सोशल

“मिस इंडियाच्या यादीत एकही दलित-ओबीसी नाही, यावरून…”, राहुल गांधींचं वक्तव्य

3) “मिस इंडियाच्या यादीत एकही दलित-ओबीसी नाही, यावरून…”, राहुल गांधींचं वक्तव्य

लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि
रायबरेलीचे खासदार राहुल गांधी हे शनिवारी (२४ऑगस्ट) उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे काँग्रेसने
आयोजित केलेल्या संविधान सन्मान व संरक्षणकार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी यांनीसुल्तानपूर येथील अनुसूचित जातीच्या रामचैत
यांच्याबद्दल माहिती दिली. राहुल यांनी अलीकडेच रामचैत यांची भेट घेतली होती. तसेच त्यांनी पुन्हा
एकदा जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. राहुल गांधी म्हणाले, “जातीनिहाय जनगणनेमुळे केवळ लोकसंख्या किंवा कोणत्या
जातीचे किती लोक आहेत एवढंच समजणार नाही, तर कोणकडे देशाची किती संपत्ती व संसाधने
आहेत? कोणत्या क्षेत्रात कोणाची भागिदारी आहे? हे देखील समजू शकेल”.
राहुल गांधी म्हणाले, भारतातील ९० टक्के लोक हे देशाच्या सिस्टिमचा भाग नाहीत. अल्पसंख्याक देखील यातच येतात. मी अलीकडेच मिस इंडिया झालेल्या महिलांची यादी पाहिली. मला वाटत होतं किमान यामध्ये तरी एखादी दलित तरुणी असेल. मात्र, ही यादी पाहून हिरमोड झाला. त्यात ना दलित तरुणी होती, ना आदिवासी, ना ओबीसी. मीडिया, चित्रपटसृष्टी आणि मिस इंडिया बनणाऱ्या तरुणींमध्ये देशातील ९० टक्के लोकांचं प्रतिनिधित्त्व नाही. देशाचं संविधान केवळ त्या उर्वरित १० टक्के लोकांनी नव्हे तर संपूर्ण १०० टक्के लोकांनी बनवलं आहे.

राहुल गांधी यांच्याकडून जातीनिहाय जनगणनेची मागणी

काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले, “देशाथील ९० टक्के लोक मुख्यधारेत नाहीत. त्यांच्याकडे प्रत्येक क्षेत्रात मोठं काम करण्याची प्रतीभा आहे. तरीदेखील त्यांना मुख्यधारेपासून वंचित ठेवलं जात आहे. त्यामुळेच आम्ही सातत्याने जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहोत. भाजपावाले म्हणतायत की ते जातीनिहाय जनगणना करतील आणि त्यात ओबीसींचा (इतर मागासवर्ग) समावेश करतील. मात्र जातीनिहाय जनगणनेत केवळ ओबीसींचा उल्लेख करणं पुरेसं नाही. समाजातील सर्व घटकांचा समावेश करणं आवश्यक आहे”.

***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button