शरणगाथा क्रमशा.28

शरणगाथा क्रमशा.28
केवळ जात व जन्माच्या आधारावर असलेली वर्ण व्यवस्था बसवण्णांन नाकारली. जन्माच्या नव्हे श्रमाच्या कामाच्या वर्गवारीतून त्या व्यक्तीची ओळख असावी, असा आग्रह बसवण्णांनी धरला होता. ‘लोखंड तापवून लोहार झाला कपडे धुवून परीट झाला,’ अशी श्रमाधिष्ठित व्यवस्था ते मांडतात. जन्माक आधारित भेदाभेदाबद्दल बोलताना जाती आणि कुळाच्या चर्चेत स्वतःची जन्मकथ सांगताना बसवण्णा म्हणतात,
चन्नय्याच्या घरी काम करणाऱ्या सेवकाचा पुत्र आणि कक्कय्यांच्या घरी काम करणाऱ्या दासीची कन्या, या दोघांनी शेतात जाऊन संग केल्यानंतर माझा जन्म झाला.
याला कुडलसंगमदेव साक्षी आहे.
मी उत्तम कुलात जन्मलो म्हणत माझ्या डोक्यावर मोठेपणाचे ओझे लादू नका देवा. मी त्यांच्या पोटी अनौरस कुलात जन्मलो आहे. (समग्र वचन संपुट-१: वचन क्रमांक ३४६)
स्वतःच्या सामाजिक स्तराबद्दल बोलतांना दुसऱ्या एका ठिकाणी ते म्हणतात, माझा जन्म कष्टकऱ्यांच्या जातीत झाला आहे.
माझे पिता मादर चन्नय्या आहे.
आजोबा कक्कय्या आहे. माझ्याहून कोणी लहान नाही.
जगात शिवभक्त सर्वश्रेष्ठ आहेत.
त्यांच्याहून कोणीही मोठा नाही. मी तुमच्या दासांचा दास आहे.
(समग्र वचन संपुट-१: वचन क्रमांक ३४९) भविष्य, ग्रहण आणि शुभाशुभ समजल्या जाणाऱ्या संकल्पनांवर बसवण्णांनी कडाडून
हल्ला केला आहे. तिथी, अमावास्या, अष्टमी, नवमी, संक्रांती, एकादशी अशा संकल्पनांवर बसवण्णा प्रहार करतात. कर्मकांडाला विरोध करताना बसवण्णांची भूमिका वज्राहून कठोर आहे. या ना त्या कारणाने बळी मागणाऱ्या ‘मारी मसणी’ मारी-मरिआईसारख्या लोकदैवतांचा, त्यांच्यासमोरील कर्मकांडाचा बसवण्णांनी समाचार घेतला आहे. नवसाच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पशुबळीचा निषेध त्यांनी केला आहे. बळीसाठी आणलेल्या
बोकडाला उद्देशून बसवण्णा म्हणतात, नवस केला म्हणून तुला कापणार आहेत.
म्हणून रड बोकडा रड, रड वेद वाचलेल्या पंडितांसमोर, रड शास्त्र सांगणाऱ्यांसमोर, तुझा घास घेणाऱ्यांसमोर रड,
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




