✨शुभकार्याच्या बातम्या✨

✨शुभकार्याच्या बातम्या✨
1)
लोकमंगल शिक्षक रत्न, आदर्श शाळा पुरस्कार 2024 अकरा शिक्षक आणि दोन शाळांना सन्मानित करणार
सोलापूर – लोकमंगल फाउंडेशन आणि लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या शिक्षक रत्न पुरस्कारांसाठी गुणवत्तावान शिक्षकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
सोलापूर जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार योजनेत प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन आणि वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना शिक्षक रत्न पुरस्कार दिले जातात.
त्याशिवाय क्रीडा शिक्षक व कला शिक्षक यांनाही सन्मानित केले जाते. अध्यापन सेवेमध्ये विशेष उल्लेखनीय सेवा बजावत विविध उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकाला पुरस्कार दिला जातो.
सोलापूर जिल्ह्याची कीर्ती जगभरात पसरवणाऱ्या गुणवत्तावान विद्यार्थ्याला प्रेरणा देणाऱ्या शिक्षकाला डॉ. अब्दुल कलाम पुरस्कार दिला जातो. अशा अकरा शिक्षकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दोन प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
या पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि अडीच हजार रुपयांची पुस्तके असे आहे.
बारा वर्षापेक्षा अधिक सेवा बजावलेल्या कोणत्याही शिक्षकाला या पुरस्कारासाठी अर्ज करता येईल. त्यासाठी विहित नमुन्यातील अर्जावर माहिती भरून संबंधित शिक्षकांना प्राप्त झालेली प्रमाणपत्रे जोडून प्रस्ताव सादर करावा लागेल.
विहित नमुन्यातील अर्ज लोकमंगल पतसंस्था किंवा लोकमंगल मल्टीस्टेट सहकारी संस्था यांच्या कोणत्याही शाखेत उपलब्ध असेल,
शिवाय हा विहित नमुन्यातील अर्ज लोकमंगल फाउंडेशन च्या मुख्य कार्यालयात उपलब्ध असेल.
• पत्ता :- अन्नपूर्णा, १३/अ सह्याद्री सोसायटी, इ एस आय हॉस्पिटलच्या मागे, विकास नगर, होटगी रोड सोलापूर.
• पुरस्कारासाठी दाखल केले जाणारे प्रस्ताव याच पत्त्यावर आणून द्यावे लागतील.
• इच्छुक शिक्षकांना आणि शाळांना प्रस्ताव दाखल करण्याचा शेवटचा दिवस 20 ऑगस्ट 2024 हा असेल.
• संपर्क:-0217-0606070 किंवा 7722039617
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴


