लासलगाव शहर पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माननीय माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न
.
लासलगाव शहर पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीचे उद्घाटन माननीय माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न

- महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडून ४.५ कोटी खर्चातून ही सुसज्ज इमारत तयार झाली आहे. यामुळे स्थानिक सुरक्षेतील सुविधा अधिक सक्षम होईल आणि नागरिकांना जलद, प्रभावी आणि उच्च दर्जाची सेवा मिळवता येईल.
हे पोलीस स्टेशन स्थानिक समुदायाच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल आणि येथील नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण मिळेल, असा विश्वास आहे. तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी वसहतीचा प्रश्न मार्गी लाऊन सुसज्ज पोलिस निवासस्थाने निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असण्याचा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित केला.
यावेळी या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार कल्याणराव पाटील, पोलिस अधिक्षक विक्रम देशमाने, अधीक्षक अभियंता सपना कोळी, पोलीस उपअधीक्षक निलेश पालवे, सहायक पोलिस निरिक्षक भास्कर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पवन सुपणार, श्री.वाळके, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, भाऊसाहेब भवर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप, जयदत्त होळकर, डॉ.श्रीकांत आवारे, सरपंच योगिता पाटील, रामनाथ शेजवळ, अनिता ब्रम्हेचा, मंगेश गवळी, धर्मेश जाधव, मच्छिंद्र थोरात, बाळासाहेब पुंड, सचिन दरेकर, अफजल शेख, शिवाजी सुपनर, संतोष राजोळे, पांडुरंग राऊत, कंत्राटदार प्रशांत सारडा, आर्किटेक्ट जयंत कोलते यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#nashik #yeola #maharashtra #lasalgaonpolice #police #lasalgaon



