क्राईममहाराष्ट्र

लातूर टाकळी माऊली सोट अठरा वर्षे तरुणाची निर्गुण मारहाणीत हत्या जातीवादाचा बळी!

  1.  I l   1लातूर टाकळी माऊली सोड अठरा वर्षे तरुणाची निर्गुण मारहाणीत हत्या जातीवादाचा बळी! अभा माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर यांनी पीडित कुटुंबाची सांत्वन पर भेट घेऊन शिवक्रांती टीव्हीसाठी आई-वडिलांची नातेवाईकांची मुलाखत घेतली माऊली उमाकांत सोड या तरुणाची अमानुष मारहाण करून डोक्याच्या खालील सर्व शरीराची हाडे मारून मारून चुरा केलेली होती हत्या करण्यात आली v Do फोटो पहा

  • तूर टाकळी येथील माऊली सोट या अठरा वर्षे वयाच्या तरुणाची मारहाणीत निघृण हत्या केली हा जातीवादाचा बळी आहे!

 

या कुटुंबाची अ.भा.माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सत्यशोधक शंकरराव लिंगे, प्रदेशाध्यक्ष गौतम क्षीरसागर यांनी पीडित कुटुंबाची सांत्वन पर भेट घेऊन शिवक्रांती टीव्हीसाठी आई-वडिलांची नातेवाईकांची मुलाखत घेतली माऊली उमाकांत सोट या तरुणाची अमानुष मारहाण करून डोक्याच्या खालील सर्व शरीराची हाडे मारून मारून चुरा केलेली होती. अशाप्रकारे हत्या करण्यात आली. यांचे वडील उमेश यशवंत सोट, आई अर्चना उमाकांत सोट, भाऊ अभिषेक उमाकांत सोट अनिल शंकरराव सोट, श्याम खांडेकर, भाऊसाहेब पाटील दगडू बने, अनिल भोईकर, भाऊसाहेब सोट इत्यादी उपस्थित होते. सत्यशोधक शंकरराव लिंगे अखिल भारतीय माळी महासंघ, राष्ट्रीय अध्यक्ष, गौतम शिरसागर, अखिल भारतीय माळी महासंघ प्रदेशाध्यक्ष यांनी समक्ष टाकळी जिल्हा लातूर येथे त्यांच्या घरी जाऊन समक्ष घेतलेली मुलाखत यावेळी मयत तरुणाचे वडील आई नातेवाईक इत्यादी उपस्थित होते एफआयआर मधील मजकूरानुसार बातमी देत आहोत.

 

भाऊ भाऊसाहेब सोट हे आले त्यांनी आम्हांला मारहाण करीत असल्याने सोड़वा सोडव करून त्यांनी “तुझी पोलीसात तक्रार केली तर तुम्हालापण बघुन घेवु” असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी देवुन निघुन गेल्यानंतर भाऊसाहेब सोट यांस “मुलगा माऊली यास कमलाकर डुरेच्या घरासमोर मारून टाकले आहे.”असे म्हणत आहेत “तुम्ही न्या” असे म्हटल्याने मी व सोबत विलास कुकार्ड असे आम्ही दोघे कमलाकर डुरे यांचे दारात जावुन पाहीले असता, तेथे गावातील बरेच लोक जमलेले होते. माऊली सोट हा खाली पडलेला होता त्याचे दोन्ही पायाला, दोन्ही हाताला व नाकातून रक्त येत असल्याचे दिसले. आम्ही त्यास आम्ही दवाखान्यात नेण्यासाठी उचलत असताना आम्हाला कमलाकर डुरे यांनी “तुम्ही त्यास दवाखान्यात न्यायचे नाही” असे म्हणाल्याने आम्ही तेथेच थांबालो. थोड्या वेळात तेथे पोलीस आले. त्यानंतर पोलीसाचे समोर आम्ही माऊली सोट यांस माझ्या जीप मध्ये घालुन मी, भाऊसाहेब सोट, मोठा मुलगा अभिषेक असे आम्ही त्याला उपचारासाठी लातूर येथे घेवुन येत असताना मुलगा माऊली याने आम्हाला सांगीतले की, “माझ्याकडे मुलीने कमलाकर डुरे मार्फत चिठ्ठी देवून भेटण्यासाठी घराकडे बोलाविल्याने मी एकटाच तिच्या घराकडे गेलो. मी रोहीनीच्या घरासमोर अंदाजे 9.00 वा. चे सुमारास गेलो असता तेथे थांबलेले
1. कमलाकर नरहारी डुरे
2. कुमार विनायक उकाड
3. मनोज विनायक उफार्डे
4. गोविंद रंगनाथ कुरे
5. ओम श्रीमंत खेडकर
6. गोपालनाथ डुरे

