देश - विदेशसोशल

_अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा तीन दिवसीय तेलंगणा राज्याचा दौरा संपन्न ” …_

[gspeech-button]

” _अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांचा तीन दिवसीय तेलंगणा राज्याचा दौरा संपन्न ” …_
अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष विलासराव पाटील यांनी नुकताच तेलंगणा राज्याचा दौरा केला .या तीन दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी आदिलाबाद जिल्ह्यातून सुरुवात केली . तेलंगणा प्रदेशाच्या अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांची तीन वर्षासाठी निवड करण्यात आली . संपूर्ण राज्यातून २०० प्रतिनिधी हजर होते .यात प्रदेशाध्यक्षपदी प्रा . सुकुमार पेटकुले ‘ महिला आघाडी प्रदेश अध्यक्षपदी सौ. विनोदा नागोसे व केंद्रीय कार्यकारणी साठी तेलंगणाचे प्रतिनिधी म्हणून मा . श्री . भगवंतराव कोटरंगे यांची निवड झाली . याप्रसंगी राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवदासजी महाजन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड.राजेंद्र महाडोळे ‘ मध्य प्रदेश अध्यक्ष ॲड. कैलास वाघेला ‘ गुजरात प्रदेश अध्यक्ष डॉक्टर शामराव फुले हेही हजर होते . त्यानंतर दुसऱ्या दिवशी हैदराबाद येथे तेलंगणा राज्याचे उपमुख्यमंत्री मा . नामदार भट्टी विक्रमारका मालू यांची भेट घेतली .तेलं गाना येथे डिसेंबर 2023 मध्ये काँग्रेस पक्षाचे सरकार आले . मुख्यमंत्रीपदी मा. ना . रेवंथ रेड्डी यांची निवड झाली . त्यांनी पहिली घोषणा केली की, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानाचे नाव प्रगती भवन असे होते, ते आज पासून “ज्योतिराव फुले प्रजा भवन “असे करण्यात येत असून या भवनातील सर्व लोखंडी बॅरिकेट्स काढून टाकण्यात येत आहेत . महात्मा ज्योतिराव फुले यांनी जाती आधारित भेदभाव विरुद्ध काम केले व दलितांसाठी शाळा सुरू केली आहे . अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले यांचा सन्मान केला .अखिल भारतीय माळी महासंघाचे तेलंगाना प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार पेटकुले यांनी तेलंगाना शासनाकडे दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मागणी केली की , भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती दिनांक 3 जानेवारी असते .हा दिवस “महिला शिक्षिका दिवस ” म्हणून संपूर्ण तेलंगणा राज्यात साजरा करण्यात यावा . तेलंगणाचे मुख्यमंत्री मा . ना . रेवंथजी रेड्डी यांनी मागणी मान्य करत दिनांक 2 जानेवारी 2025 रोजी जी .आर .काढून यांची अंमलबजावणी केली .त्यामुळे अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विलासराव पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय कार्याध्यक्ष शिवदासजी महाजन ‘ तेलंगणा प्रदेशाध्यक्ष प्रा . सुकुमार पेटकुले ‘ मध्यप्रदेशचे अध्यक्ष एड व्होकेट कैलास वाघेला ‘ गुजरात प्रदेश अध्यक्ष डॉक्टर शामराव फुले माननीय रघुनाथजी ढोक ‘ दिलीप नेवसे सर तेलंगाना महिला आघाडी अध्यक्ष सौ विनोदा नागोसे ‘ मंगाजी गुरनुले ‘ गणेश माळी (सुरत ) विनोद गुरमुले ‘कृष्णा भिंगारे ‘ यांचे शिष्टमंडळ हैदराबाद येथे माननीय मुख्यमंत्री यांची भेट घेण्यास गेले .ते उपलब्ध नसल्याने माननीय उपमुख्यमंत्री नामदार भट्टी विक्रमारका मालू यांची भेट घेऊन ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा सन्मान केल्याबद्दल अखिल भारतीय माळी महासंघातर्फे फुले पगडी व महात्मा फुले समग्र वाङ्ममय देऊन सत्कार करण्यात आला . व पत्राद्वारे आभार मानण्यात आले . तसेच केंद्रीय कार्यकारणी कडून तेलंगाना मधील माळी समाजाच्या विकासासाठी काही मागण्या निवेदनाद्वारे देण्यात आल्या त्या खालील प्रमाणे
१ )तेलंगाना विधानसभा मे महात्मा ज्योतिराव फुले और सावित्रीबाई फुले के सामाजिक एवं शिक्षा का कार्य देखके दोनो को मरणोपरांत भारतरत्न किताब से सन्मानित किया जाए , इसके लिए प्रस्ताव मंजूर करके केंद्र सरकार को भेजे ।
२) तेलंगणा सरकारने राज्य मे जातीगत जनगणना का काम पुरा किया आपका हार्दिक अभिनंदन . ऐसेही जनगणना केंद्र सरकारने करे इस मांग का प्रस्ताव तयार करके केंद्र सरकार को भेजे ।
३)तेलंगणा विधानसभा में ओबीसी (अन्य पीछडा वर्ग ) को केंद्र सरकार की और से लगाये गये क्रीमिलियर की मर्यादा १५ लाख करने का प्रस्ताव तयार करके केंद्र सरकार को भेजे ।
४ )महात्मा ज्योतिराव फुले और सावित्रीबाई फुले का चरित्र तेलगू भाषा मे रूपांतरित करके प्रकाशित करे इसके लिए राज्य सरकार की और से एक कमिटी बनाई जाय और इसका अध्यक्ष अखिल भारतीय माली महासंघ के तेलंगाना प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार पेटकुले जी को बनाया जाऐ ।
५ )महाराष्ट्र सरकार की और से महात्मा ज्योतिराव फुले और सावित्रीबाई फुले की मूल तस्वीर प्रकाशित की है वैसे ही तस्वीर तेलंगणा सरकार की और से प्रकाशित करके हर प्राथमिक / माध्यमिक / महाविद्यालय (कॉलेज )और सरकारी दप्तरो मे लगाई जाए ।
६ )महात्मा ज्योतिराव फुले और सावित्रीबाई फुले जी की जीवन चरित्र को प्राथमिक / माध्यमिक / महाविद्यालय (कॉलेज ) के पाठ्यक्रम मे समावेश किया जाए ।
७ )तेलंगाना राज्य मे माली समाज को एसटी संवर्ग मे सामील करने के लिये तेलंगणा सरकारने विधानसभा मे प्रस्ताव पारित करके केंद्र सरकार को भेज दिया है । माली समाज की इस मांग को पुरी करने के लिए तेलंगाना सरकार की और से केंद्र सरकार से इस मांग का पुरा होने के लिए प्रयास किया जाए ।
या प्रमाणे मागणीचे निवेदन देवून तेलगांना राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात आले .

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button