टॉप न्यूज

येवल्याच्या विकासासाठी मंत्री छगन भुजबळ यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचा जाहीर पाठींबा

येवल्याच्या विकासासाठी मंत्री छगन भुजबळ यांना स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचा जाहीर पाठींबा

मंत्री छगन भुजबळ यांना विविध पक्षांचा वाढता पाठींबा

येवला,दि.१३ नोव्हेंबर:- येवला विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना शिंदे गट, आरपीआय आठवले गट महायुती घटक पक्षातीलचे अधिकृत उमेदवार मंत्री छगन भुजबळ यांना विविध संस्था संघटनांच्या वतीने वाढता पाठींबा मिळत आहे. येवल्याच्या विकासासाठी मंत्री छगन भुजबळ यांना मनोजभाई संसारे प्रणित स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आहे. नाशिक जिल्हाध्यक्ष दीपक धिवर यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज मंत्री छगन भुजबळ यांची येवला संपर्क कार्यालयात भेट घेऊन पाठींबा जाहीर केला.

यावेळी पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या पाठींबा पत्रात म्हटले आहे की, मंत्री छगन भुजबळ यांनी गेल्या वीस वर्षाच्या कालावधीत येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात हजारो कोटी रुपयांची विकास कामे करून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. येवला ही भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भुमी आहे. याठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केली. या मुक्तीभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी ३० कोटीहून अधिक निधी खर्च करून विविध विकासकामे केली आहे. त्यामुळे आज जगभरातील अनुयायी याठिकाणी भेट देण्यासाठी येतात. त्याचबरोबर येवला शहरात पैठणी पर्यटन केंद्र, प्रशासकीय संकुल, क्रीडा संकुल यासह विविध विकासकामे मार्गी लागली असून शेतकरी, कामगार कष्टकरी वर्गाला या विकासकामांचा लाभ मिळाला आहे. त्यामुळे भविष्यातही या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी आम्ही त्यांना जाहीर पाठींबा देत असल्याचे म्हटले आहे.

यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष दीपक धिवर, नाशिक जिल्हा सचिव भगवान भोसले,येवला तालुका सचिव महेंद्र खळे, येवला तालुका खजीनदार संदीप भालेराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.*हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीआई फुले यांची पुण्यभुमी पुणे येथे येऊन दर्शन घेऊन नमन केले सोबत पुण्यातील फुले प्रेमी *.दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर सर्वांनी व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button