सर्व रा. टाकळी ता. जि. लातूर हे सर्वजण माझ्या जवळ आले व त्यांनी तु आमच्या पोरीला पळवुन नेले. काही करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सरुवात केली. मला ओढून, गोपाळ डुरे, कमलाकर डुरे यांनी काठीने व गोविंद डुरे, मनोज उफाडे यांनी शॉकऑब्झाॅर्व्हर्सने जिवे मारण्याचे उद्देशाने मारहाण करीत होते. मी जोरजोराने ओरडत होतो. त्यावेळी गावातील बरेच लोक तेथे सोडण्यासाठी कोणीही समोर येत नव्हते. मला मारहाण करीत असतानां त्यांनी माझ्या दोन्ही पायाचे मध्यावर मारुन चार तुकडे केले व दोन्ही हातावर डोक्यात, पाठीवर व इतर ठिकाणी काठीने व रॉडने मारहाण करत होते, तेव्हा कमलाकर डुरे यांनी “याला मारून टाका हा जिवंत नाही राहीला पाहीजे” असे म्हणून मारहाण करीत होते. मारल्यानंतर वरील सर्वजण “चला हा मेला. आता याच्या घराकडे जाऊ” असे म्हणून हे सर्वजण निघुन गेले असल्याचे सांगीतले. आम्ही मुलगा माऊली यास दिनांक 28/11/2024 रोजी 12.30 वा. सुमारास ऍडमिट करून उपचार सुरु केले. मुलगा माऊली यांस ऍडमिट केल्यानंतर मुलगा माऊली याच्या प्रकृती मध्ये सुधारणा होत नसल्याने तेथील डॉक्टरांनी त्यास 30/10/2024 रोजी उपचारासाठी गैलक्सी हॉस्पीटल लातूर येथे रेफर केले असुन मुलगा अजून सुद्धा बेशुद्ध च होता. 27/10/2024 रोजी रात्री 09.00 वा चे सुमारास माझा लहान मुलगा माऊली उमाकांत सोट वय 18 वर्षे रा. टाकळी यास आमच्या गावातील
1. कमलाकर नरहारी डुरे
2. कुमार विनायक उफाडे
3. मनोज विनायक उफाडे
4. गोविंद रंगनाथ डुरे
5. ओम श्रीमंत खेडकर
6. गोपाळ रंगनाथ डुरे

सर्व रा. टाकळी ता. जि. लातूर यांनी, “तु आमची मुलगी रोहिणी हिस पळवून घेवून जातोस का? “असे म्हणून ओम खेडकर, गोपाळ डुरे, कमलाकर डुरे , यांनी काठीने व गोविंद डुरे, मनोज उफाडे यांनी जिवे मारण्याचे उद्देशाने शॉकऑब्झाॅर्व्हरच्या लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर खुनी हल्ला करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. तरी वरील सर्व गुन्हेगारांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी.

सदर प्रकरणांमध्ये स्थानिक आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांनी पीडितांना भेट दिली नाही सरकारी मदतही कोणत्याही प्रकारची मिळालेली नाही आमदार सुरेश धस मनोज जरांगे स्वघोषित समाजसेविका करतील अंजली बाई दमानिया या कोणत्या बिळात लपून बसले आहेत ते कळत नाही इतर प्रकरणांमध्ये ज्या पद्धतीने भाग घेतात प्रकरण धसास सास लावतात मोर्चे आंदोलन करून शासनास वेठीस धरतात मिळवून देतात पीडितांना मदत मिळवून देतात न्याय मिळविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतात परंतु ओबीसी मागासवर्गीय म्हटले की यांची वाचा बसते तोंड शिवल्यासारखे मूग गिळून गप्प का बसतात माझ्याकरता धरता हाताशी आलेला मुलगा मरण पावला त्याची हत्या केली आता आम्हाला कोण न्याय देणार या वयात आम्हाला कोण सांभाळणार आमचे उर्वरित आयुष्य कसे जाणार आज पर्यंत कोणतीही सरकारी मदत का मिळाली नाही आम्हास न्याय कोण मिळवून देणार आमच्यावर एवढा मोठा अन्याय का झाला असेल आमच्यावर कोणीच का लक्ष देत नाही असे अनेक प्रश्न पीडितांनी अश्रू ढाळीत अतिशय दुःखी कष्टी अंतकरणाने अनेक प्रश्न सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे यांना विचारले

विधानसभेमध्ये माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांनी पोट तिडकेने हा प्रश्न विधानसभेत सभापती महोदयांना समजावून सांगितला अनेक प्रकारच्या मागण्या केल्या यावर अनेक ओबीसी मंत्र्यांनी आमदारांनी विधानसभेत विधान परिषदेत चर्चा केली परंतु आजपर्यंत कोणताही निर्णय झाल्याचे दिसले नाही या प्रकरणाचा तपास अतिशय धिम्या गतीने करून ज्या मुलीमुळे माऊली सोट या तरुणाचा निघृण खून झाला त्याला फसवून घात केला त्या मुलीला आरोपी बनविले नाही अनेक आरोपींना बरेच दिवस मोकाट सोडले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणून शासनाने यामध्ये लक्ष घालून पिढी त्यांना न्याय द्यावा व मदत करावी या तरुणाला उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पीडित आई-वडिलांनी आपली जमीन विकून 25 ते 30 लाख रुपये खर्च केला तरी त्याचा उपयोग झाला नाही आता तरी शासनाने पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा अशी मागणी ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी केली आहे या प्रकरणांमध्ये ओबीसी योद्धा नवनाथ वाघमारे प्राध्यापक लक्ष्मण हाके इत्यादी ओबीसी नेत्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन रस्त्यावरची लढाई लढण्याचा प्रयत्न केला आहे परंतु या पीडितांना कायदेशीर न्यायालयीन लढाई करण्याची गरज आहे त्यासाठी सत्यशोधक शंकरराव लिंगे आणि माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यामार्फत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले

उपरोक्त माहिती पिडीताच्या नातेवाईकांनी तसेच FIR नुसार टंकलिखीत केला असुन तो बरोबर आहे.

दिन​बंधू न्यूज

शिवक्रांती टीव्ही

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई #मुंडे​
#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button