**प्रा. श्रावण देवरे यांची निवडणूक विश्लेषण करणारी मुलाखत

**प्रा. श्रावण देवरे यांची निवडणूक विश्लेषण करणारी मुलाखत
1) कांग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या मराठा राजकारणाने ओबीसी समुदायाला सातत्याने भाजपकडे ढकलण्याचे काम केलेले आहे.
2) मराठा आरक्षणाचा मुद्दा हायजॅक करण्यासाठी माननीय शरद पवार यांनी जरांगे फॅक्टरची निर्मिती केली.
3) ओबीसींच्या विरोधात जाळपोळ, तोडफोड व मारहाणी सारखे हिंसक हल्ले घडवून आणले गेलेत व ओबीसी-मराठा धृवीकरण घडवून आणले गेले.
4) जरांगे फॅक्टरने उघडपणे शरद पवारांची बाजू घेऊन भाजपला गाडण्याची भाषा केल्यामुळे ओबीसी आपोआप भाजपकडे झुकत गेला.
5) मराठा पक्षांची सत्ता आली तर ओबीसींच्या विरोधात हिंसक कारवाया वाढतील, या रास्त भीतीपोटी 52 टक्के ओबीसींनी एकगठ्ठा मतदान भाजपप्रणीत महायुतीच्या झोळीत टाकले व महायुतीला प्रचंड बहुमताने सत्तेत बसवले.
6) एखाद्या समाजघटकाला भयग्रस्त करुन ‘अ-सुरक्षित’ केले की तो समाज आपल्या मुलभूत मागण्या, आपले मूळ विचार सर्वकाही गुंडाळून ठेवतो व केवळ सुरक्षितता मिळावी म्हणून नको त्या पक्षाच्या आश्रयाला जात असतो.
7) ओबीसींच्या एकगठ्ठा 52 टक्के मतांच्या तुलनेत मराठा+दलित+मुस्लिम मते नगण्य ठरली व मविआचा लज्जास्पद पराभव झाला.
8) सर्व प्रमुख पक्षांच्या तुलनेत सर्वात जास्त दारुण पराभव शरद पवार यांच्या पक्षाचा झाला (फक्त 10 जागा) यावरुन हेच सिद्ध झाले की जरांगेv फॅक्टर किती नकारात्मक व विध्वंसक आहे. दिनबंधू न्यूज शिव क्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा




