शरणगाथा क्रमशा.36

शरणगाथा क्रमशा.36
१६१८ वचनांचा समावेश आहे
‘अल्ला आणि अल्लम’ ही एकाच ईश्वराची रुपे असल्याचे सांगणारे १९ शतकातील संतश्रेष्ठ शिशुनाळ शरीफ साहेब प्रभुलिंगलिले या ग्रंथाचा गौरव करता म्हणतात, ‘६ शास्त्रे आणि १८ पुराण बगलेत (गुंडाळून ठेवावे) तर प्रभुलिंग डोक्यावर ठेवावे.’ चामरसने लिहिलेल्या ‘प्रभुलिंगलीले’ या ग्रंथात सुमारे 1100 वचने आहेत. यामध्ये चामरसने अल्लमप्रभूच्या महान कार्याचे अत्यंत मार्मिक प्रासादिक वर्णन केले आहे. त्यामुळे हे काव्य कन्नड साहित्यात श्रेष्ठ ठरले आहे. नंतस्थ अनेक कवींनी त्यापासून प्रेरणा घेऊन काव्ये लिहिली. शिवाय चामरसच्या शैलीचे अनुकरण केले. या महाकाव्यातील अल्लमप्रभूवर मायादेवीने टाकलेली मोहिनी आ तिचा त्यांनी केलेला प्रतिकार, गोग्गय्य (गोरक्षनाथ) अल्लमप्रभू संवाद, सिद्धरामेड व अल्लमप्रभू संवादाचे प्रसंग सविस्तरपणे रेखाटण्यात आले आहेत. नंतरच्या काळा विरुपाक्ष पंडिताने त्याचा संस्कृतमध्ये तसेच ब्रह्मदास कवीने त्याचा ‘लीला विश्वंभर नावाने मराठीत अनुवाद केला. हे अनुवाद प्रभुलिंगलीलेच्या श्रेष्ठत्त्वाचे द्योतक म्हणाय लागतील. याशिवाय समकालीन शरणांच्या वचनातून भेटणारे प्रभुदेव समजून घेण्या अधिक सोपे आहेत. बसवण्णा, सिद्धरामेश्वर, अक्कमहादेवी यांच्यासह इतर शरणांच्य वचनातून प्रभुदेवांच्या ज्ञान, अवधूत, वैराग्य, योगीत्त्व आणि अधिष्ठानाबद्दल गौरवपू उल्लेख आढळतो. अल्लमप्रभुदेवांनी संपूर्ण भारतीय द्विपकल्प भ्रमण केले होते.
कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यातील शिकारीपूर तालुक्यातील ‘बळ्ळी गावी’ प्रभुदेवांचे जन्मगाव. ग्रामदैवत असलेल्या गोग्गेश्वर, अनिमिषदेव अनिमिषयोगी यांच्य मंदिरात मृदंग वाजविणे हा त्यांच्या कुटुंबीयांच्या उपजीविकेचे साधन होते. तरुण प्रभुदेवांच्या मृदंगाच्या तालावर साक्षात गुग्गेश्वर नाचत असल्याच्या अनेक
कथा, आख्यायिका आहेत. याशिवाय त्यांच्यावर मोहित झालेल्या ‘मायादेवी’ला वः न झालेला, ‘माये’वर विजय मिळविलेला असाही प्रभुदेवांचा लौकिक आहे. यातील ‘माये’चा संदर्भ अनेक अर्थांनी विचार करायला हवा. मायादेवी नावाची तरुणीव एखादी उपवर राजकन्या असावी. प्रभुदेवांच्या मृदंग वादनावर, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाव लुब्ध असावी. प्रभुदेवांना प्राप्त करण्याचा तिचा प्रयत्न असावा आणि प्रभुदेव नम्रपण तिच्यापासून दूर राहिले असावेत. म्हणून ‘माये’वर विजय मिळविलेला, असे वर्णन आहे. वा मोह ‘माया’, विकार-वासना यांच्यापासून दूर असलेला, वीरक्तील पोहोचलेला असा त्यांचा यथार्थ गौरव झाला आहे. या संदर्भातही अनेक कथा- आख्यायिका आहेत. माया म्हणजे मोहिनीदेवी म्हणूनही काही चरित्रकारांनी उल्लेख केला आहे.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




