सोशल

सत्यशोधकांच्या अंतरंग क्रमशा.23

सत्यशोधकांच्या अंतरंग क्रमशा.23

जेवरे

गंगाधर गणपत

(जन्म १८८३-१९६७)

सत्यशोधक गंगाधर गणपतराव जेवरे (जेवरे मास्तर) हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सत्यशोधक असून, त्यांचा जन्म १८८३ साली झाला. त्यांचे शिक्षण कर्जत येथेच झाले. व्हर्याक्युलर फायनल (सातवी) पर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी शिक्षकाचा पेशा पत्करला. जेवरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील बिनीचे सत्यशोधक ‘दीनमित्र’कार मुकुंद पाटील यांच्याकडून प्रेरणा घेऊन सत्यशोधक चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. त्यांना कर्जत येथील पगारे आणि शेख चांद यांचे सहकार्य लाभले. हयातभर ते कडवे सत्यशोधक म्हणूनच कार्यरत राहिले. सत्यशोधक चळवळीला आणि सत्यशोधक जलसाकारांना ते आपल्या परीने सहकार्य करत राहिले. त्यांनी आपल्या पत्नीलाही शिक्षित केले. कर्जत येथील महात्मा गांधी विद्यालयाचे ते मानद सचिव होते. तसेच त्यांनी १९१९ साली विद्यार्थ्यांसाठी कर्जत येथे वसतिगृह सुरू केले होते.

कर्जत तालुक्याचे एक पुढारी सोनाजी बाबर पाटील यांनी चांदे येथील एका शेतकऱ्याचे लग्न सत्यशोधक मते लावले. प्रस्तुत विवाह प्रकरणाचा पुरोहितांनी गहजब करून प्रस्तुत प्रकरण दक्षिणेसाठी न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणी बहुजन समाजाची जागृती व्हावी म्हणून राज्यभर कोल्हापूरकर जाधव, डोंगरे, लड्डे यांनी दौरे काढले. या सत्यशोधक दौऱ्यांचा प्रारंभ कर्जत येथील जाहीर सभेने झाला. या जाहीर सभेच्या अध्यक्षस्थानी ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील हे होते. प्रस्तुत जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी गंगाधर जेवरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दीनमित्र पत्रासाठी ते अधूनमधून लेखनही करत असत. दीनमित्र सिल्व्हर ज्युबली अंकासाठीही (१९३८) त्यांनी (सहलेखक पगारे) कर्जत येथील सत्यशोधक चळवळीवर लेख लिहिला आहे. दिनांक २९ ऑक्टोबर १९४१ च्या दीनमित्रात ‘लोकप्रिय राऊळबुवांचा मृत्यू’ हे पत्र प्रसिद्ध झाले असून कर्जत येथील राऊळबुवांच्या कार्याचा धावता आढावा प्रस्तुत पत्रात घेण्यात आला आहे. तसेच २५ मे

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button