणारं नवं विमानतळ असेल, नवी कारखानदारी असेल, जगातील नवे बदल असतील ह्या सगळ्यामध्ये रायगडमधल्या खेडोपाड्यातील शेतकऱ्याचा, शेतमजुराचा, कष्टकऱ्याचा कुटुंबातील मुलं पुढे यातना आपल्याला पाजायला मिळतील. त्या दृष्टीने रयत शिक्षण संस्था योग्य पावलं टाकत आहे, ह्याचा मला आनंद आहे. म्हणून अशा कार्याला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे.

नवं विमानतळ इथे होतंय पण रायगडमधील ज्यांच्या जमिनी जातायत ते आमचे सगळे सहकारी अस्वस्थ आहेत. एक-दोन बैठक आमच्या झाल्या. आज बाळाराम पाटील इथे आहेत. रामशेठ ठाकूर इथे आहेत. मी आमच्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो कि, ह्या विषयातल्या प्रमुख लोकांना घेऊन आपण बसुया. ज्यांचं नुकसान होतंय ते कसं भरून काढता येईल ह्याचा विचार करूया. ह्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमध्ये धोरणात्मक काही बदल करण्याची काही आवश्यकता आहे का? ह्याचा विचार करूया. मी तुम्हाला खात्री देतो सरकार कुणाचंही असो ते दिल्लीला असो वा महाराष्ट्रात असो.. ह्या सगळ्या क्षेत्रात रायगडमध्ये, ठाण्यामध्ये जे बदल होणार आहेत त्याची नोंद घेऊन इथला सामान्य माणूस हा त्या बदलाचा, विकासाचा लाभधारक होईल, ह्याची काळजी घ्यायची जी आवश्यकता आहे ती आपण एकत्र बसून तशी काळजी घेऊ आणि लोकांना न्याय देऊ.

मला आठवतंय… एक काळ असा होता कि, इथे विकासाच्या कामाला लोकांनी काही जरी विरोध केलं तरी नवी मुंबई झाली. इतर काही गोष्टी झाल्या. संघर्ष झाले. मला आठवतंय… डी. बी. पाटील त्या काळात शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. मला आठवतंय… त्यांच्या गावी तरुण मुलं मृत्युमुखी पडली पण त्याची चिंता न करता प्रत्येक शेतकऱ्याला ह्या बदलाचा लाभ व्हावा ह्यासाठी डि. बी. पाटील आणि तात्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा केली. त्याचा लाभ आज कुठे ना कुठे दिसतोय. कारखाने आले, नवी मुंबई उभी राहते, तिथे जमिनी घेतल्या जातात. सुदैवाने त्यावेळी राज्याचं मुख्यमंत्री पद माझ्याकडे होतं. डी. बी. पाटील आणि तुम्हा लोकांच्या आग्रहामुळे त्यावेळी एक धोरणात्मक निर्णय आम्ही घेतला कि,

नुकसान भरपाई देऊच पण स्वयंरोजगारासाठी १२.५ टक्के विकसित जमीन इथल्या शेतकऱ्यांना देऊ आणि त्या धोरणाप्रमाणे जमिनी शेतकऱ्यांना दिल्या. त्याचा परिणाम आज काही ना काही प्रमाणात मला दिसतोय. पण एवढ्यावर समाधान मानायचं नाही. हे जे शिक्षणामध्ये, तंत्रज्ञानामध्ये जे बदल होत आहेत त्या बदलांची नोंद घेऊन रयतेने पावलं टाकायची ठरवली आहेत त्याचा लाभ आपली नवी पिढी अधिकाधिक घेईल ह्यावर आपण लक्ष केंद्रीत करूया. ह्या भागाचा चेहरामोहरा बदलूया. लोकांचा संसार सुधारुया. ते करण्यासाठी अण्णांचा विचार हाच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना प्रेरणा देईल. त्या विचाराच्या पाठीशी मजबुतीने उभे राहू, एवढीच खात्री देतो. धन्यवाद !

#दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button