सोलापूर

🔥 श्रीगोंद्यात ओबीसींचा एल्गार! जातनिहाय जनगणनेसाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपालिकांचे ठराव मंजूर करा – सत्यशोधक शंकरराव लिंगे

🔥 श्रीगोंद्यात ओबीसींचा एल्गार! जातनिहाय जनगणनेसाठी ग्रामपंचायत, नगरपंचायत व नगरपालिकांचे ठराव मंजूर करा – सत्यशोधक शंकरराव लिंगे

श्रीगोंदा प्रतिनिधी :

अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष रमेश भाऊ हिराळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीगोंदा येथे ओबीसी जनजागृती मोहिमेअंतर्गत इंदिरा गांधी पतसंस्थेच्या सभागृहात ओबीसी समाज, माळी महासंघ व विविध समाजघटकांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

बैठकीत उपस्थित सर्व समाजबांधवांनी “जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे” असा एकमुखी ठराव मंजूर केला. तालुक्यातील सर्व ओबीसी समाजघटकांना एकत्र करून व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन श्रीगोंदा तहसील कार्यालयात मोठ्या संख्येने समाजबांधवांच्या उपस्थितीत देण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त व सत्यशोधक समाजाचे विधीप्रमुख भीमराव कोथिंबीर यांनी दिली.

यावेळी बोलताना राष्ट्रीय अध्यक्ष शंकरराव लिंगे यांनी ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधत सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, ओबीसींच्या हक्कांवर सातत्याने गदा आणली जात असून आरक्षणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. ओबीसी समाजाने आता संघटितपणे लढा उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

निवेदनामध्ये खालील प्रमुख मागण्या करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले :

✅ जातनिहाय जनगणना तात्काळ करण्यात यावी.
✅ ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फेलोशिप वेळेवर मिळावी. राज्यात विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात दोन वस्तीग्रह महाज्योतीसाठी विभागीय कार्यालय उभारण्यासाठी शासकीय जागा योग्य तो पुरेसानिधी द्यावा
✅ ओबीसी महामंडळांना लोकसंख्येच्या प्रमाणात निधी द्यावा.
✅ ओबीसी आरक्षणाला घटनात्मक संरक्षण द्यावे.
✅ न्यायमूर्ती शुक्रे समिती, न्यायमूर्ती शिंदे समिती व भोसले समिती यांच्या शिफारशी रद्द कराव्यात.
✅ २००४ चा कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जीआर रद्द करावा.
✅ ओबीसींमधील घुसखोरी तात्काळ थांबवावी.
✅ शेतकऱ्यांना मोफत वीज, पाणी, खते व बियाणे द्यावीत.
✅ शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जपुरवठा करावा.
✅ अग्निवीर योजना बंद करून पूर्वीप्रमाणे सैन्य भरती सुरू करावी.
✅ जुनी पेन्शन योजना लागू करावी.
✅ सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा किमान दहा हजार रुपये बेकार भत्ता द्यावा.

यावेळी शंकरराव लिंगे यांनी सर्व समाजबांधवांना विशेष आवाहन करत सांगितले की, “प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपालिकेने ‘जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे’ असा ठराव मंजूर करून शासनाकडे पाठवावा. स्थानिक स्वराज्य संस्थांमधून उठलेला हा आवाज सरकारला निर्णय घेण्यास भाग पाडेल.”

बैठकीनंतर श्रीगोंदा तालुक्याच्या वतीने शंकरराव लिंगे व रमेश भाऊ हिराळकर यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी नानासाहेब शिंदे, पांडुरंग खेडकर, देवराव कोथिंबीर, भीमराव कोथिंबीर, एकनाथ आळेकर, गोरख आळेकर, सचिन झगडे सर यांच्यासह मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.

📢 शिवक्रांती टीव्ही

🎤 संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 7387377801

👉 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा
🔄 शेअर करा
📤 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका
📺 चॅनल सबस्क्राईब करा

#जातनिहाय_जनगणना
#ओबीसी_जनजागृती
#श्रीगोंदा
#शंकरराव_लिंगे
#रमेशभाऊ_हिराळकर
#अखिल_भारतीय_माळी_महासंघ
#ओबीसी_आरक्षण_वाचवा
#शिवक्रांतीटीव्ही :::

🚩 “ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिकांनी ठराव करा; जातनिहाय जनगणना करा! श्रीगोंद्यातून ओबीसींचा सरकारला थेट इशारा” 🔥

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button