शरणागाथा क्रमशः पाच

शरणागाथा क्रमशः पाच
बसवण्णांनी चेहरा दिला. मंदिरात प्रवेश नसलेल्यांच्या हातात – इष्टलिंगाच्या रूपात देव दिला. याशिवाय शरीरच मंदिर असून, आपल्याला वेगळ्या मंदिराची गरज नसल्याची गर्जना सार्वत्रिक केली, वर्ण व्यवस्था झुगारून समतेचा सिद्धांत सांगणारा नवा धर्मही दिला. तोच लिंगायत धर्म, लिंगवंत धर्म, शरण धर्म वा बसवधर्म होय. कोणत्याही नावाने तुम्ही संबोधले तरी तो धर्म माणुसकीचे गीत गाणारा आहे. हाच आशय या पुस्तकाच्या मुखपृष्ठात मांडण्यात आला आहे. महात्मा बसवण्णा हे केंद्रबिंदू असले तरी परिघावरील शरण तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यांचे हात एकमेकांच्या खांद्यावर आहेत. त्यांना चेहरा नसला तरी कपाळावर विभूती आहे. हीच त्यांची ओळख आहे. ते सगळे समान आहेत.
दुसरीकडे बसवण्णा लोकजंगम अल्लमप्रभुदेव यांना आपला गुरू मार्गदर्शक मानतात. व्यवस्थेने शूद्भत्त्वाचा शिक्का भाळी मारलेल्या कक्कय्या आणि चन्नय्या यांना आपले पूर्वज मानतात. हरळय्यांना वाकून शरण जातात. राजमार्गावर शरणू शरणार्थी म्हणतात. नगरवधू असलेल्या संकव्वेच्या घरी प्रसाद घेतात भोजन करतात. व्यवस्थेने देवापासून लांब ठेवलेल्या शूद्रातिशूद्रांच्या हाती आकाशाहून उंच आणि पाताळाहून खोल, अगम्य, अगोचर, चराचर व्यापून राहिलेल्या ईश्वराला देतात. निर्गुण, निराकार, ईश्वर इष्टलिंगाच्या रूपात आपल्या गळ्यात सोबत घेऊन जगण्याचा मार्ग दाखवतात. मंदिर व्यवस्था ही शोषणाची आहे, आपल्याला मंदिराची गरज नाही. पाय हे खांब तर डोके सोनेरी मुकुट असलेले आपले शरीर हेच मंदिर असल्याने कोणत्याही स्थावर वास्तूची गरज नसल्याचे आत्मभान शोषितांच्या मनात जागृत करतात. शिवालयाची आणि महारवाड्याची भूमी इथून तिथून सारखीच होय. समतेचा हा मंत्र देताना ‘दया हेच धर्माचे मूळ आहे. दयाभान नसलेला धर्म कोणता तरी असेल का’ ? हा प्रश्न विचारतात. स्त्री ही माया नसून तिला समान हक्क आणि अधिकार आहेत. तिच्या मासिक पाळीस विटाळ मानणे पाखंडीपणा असल्याचे सांगतात. सकल जिवात्म्याच्या कल्याणाचा विचार सांगतात.
हाच वारसा वारकरी संतांनी पुढे नेल्याचे दिसून येतो. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराचे मानदंड मानले जाणारे छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा यांच्यासारख्या विभूर्तीच्या रूपाने हा प्रवाह अखंडितपणे वाहत आहे. महात्मा बसवण्णा हे दक्षिण भारतातील पुरोगामी विचाराचे प्रारंभ बिंदू आहेत. म्हणूनच त्यांचा ‘बीज
क्रमशा
5




