राजकारण

पार गोदावरी एकात्मिक नदीजोड योजना राबविण्यासाठी आज जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात मुंबईतील विधानभवन येथे बैठक पार पडली

पार गोदावरी एकात्मिक नदीजोड योजना राबविण्यासाठी आज जलसंपदा मंत्री मा. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वात मुंबईतील विधानभवन येथे बैठक पार पडली. नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व संबंधित शासकीय अधिकारी यांच्यासमवेत पार पडलेल्या या बैठकीला उपस्थित राहिलो.

पार-तापी-नर्मदा हा आंतरराज्य प्रकल्प रद्द करून घेतल्यामुळे नार-पार खोऱ्यातील शिल्लक 9.76 टीएमसी आणि उपसा सिंचन योजना क्रमांक 3 आणि 4 चे 3 TMC हे सर्व पाणी एकत्रित करून पार-गोदावरी हा एकात्मिक नदीजोड प्रकल्प राबवण्याची मागणी आहे. हे पाणी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, येवला आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर या दुष्काळी भागात नेण्यासाठी पायाभूत सुविधा आपण मांजरपाडा योजनेच्या माध्यमातून आधीच करून ठेवल्या आहेत. मांजरपाडा प्रकल्पमार्गे पार गोदावरीचे पाणी पुणेगाव धरणातून पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याद्वारे दिंडोरी, चांदवड, येवला आणि संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर या दुष्काळी भागात नेले जाणार आहे.

दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेमध्ये तांत्रिक सुधारणा करून एकदरे धरणाचे पाणी वाघाड, करंजवण, ओझरखेड व तिसगाव धरणात वळविण्याची मागणी यावेळी आपण केली.

एकदरे धरणाचे पाणी वाघाड धरणातून मराठवाड्याला जाणार आहे. त्या पाण्यातील काही पाणी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, चांदवड, येवला, नांदगाव व निफाड तालुक्यांतील अतिदुष्काळी भागातील गावांना दिल्यास या भागातील पिण्याच्या, शेतीच्या व औद्योगिकीकरणाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे शक्य आहे. त्याकरिता वाघाड धरणात येणाऱ्या पाण्यामधून काही पाणी कॅनॉलद्वारे करंजवण धरणात आणल्यास आणि करंजवण, ओझरखेड, तिसगाव ही धरणे एकमेकांना जोडल्यास ही तिन्ही धरणे एकदरे धरणातील अतिरिक्त पाण्याने भरली जातील. अशा प्रकारे करंजवण, ओझरखेड, तिसगाव धरणाची पाण्याची तूट कायमस्वरूपी भरून निघेल, अशी मागणी आपण मांडली.

या बैठकीला अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार पंकज भुजबळ, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दिपक कपूर, सचिव डॉ. संजय बेलसरे, नाशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे अधीक्षक अभियंता शिंगाडे आदी उपस्थित होते.

#nashik #yeola #maharashtra #river #water
#दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button