सोशल

ओबीसी मराठा बहुजन मोर्चे-प्रतिमोर्चे व पुरोगामी महाराष्ट्राची वैचारिक फरफट संपादक प्रा. श्रावण देवरे

प्रकाशक

महाराष्ट्रg ओबीसीt संघटना फुले आंबेडकर तत्त्वज्ञान संस्था
[ महा-फरफट. !
२२०१३००/-

फुले शाहू आंबेडकरांची जात्यंतक क्रांति राजकीय व सांस्कृतिक आघाडीवर पराभूत झालेली असली तरी सामाजिक व मानसिकदृष्ट्या तीने महाराष्ट्राला एका अढळ अशा उंचीवर आणून ठेवले होते. त्यामुळे एकमेकांना जातीच्या नावाने बोलावणे, एकमेकांना जात विचारणे, वस्तूंची उसनवारी वा देवाण-घेवाण आदि अशा अनेक वरवरच्या व्यवहारात जातीला निषिद्ध मानलं गेलं. जातीअंताच्या दिशेने झेपावत असलेले एक स्तुत्य असे हे पाऊल होते. म्हणूनच साऱ्या भारतात महाराष्ट्राची ओळख ‘फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र’ म्हणजेच ‘पुरोगामी महाराष्ट्र’ अशीच होती. ही उंची निश्चितच फुले शाहू आंबेडकरी क्रांतीने व तिचा पाठपुरावा करणाऱ्या अनेक पिढ्यातील असंख्य कार्यकत्यांनी कष्टाने गाठलेली होती. या उंचीवरून महाराष्ट्रीयन माणसाचा कडेलोट करणाऱ्या घटना गेल्या ६ महिन्यांपासून घडत आहेत. आज महाराष्ट्रात माणसे एकमेकांना उघडपणे जात विचारत आहेत, चारचौघात आपल्या जातीचा गौरवास्पद उल्लेख व परजातीचा हिन उल्लेख करत आहेत. चारचाकी दुचाकी गाड्यांवर स्टिकर लावून जातीचा उन्माद दर्शवणारी वाक्ये लिहीली जात आहेत. सोशल मिडियावर तर, ‘नाद नाही करायचा’, ‘हम भी आये लाखो में’, वगैरे धमक्या उघडपणे दिल्या जात आहेत. आणि हे सर्व करतांना व पाहतांना ‘काहीतरी चूकीचे घडते आहे’ असे किंचितही कोणाला वाटत नाही. आयुष्यभर सत्यशोधक चळवळीसाठी वाहून घेणाऱ्या एका वर्ग-१ अधिकाऱ्याला दुसरा एक सत्यशोधक कार्यकर्ता औरंगाबादच्या क्रांतीचौकात सहजपणे विचारून जातो, ‘साहेब इकडे कुठे ? हा तर आमच्या जातीचा क्रांती मोर्चा आहे!’

सर्वसामान्य कार्यकर्ता वा माणूस यांना दोष देऊन उपयोग नाही. जेथे समाजाला दिशा देणाऱ्या विचारवंत, बुद्धीजीवींनीच जातीचे शेण खाण्यात धन्यता मानली, तेथे दोष कुणाला द्यायचा? घडणाऱ्या घटनांचे निपक्षपातीपणाने वर्णन विश्लेषण करणे, मुळाशी जाऊन कार्य-कारणभावाचा शोध घेणे व समाजाला दिशा देणे याचा विसरच पडल्यासारखे झाले आहे. समाजवादापासून ते मार्क्सवादापर्यंतची व गांधीवादापासून अध्यात्मवादापर्यंतची सारी क्रांतीकारक व सुधारणावादी तत्वज्ञाने गळून पडली आहेत. महाराष्ट्रातील एकमेव वैचारिक मासिक असलेल्या ‘परिवर्तनाचा वाटसरू’ ने चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला परंतू, तेथेही

अठहले अनन्या आले. शक्य तितके, अशा विद्वानांनी धैर्याने परिस्थितीला पुरोगामी वळण घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना एकतर बहिष्कृत करण्यात आले आणि त्यांचा अपमान करण्यात आला किंवा त्यांचा उल्लेख न करता त्यांना मारण्यात आले. ही सारी चर्चा एकतर्फी आहे, जातीच्या उत्थानाची, जातीची सहानुभूती, रोष भडकावणारी आणि क्रांतिकारी शक्तीला भडकावणे आणि प्रतिक्रांती…! मुख्यमंत्री ते जाणता राजा च्य ा विद्वान ते खानदानी बहाद्दरापर्यंत खोटे बोलणे, परस्परांना परस्परविरोधी आश्वासने देणे किंवा एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे अशा सर्वच लोकांमध्ये स्पर्धा आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पुरोगामी महाराष्ट्रही तेच करत आहे.

ते केवळ विचार-वर्तनाच्या पातळीवरच राहिले नाही, तर महापुरुषांच्या पातळीवरही ते पोहोचले. तुमच्या जातीतील महापुरुषापेक्षा आमच्या जातीतील कोणता महापुरुष श्रेष्ठ हे शोधण्याची स्पर्धा सुरू आहे. परवा एकणे यांनी फेसबुकर चक्क शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यात कुस्तीचा सामना सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याला किमान पन्नास लाईक्स आणि अडतीस टिप्पण्याही मिळाल्या! एकतर महाराष्ट्रातून ताबडतोब बाहेर पडलेल्या शास्त्रज्ञांनी आणि सामान्य माणसांनी पुन्हा उच्चपदस्थांना “त्या” करून त्यांचा शोध लावला पाहिजे, किंवा आम्ही हे पुस्तक वाचकांसाठी देत ​​आहोत, या एकमेव हेतूने. वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया पुढील आवृत्तीत प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करावा. पुढील ई-मेलरमध्ये अभिप्राय पाठविला.

धन्यवाद…..

श्रावण देवरे

ईमेल – s.deore2012@gmail.com मोबाइल – 94 22788 546

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button