माळी समाजाचा वापर करणाऱ्या नेत्यांना येत्या विधानसभा निवडणूकीत मतदान करू नका सक्षम ओबीसी उमेदवारांना मतदान करा अॅड. सतिष शिंदे यांचे आवाहन!

माळी समाजाचा वापर करणाऱ्या नेत्यांना येत्या विधानसभा निवडणूकीत
मतदान करू नका सक्षम ओबीसी उमेदवारांना मतदान करा
अॅड. सतिष शिंदे यांचे आवाहन!
माळी
समाजाचा केवळ मतापुरता वापर केला जात असल्याचे समाजाच्या लक्षात आले आहे. राज्यात माळी समाजाची संख्या दोन कोटी आहे. माळी समाजाचा मतापुरता वापर करणार्या नेत्यांना येणार्या विधानसभा निवडणुकीम मतदान करू नका सक्षम ओबीसी उमेदवारांनाच मतदान करा असे आवाहन महात्मा फुले युवा दलाचे संस्थापक प्रमुख अॅड. सतिष शिंदे यांनी माळी सत्ता संवाद दौर्या दरम्यान विविध गावाना भेटी दरम्यान केले आहे.
महात्मा फुले युवा दल सध्या माळी समाजामध्ये जाऊन त्यांच्या गाठीभेटी घेत आहे. येणार्या विधानसभा निवडणुकीमध्ये समाजाचे हित कशात आहे? याबाबत समाज बांधवांशी चर्चा विचार विनिमय केला जात आहे. या चर्चादरम्यान
अॅड. सतिष शिंदे यांनी समाजाला जागृत राहण्या संदर्भात जागृत केले आहे. यावेळी ते म्हणाले की, आजवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगर पालिकांमध्ये माळी समाजाला म्हणावा तेवढा वाटा दिला जात नसून हे वास्तव आहे. आजवर
माळी समाजाचे जि.प. सदस्य, पं.स.सदस्य, सरपंच व स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांना म्हणावा तेवढा निधी दिला जात नाही. माळी समाजाबरोबर होत असलेला हा अन्याय समाजाच्या लक्षात आला आहे. यापुढे आम्ही आमचा वाटा घेतल्याशिवाय सोडणार नाही महाराष्ट्रात माळी समाज दोन कोटी मोठ्या प्रमाणात आहे. माळी समाजाच्या मतावर आजवर अनेकांनी सत्ता उपभोगली, मात्र माळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी तसे प्रयत्न झालेले नाहीत. या पुढच्या काळात जो माळी समाजाच्या मतावर राजकारण करेल, त्याला समाज त्यांना मतदान करणार नाही चांगला धडा शिकवल्याशिवाय रहाणार नाही. या पुढच्या काळात माळी समाजाच्या मतांचे राजकारण करणार्या नेत्यांना
मतदान करू नका
पाडा, सक्षम ओबीसी उमेदवारांना ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार नसेल त्या ठिकाणी एससी एसटी अल्पसंख्यांक उमेदवारांनाच मतदान करावे असेही आवाहन सबंध माळी समाज बांधवांना अॅड. सतिष शिंदे यांनी केले आहे.
राज्यात माळी समाज मोठ्या प्रमाणात विस्तारलेला आहे. समाजाचे प्रश्न बिकट आहेत. जेव्हा महात्मा फुले युवा दलाच्या वतीने राज्यभरात माळी सत्ता संवाद दौ
र्या दरम्यान गावागावात जाऊन भेटी देऊन आवाहन केले आहे
दीनबंधू न्यूज शिव क्रांती टी ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३ ८७ ३७ ७ ८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा आयकॉन बेल दाबा




