सोशलमहाराष्ट्र

अकोला मूर्तिजापूरचे माजी आमदार तुकाराम जी बिडकर यांचे दुःखद निधन विनम्र अभिवादन!

 

[gspeech-button]

अकोला मूर्तिजापूरचे माजी आमदार तुकाराम जी बिडकर यांचे दुःखद निधन विनम्र अभिवादन!

1

1

अखिल भारतीय समता परिषदेचे उपाध्यक्ष, विदर्भ वैज्ञानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. अकोला येथे त्यांच्या मूळगावी आज पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत माजी उपमुख्यमंत्री माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

सत्यशोधक चळवळीतील ते एक समर्पित कार्यकर्ते होते .राजकारणातच नव्हे, तर कला क्षेत्रातही त्यांनी बहुमोल योगदान दिले. महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित “सत्यशोधक” या चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. त्यांच्या निधनाने सत्यशोधक चळवळीचे झालेले नुकसान कधीही भरून येणार नाही. बहुजन समाजाच्या हक्कासाठी लढताना या निडर सहकाऱ्याची उणीव नेहमीच भासेल. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो! अशी निर्मिकास प्रार्थना केली

तुकाराम बिडकर यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख, शिवसेनेचे माजी आमदार दाळु गुरुजी इतर आजी-माजी आमदार यांनी रुग्णालयात गेले होते. आमदार अमोल मिटकरी यांच्यासह माजी आमदारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बिडकर यांच्या निधनाने एका पिढीचे नुकसान झाल्याचे अमोल मिटकरी यांनी श्रद्धांजलीच्या भाषणात म्हटले आहे.

असा घडला अपघात?
भारतीय जनता पक्षाच्या अमरावती विभागातील कार्यकर्त्यांची बैठक अकोला शहरातील सिटी स्पोर्ट्स क्लब येथे होती. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कामगार मंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आले होते. माजी आमदार तुकाराम बिडकर हे चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटण्यासाठी सिटी स्पोर्ट्स क्लब येथे गेले होते. भेटीनंतर दुचाकीवरून परतत .येत असताना जनावरे वाहून नेणाऱ्या मालवाहू वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत तुकाराम बिडकर यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सहकारी राजदत्त मानकर गंभीर जखमी झाले, जखमी या दोघांचा आणले असता रुग्णालयात मृत्यू झाला.

तुकाराम बिडकर हे एक कलाकार होते शिव फुले शाहू आंबेडकर या महापुरुषासह खास करून गाडगे बाबाचे ते भक्त होते गाडगे बाबा चा प्रचार प्रसार वराडी भाषेत करत होते त्यातूनच ते लोकप्रिय झाले आणि लोकप्रियतूनच ते आमदार हे झाले त्यांच्या स्मृतीस अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी नेते म्हणून विनम्र अभिवादन सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी केले आहे त्यांच्या आत्म्यास निर्मिक चिरशांती देवो हीच प्रार्थना तुकाराम बिडकर माजी आमदार हे शांत संयमी विनम्र असे नेतृत्व होते त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये अकोला जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेता आला त्यांच्या आठवणी फार मोठे आहेत त्या कोणत्याही शब्दात मला आता व्यक्त करता येत नाहीत असेही लिंगे यांनी सांगितले

>दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button