तुमचे मत तुमच्यावरील अन्यायास खतपाणी घालते.

तुमचे मत तुमच्यावरील अन्यायास खतपाणी घालते.
ओबीसी वर्गाचे सत्ताधारी आणि विरोधी आघाडीने संगनमत करुन आरक्षण संपवले.
ज्यांनी आरक्षण संपवले तेच उद्याच्या निवडणुकीत आपल्या प्रत्येकाच्या मतदारसंघातील उमेदवार आहेत.
त्या उमेदवारास मत देणे म्हणजे ज्यांनी आरक्षण हडप केले त्यांना मत देवून खासदार करुन त्यांच्या विजयी मिरवणुकीत आपलं ओबीसी आरक्षण संपविल्या आनंद व्यक्त करणे.
आपल्या मुलाबाळांच्या नोकर्या आपल्या मतदानाने संपवणे.
आपले स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय आरक्षण आपणच मते देवून संपविणे.
नोकर्या, शिक्षणापासून वंचित राहिल्यास आपल्या पुढील पिढीस आपणच ह्या मंडळींना मते देवून गुलामीत ढकलणे.
निवडणुकीचा रणसंग्राम ओबीसी नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या पक्षासाठी निष्ठा दाखवतील त्या निष्ठा त्याच्या त्या निष्ठा सबंध ओबीसी वर्गाच्या गुलामीस कारणीभुत असतील, तेच ओबीसी नेते/कार्यकर्ते ओबीसी आरक्षणाचे मारेकरी असतील,
तेच पुढील पिढ्याच्या जगण्याचा कर्दनकाळ असतील.
बांधवांनो,
इतका अन्याय होऊन पुन्हा त्यांच्या मताच्या शिदोर्या भरणे म्हणजे आपणहून दिसत असताना मोठ्या कड्यावरुन उडी मारणे.
ह्या वेळी एक वेळ, निव्वळ एक वेळ तुमचे मत त्यांना देणे थांबवा.
ते मतच आता तुम्हास वाचवू शकते.
ते वाचवणे तुमच्या हातात आहे.
त्यांच्या वरवरणं झगमगाट वाटणार्या माहोलात न जाता आपल्या हक्काच्या ओबीसी बहुजन पार्टी च्या प्रवाहात या.
हा प्रवास आरक्षणाचे संरक्षण करेलच त्याचबरोबर तुम्हास आजवर कधीही पहावयास न मिळालेले ते आपल्यासाठी अज्ञात असलेले दिल्ली / मुंबईचे दालन दाखवेल.
५४% च्या जोरावर त्या दालनाचचा सर्वेसर्वा तुम्हास बनवेल. त्यासाठी प्रत्येकाने आपलं मत ज्यांना आजवर दिले त्यांना यापुढे द्यायचे नाही.
निवांत कोळेकर सांगली
8329665901
ओबीसी बहुजन पार्टी




